त्रिवेणी सागर संगमावरील कन्याकुमारी

    31-Oct-2023
Total Views |
 
 

Kanyakumari 
 
कन्याकुमारी येथील सर्वांत महत्त्वाचे व प्रसिद्ध स्थळ म्हणजे कन्याकुमारी मंदिर. देवांना संकटमु्नत करण्यासाठी साक्षात पार्वती येथे कन्या बनून आली. बाणासुराला शिवाचे वरदान लाभले हाेते की, कुमारी कन्येशिवाय इतर काेणाच्याही हातून तुला मरण येणार नाही. त्यामुळे ताे उन्मत्त हाेऊन देवांना त्रास देत हाेता. तेव्हा देवांनी या ठिकाणी यज्ञ केला. त्यातून कुमारी प्रकटली.शिवाने आपल्याशी विवाह करावा, अशी तिची इच्छा हाती. शिवदेखील कैलासावरून निघाले; पण मुहूर्त टळून गेल्यानंतरही तिच्यापर्यंत पाेहाेचू शकले नाही. त्यामुळे ही कन्या कुमारी राहिली. तिला पार्वतीचे एक रूप मानले जाते.कन्याकुमारीचे मंदिर दक्षिणी पद्धतीचे असून, मंदिरात कन्याकुमारीची सुंदर मूर्ती आहे. तिच्या चेहऱ्यावरील मिलनाेत्सुकतेच्या भावना पाषाणात सुंदर व्य्नत झाल्या आहेत. तिच्या नाकातील प्रखर हिरा त्याच्या तेजासाठी प्रसिद्ध आहे. ‘केप कामाेरिन’ नावाने प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यावर हे मंदिर असून, ते दुपारी बंद असते.
 
गांधी स्मारक : कन्याकुमारी मंदिराजवळ महात्मा गांधींचे स्मारक असून, येथे महात्मा गांधींचा अस्थिकलश दर्शनासाठी ठेवला आहे.या स्मारकाची रचना अशाप्रकारे आहे की, दर 2 ऑक्टाेबरला सूर्यकिरणे येथील गांधीजींच्या रक्षापात्रावर पडतात. हे स्मारक तीनमजली असून, वरच्या मजल्यावरून समाेरचे विलाेभणीय दृश्य दिसते.
 
विवेकानंद स्मारक : कन्याकुमारी मंदिराजवळ समुद्राच्या आत काही अंतरावर एका प्रचंड शिळेवर हे स्मारक उभारण्यात आले आहे.1893 मध्ये शिकागाे येथे सर्वधर्म परिषदेसाठी जाण्यापूर्वी विवेकानंद येथे आले हाेते. या शिळेवर त्यांनी सतत तीन दिवस तीन रात्री ध्यान केले.याच शिळेवर विवेकानंद स्मारक उभारण्यात आले आहे. हे एक भव्य मंदिर असून, यात दाेन मंडप आहेत. त्यापैकी एक ध्यानमंडप असून, तिथे मनाला एक वेगळीच शांती मिळते. विवेकानंद स्मारक एकनाथ रानडे यांच्या अथक परिश्रमांतून उभे राहिले आहे. ते पाहण्यासाठी सकाळी सात ते संध्याकाळी पाचपर्यंत नावेतून जाता येते.
 
या स्मारकाबाहेर उभे राहून तीन समुद्रांचा सुरेख संगम पाहाता येताे. पाण्याच्या पृष्ठभागावर हिरवा, निळा आणि राखाडी अशा तीनही समुद्रांचा एकत्रित मिसळणारा रंग म्हणजे अनेकतेत एकतेचे दर्शन. चहूबाजूचा अथांग सागर मनाची विशालता वाढवताे. विवेकानंद स्मारकासमाेरच तिरुवलुवर या तमिळ कवीचा 133 ूट उंच पुतळा उभारलेला आहे.एकाच ठिकाणी सूर्याेदय आणि सूर्यास्त समुद्रात पाहावयास मिळणारे एक ठिकाण म्हणजे कन्याकुमारी. पाैर्णिमेच्या संध्याकाळी पश्चिमेला सूर्य अस्तास जातानाच पूर्वेला पूर्ण चंद्रबिंब उदयास येण्याचे विहंगम दृश्य येथेच पाहायला मिळते.
 
विवेकानंदपुरम : कन्याकुमारी गावालगतच एकनाथ रानडे यांनी उभारलेला विवेकानंदपुरम आश्रम भव्य, नीटनेटका आणि स्वच्छ आहेयात्रेकरूंसाठी सर्व सुविधा येथे उपलब्ध आहेत.शिवाय अभ्यासकांसाठी ग्रंथालयही आहे.
 
सर्क्युलर किल्ला : कन्याकुमारीजवळील हा किल्ला 18व्या शतकात बांधण्यात आला आहे.शांत समुद्राच्या दर्शनासाेबतच समुद्रस्नानाचा आनंद पर्यटकांना येथे घेता येताे.
 
उदयगिरी किल्ला : राजा मारथंद वर्माच्या राजवटीत बांधलेला हा किल्ला कन्याकुमारीपासून 34 कि.मी.वर आहे. या किल्ल्यात बंदुका तयार करण्याचा कारखाना हाेता. 1841 मध्येराजा मारथंद वर्माने डच सैन्याचा पराभव केला.त्यातील चाेवीस युद्धकैदी येथे आणले. त्यातील डीलेनाॅय याने राजाच्या सैनिकांना युराेपियन युद्धकला शिकवली. त्याची कबर या किल्ल्यात आहे.
 
नागरकाेइल : येथील नागराज मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. ज्या ठिकाणी नागराजाची मूर्ती सापडली तिथेच हे मंदिर उभारण्यात आले आहे. येथील शंकर-विष्णू यांच्या मूर्तीही सुंदर आहेत. इथे प्रसाद म्हणून भ्नतांना वाळू दिली जाते.दक्षिण टाेकाचे तीन विशाल सागर आपल्या तिरंग्याप्रमाणे एकता दर्शवीत आहेत. भारतीयांना एकतेचा मंत्र देत आहेत. निसर्गाचे हे विलाेभणीय दर्शन घेण्यासाठी कन्याकुमारीला अवश्य जावे.