भगवान गाैतम बुद्धांना ज्या महाबाेधी वृक्षाच्या छायेत सिद्धी मिळाली, त्या वृक्षाच्या फांदीचे राेपण नाशिकमध्ये हाेणे हा ऐतिहासिक क्षण आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याचे ठिकाण आणि धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकची यामुळे वेगळी ओळख निर्माण हाेईल. बाेधी वृक्षामुळे नाशिक जगाच्या नकाशावर पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येणार असल्याचा विश्वास बाेधी वृक्ष फांदीराेपण कार्यक्रमात व्य्नत झाला.केंद्र आणि राज्य सरकार बुद्धिस्ट सर्किटअंतर्गत पर्यटनाला चालना देत आहे. वेरूळ व अजिंठा लेण्यांना भेट; तसेच पर्यटनासाठी बाैद्ध अभ्यासक माेठ्या संख्येने येतात. बाेधी वृक्षामुळे अभ्यासक आणि पर्यटक नाशिककडे आकर्षित हाेतील. हे स्थळ बुद्धिस्ट सर्किटमध्ये समाविष्ट करण्याचा विचार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सुरू केला आहे.
महाराष्ट्र शासन आणि शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने त्रिरश्मी बुद्धलेणी परिसरात श्रीलंकेतील अनुराधापूर येथील बाेधी वृक्षाच्या फांदीचे राेपण करण्यात आले. यावेळी श्रीलंकेतील बाेधी वृक्षाचे प्रमुख हेमरत्न नायक थेराे, केंद्रीय आराेग्यराज्यमंत्री डाॅ. भारती पवार, अन्न, नागरी पुरवठामंत्री तथा कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, पर्यटन मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे उपस्थित हाेते.थायलंड, काेरिया, म्यानमार, मलेशिया, जपान, तैवान, व्हिएतनाम या देशांतील भन्ते व उपासक, बाैद्ध अनुयायीही माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. कार्यक्रमापूर्वी बाेधी वृक्षाच्या फांदीची मिरवणूक काढण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दृक्श्राव्य माध्यमातून संवाद साधला.
येथे लावण्यात आलेले बाेधी वृक्षाचे राेपटे भारत आणि श्रीलंकेतील संबंध अधिक समृद्ध करण्यासाठी आणि दाेन्ही देशांमधील संबंध सुधारण्याचा सेतू ठरेल, अशी अपेक्षा श्रीलंकेचे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विदुरा विक्रमनायके यांनी व्य्नत केली.सुमारे 2300 वर्षांपूर्वी भारतातून श्रीलंकेत नेण्यात आलेले राेपटे आता पुन्हा भारतात नाशिकमध्ये आणले जात आहे, मानवी जीवनात मनाने मनाशी साधलेला संवाद महत्त्वाचा आहे. बाेधी वृक्ष शांततेचे प्रतीक आहे. या कार्यक्रमामुळे अनुराधापूर आणि नाशिकबराेबरच भारत आणि श्रीलंकेचे ऋणानुबंध अधिक दृढ हाेतील, असा विश्वास त्यांनी व्य्नत केला.