बैठे काम करणाऱ्यांना थ्राॅम्बाेसिसचा विकार

    31-Oct-2023
Total Views |
 
 

health 
 
ई-थ्राॅम्बाेसिस म्हणजे काय? ही एक वैद्यकीय अवस्था असून त्यात सतत बसून काम करणाऱ्यांच्या शरीरात प्रामुख्याने पायात र्नत गाेठतं. सतत लांबचा विमान प्रवास करणाऱ्यांमध्येही या आजाराची लक्षणं दिसून येतात.डाॅक्टर म्हणतात, जर र्नतवाहिन्यात र्नताची माेठी गुठळी निर्माण झाली, तर ती घातक ठरू शकते. आपल्या हृदयाची उजवी बाजू डाव्या बाजूपेक्षा अधिकच कमकुवत असल्याने जास्त धाेका असताे.माणसाला ज्यावेळी हार्ट अटॅक येताे, तेव्हा हृदयाचं नुकसान टाळण्यासाठी डाॅक्टरांना वेळ मिळू शकताे; मात्र थ्राॅम्बाेसिसमध्ये हृदयाचं कायमस्वरुपी नुकसान हाेण्याची शक्यता असते.
 
काय काळजी घ्याल?
 एकाच ठिकाणी अनेक तास बसून काम करू नका.
 बसूनच काम करण्याचं स्वरुप असेल तर दर अर्ध्या तासाने किमान तीन मिनिटं चाला.शरीराला अ‍ॅक्टिव्ह ठेवा.
 सहकाऱ्यांसाेबत संवाद साधण्यासाठी इंटरकाॅमचा वापर न करता प्रत्यक्ष भेटा.
 भरपूर पाणी प्या. जेणेकरून वाॅशरुमपर्यंत चालण्याचा तुम्हाला व्यायाम करावाच लागेल.
 दर दाेन तासांनी पाय-हात आणि शरीराला स्ट्रेचिंगचा व्यायाम द्या.म्हणजे र्नत गाेठण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण हाेईल.
 हात-पाय साथ देत नसले तरी शक्यताे एलिव्हेटर्सपेक्षा जिन्याचाच वापर करा.