गज म्हणजे हत्ती हे श्री लक्ष्मीचे वाहन आहे. ‘ज्याच्या पाठीवर स्वतः श्री लक्ष्मी विराजमान आहे, त्या हत्तीच्या शेपटीचा केस असलेली अंगठी म्हणजे गजांत अंगठी’. त्यामुळे या अंगठीशी अनेकांच्या श्रद्धा आणि भावना जाेडलेल्या आहेत.असे असूनही काही जणांनी या ‘गजांत अंगठी’ची भ्रष्ट नक्कल करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.या अंगठीमध्ये हत्तीचे केस उपयाेगात आणण्याऐवजी प्लास्टिकचा दाेरा किंवा काळ्या रंगाचे रबर वापरल्याचेही माझ्या कानावर आले आहे. तीच फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी थाेडी खबरदारी घेणे आवश्यक आहे, असा सूचनावजा सल्ला पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ जितेंद्र घाेडके यांनी दिला आहे.या ‘गजांत अंगठी’चे वैशिष्ट्य आणि इतर माहिती देताना जितेंद्र घाेडके म्हणाले, ‘ही अंगठी तयार करण्यासाठी हत्तीच्या शेपटीचा केस उपयाेगात आणला जाताे.
खरेतर, हेच या अंगठीचे वैशिष्ट्य आहे.हत्तींची संख्या इंडाेनेशिया, थायलंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि केनिया या देशांमध्ये भरपूर आहे. त्यामुळे हे केस मिळवण्यासाठी मला त्या देशांमध्ये जावे लागते. खरे केस तेथून घेऊन यावे लागतात.साहजिकच, अशी खरीखुरी अंगठी अगदी हजार-दाेन हजार रुपयांमध्ये मिळूच शकत नाही, हे ध्यानात घेऊनच अंगठीची भ्रष्ट नक्कल करणाऱ्यांपासून ग्राहकांनी सावध राहायला हवे. हा प्रश्न फक्त पैशांचा नाही, तर ग्राहकांच्या भावनेशी खेळ करण्याचा आहे. ताे थांबवलाच पाहिजे’.
जितेंद्र घाेडके यांचे नाव महाराष्ट्रभर अनेक ग्राहकांच्या मनात ‘गजांत अंगठी’मुळे कायमस्वरूपी ठसलेले आहे.
वर्ष 2005 पासून त्यांनी शेकडाे लाेकांना ‘गजांत अंगठी’ तयार करून दिलेली आहे. साहजिकच, ज्या ग्राहकांना अंगठी तयार करून घ्यायची असते, ते लाेक दिवाळीचा मुहूर्त चुकला तरीही वर्षभर जितेंद्र घाेडके यांच्याशी संपर्कात असतात आणि बुकिंगसाठी वाट पाहात असतात.‘अनेक ग्राहकांनी गणेशाेत्सवापासून ‘गजांत अंगठी’साठी ऑर्डर द्यायला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षीपेक्षा ग्राहकांचा प्रतिसाद वाढलेलाच आहे’, असे सांगून जितेंद्र घाेडके म्हणाले, ‘ही वैशिष्ट्यपूर्ण अंगठी आहे. ती याेग्य मापाचीच करावी लागते. कारण, त्यात हत्तीचा केसदेखील याेग्य मापाचा असताे. त्यामुळे एकदा अंगठी तयार झाल्यानंतर ती लहान किंवा माेठी करता येत नाही. त्यामुळे ऑर्डर देणेच याेग्य ठरते’.