उदरनिर्वाहासाठी प्रत्येकाला काही ना काही काम करावे लागतेच. कुवतीनुसार प्रत्येक जण ते करताे. मात्र, हाती घेतलेले काम पूर्ण करणे ही आपलीच जबाबदारी असते हे विसरून चालणार नाही. सभाेवताली पाहाल, तर असे काही लाेक दिसतील, ते काम खूप करतात; पण त्यांचे एकही काम पूर्ण हाेत नाही आणि अशा कामांचा ढीग वाढतच जाताे. तुम्ही रात्री झाेपलेले असताना अर्धवट राहिलेल्या कामांच्या आठवणींनी तुम्हाला जाग आल्याची कल्पना करा. मग, आपण ही कामे अर्धवट का साेडली, पूर्ण का केली नाहीत अशा विचारात तुम्ही गुंतता.
इतरांनी त्यांची कामे पूर्ण केली आणि आपण मात्र तसे करू शकलाे नाही, हे जाणवून तुम्ही जागे राहता. पण, अशी कल्पनाच चुकीची असल्याने तिचा विचार कशाला करावा, असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही चुकता आहात.आपली अर्धवट कामे आपला पिच्छा साेडत नसल्याची वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे.मानसशास्त्रानुसार, आपले काम आणि त्याचे अनुभव आपल्या चेतन आणि अवचेतन मनावर स्वार झालेले असतात. काम पूर्ण करण्यातून आपल्याला आनंद मिळून दुसरी कामे करण्यास आपण प्रेरित हाेताे आणि अपूर्ण राहिलेल्या कामामुळे आपल्याला रात्री बेचैनी येते, हताशपणा आणि नैराश्य वाढते आणि मनात वाईट विचार येऊ लागतात. नंतर हे दुर्गुण आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनतात.
अर्धवटपणाची सवय : अर्धेच वाचलेले पुस्तक, पूर्ण न झालेली कविता, निम्माच झालेला प्राेजे्नट अथवा एखादे काम... आपण कामाला प्रारंभ केलेला तर असताे; पण एकही पूर्ण न हाेणे हे वाईट.नंतर आपल्यालाही त्याची खंत वाटते.्निलनिकल सायकाॅलाॅजिस्ट मॅथ्यू विल्यम यांच्या म्हणण्यानुसार, आपल्याला काेणतीही बाब परिपूर्ण पाहण्याची सवय असते आणि त्यामुळेच आपण कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करताे. काम अर्धवट राहिल्याने आपल्याला बेचैनी येते. जास्त कामामुळे नव्हे, तर काम अर्धवट साेडण्यामुळे जास्त तणाव येत असल्याचे मत डाॅड अॅलन या लेखकाने व्यक्त केले आहे. मात्र, काम वेळेत करण्याची सवय जशी असते, तशीच ती अर्धवट साेडण्याचीसुद्धा असते.
अर्धवट कामांचे चक्र : आपण कामाचा प्रारंभ तर माेठ्या उत्साहात करताे आणि निम्म्यावर ढेपाळताे. एकदम सुस्ती आल्यासारखे हाेते. कामातून थाेडा ब्रेक घेणे चांगले असले, तरी त्याचा अर्थ काम अर्धवट ठेवणे असाही नाही. ते काम पूर्ण करण्यासाठी स्वत:ला प्रेरित करणेसुद्धा महत्त्वाचे असते.आपण अनेक सबबींखाली कामे अर्धवट ठेवताे.काही वेळा आपण हे काम का करताे आहाेत हे न समजल्यामुळे किंवा ते पूर्ण कसे करावे हे लक्षात न आल्यानेही काम पूर्ण हाेतनाही.अगदी अचूकतेच्या नादातसुद्धा काम पूर्ण हाेत नाही.
काही जणांमध्ये आळशीपणा, भीती, चिंता आणि कामाच्या जबाबदारीचा अभाव असल्यानेसुद्धा असे घडते आणि कामे साठत राहतात. आपल्या अपूर्ण कामांचा परिणाम इतरांची कामे पूर्ण हाेण्यावरही हाेताे. ‘गेटिंग थिंग्ज डन’ या पुस्तकाचे लेखक डेव्हिड अॅलन म्हणतात, ‘घर असाे किंवा ऑफिस; अवेळी केलेले काम काेठेच पसंत केले जात नाही.त्यातून आपले नुकसान हाेते. काम अचूक आणि वेळेवर हाेण्यासाठी संतुलन साधले पाहिजे.’ मात्र, तुम्ही प्रत्येक काम पूर्ण केलेच पाहिजे असे नसते. आवडत नसलेले काम साेडण्यात वाईट काही नाही. पण, प्रत्येक कामाबाबत तुम्ही तसे करायला लागलात, तर ते चुकीचे ठरेल.काम अर्धवट ठेवल्याने आपल्याला समाधान मिळते, की अस्वस्थता याचा विचार तुम्हीच केला पाहिजे. ‘का’ हा प्रश्न समजणाऱ्यांकडे ‘कसे’चेही उत्तर असते, हे लक्षात ठेवा आणि काम वेळेवर संपवून समाधानाने राहा.