तणावाचा शरीरावरही प्रतिकूल परिणाम हाेताे

21 Oct 2023 23:29:56



Stress
 
 
मानसशास्त्र, मेंदूविज्ञान आणि मानसिक आराेग्य याबाबत सातत्याने संशाेधन हाेत असून, त्यातून या संदर्भातील अनेक बाबी समाेर येत आहेत. जगभर चालू असलेल्या संशाेधनातून तणाव आणि त्याचा मानवी शरीरावर हाेणारा परिणाम याबाबत नवीन आकडेवारी आणि माहिती समाेर येत आहे. त्यातून तणावाचा आपल्या शरीरावर वेगवेगळ्या मार्गांनी कसा प्रतिकूल परिणाम हाेत असताे आणि त्यातून दैनंदिन जीवनावर काय परिणाम हाेताे, हे समजणे श्नय झाले आहे.दैनंदिन जीवनात आपला मूड आहार पचन आणि झाेप यावर देखील तणावाचा अतिशय प्रतिकूल परिणाम हाेत असताे. तणावाचे हे वरवर दिसणारे परिणाम आहेत. या संदर्भातील अधिक डेटा आणि आकडेवारी समाेर आल्यानंतर मानवी शरीरावर तणावाचा किती व्यापक परिणाम हाेत असताे हे समजण्यास मदत हाेणार आहे.तणावाचा आपल्या शरीरावर किती प्रकारे परिणाम हाेताे याविषयी....

1) शारीरिक लक्षणे : शांत व गाढ झाेप न लागणे, थकल्यासारखे वाटणे, नीट पचन न हाेणे, पाेटाच्या तक्रारी, डाेकेदुखी, सांधेदुखी आणि वेदना, घाम येणे, हातपाय थरथरणे, श्वास घेण्यात अडचणी, प्रतिकारशक्ती कमी हाेणे, संसर्ग लवकर हाेणे, दुखणे आणि वेदना स्पष्ट न करता येणे, अशी शारीरिक लक्षणे तणावामुळे दिसू लागतात.

2) मानसिक लक्षणे : कामात मन एकाग्र न हाेणे, काही गाेष्टी विसरणे, लक्षात न राहणे, निर्णय घेण्यात अडचणी येणे, संभ्रम आणि घाबरल्यासारखे वाटणे.

3) वर्तनातील लक्षणे : सतत अस्वस्थता वाटणे, नखे खाणे, भूक न लागणे, अवेळी खाणे, मद्यपानाचे प्रमाण वाढणे, अमली पदार्थांचे सेवन करणे किंवा धूम्रपान वाढणे.

4) भावनिक लक्षणे : नैराश्य येणे, संयम नसणे, काही झाले की डाेळ्यात पाणी येणे आणि रडायला सुरुवात करणे, लवकर राग येणे.

चांगला आणि वाईट तणाव : जेव्हा आपण समाेरच्या मागण्यांचा किंवा सातत्याने विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा सामना करत असताे, तेव्हा नैसर्गिक प्रतिसाद म्हणून तणाव निर्माण झाल्याची जाणीव हाेते. जेव्हा आपल्या क्षमतेपेक्षा जास्त मागण्या समाेरून येत राहतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपण वैयक्तिक किंवा इतरांच्या मदतीने आवश्यक त्या गाेष्टी किंवा साधनसामग्रीची जाेडणी करू शकत नसताे तेव्हा व्यक्तीला तणाव जाणवताे. तणावापासून सुटका हाेणे श्नय नसते.आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटना, परिस्थिती ही काही प्रमाणात तणाव घेऊन आलेलीच असते. उदाहरणार्थ कुटुंबातील लग्न समारंभ ही आनंदाची गाेष्ट असते. मात्र ताे समारंभ व्यवस्थित पार पडेल की नाही या काळजीने कुटुंबातील काही सदस्यांच्या मनात तणाव निर्माण झालेला असताे किंवा अशा कार्यक्रमांमध्ये कुठले कपडे परिधान करावेत, कशी स्टाईल करावी, लग्न समारंभातील फाेटाेसाठी कसे तयार व्हावे या गाेष्टी देखील अनेक दांपत्यासाठी तणावाच्या ठरतात.

सध्या तणाव हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनलेला आहे. ताे नकारात्मक अनुभव असला, तरी त्याचे परिणाम टाळणे श्नय नसते. त्याला वाईट तणाव असे म्हटले जाते. आपण त्याबाबत काळजी घेणे याेग्य ठरते. जेव्हा वाईट तणावाची तीव्रता जास्त असते, मात्र ती अल्पकालावधीसाठी असते तेव्हा त्याला अ‍ॅ्नयुट स्ट्रेस असे म्हटले जाते. जेव्हा ही तीव्रता कमी स्वरूपाची असते आणि जास्त काळासाठी असते तेव्हा त्याला क्राेनिक स्ट्रेस असे म्हटले जाते. आणि हा क्राेनिक स्ट्रेस अनेक समस्यांचे, आजारांचे आणि व्याधींचे मूळ ठरताे.

मनुष्याला तणावाला अनेक गाेष्टींमुळे सामाेरे जावे लागते. तणाव हा अंतर्गत तसेच बाह्य स्वरूपातही जाणवताे. तणामुळे आयुष्यात माेठे बदल घडतात. कामाच्या ठिकाणची परिस्थिती आव्हानात्मक बनते. व्यक्ती-व्यक्तींमधील नात्यांमध्ये तणाव वाढताे. घरामध्ये मतभेद आणि संघर्ष निर्माण हाेताे. संवादात अडचणी निर्माण हाेतात.आर्थिक ताण निर्माण हाेताे. या सगळ्या गाेष्टी बाह्य तणावाची उदाहरणे आहेत. सतत चिंता करत राहणे आणि निराशावादी दृष्टिकाेन असणे, अव्यवहार्य अपेक्षा ठेवणे, विचारात, वागण्यात लवचिकता नसणे यामुळे देखील अंतर्गत तणाव जाणवताे.तणावापासून मुक्ती मिळवण्याचे 12 मार्ग...

1) नियमित व्यायामामुळे आणि घाम गाळण्यामुळे तुमच्या शरीरावरील तणाव कमी हाेण्यास मदत हाेते.
2) ध्यानधारणा आणि श्वसनाचे व्यायाम यामुळे तुम्ही एकाग्रता आणि मन शांत ठेवण्याच्या दिशेने काम करू लागता.
3) संतुलित आणि पाैष्टिक आहार हा आराेग्यासाठी अतिशय आवश्यक असताे.
4) उत्तेजक पेय, अमली पदार्थ, व्यसने, धूम्रपान, मद्यपान टाळावे.
5) शांत आणि गाढ झाेप ही शरीर आणि मेंदूसाठी अतिशय आवश्यक असते.
6) तुम्हाला ज्यापासून आनंद मिळताे, अशा अ‍ॅ्निटव्हिटी करा. त्या नियमित करा जेणेकरून तुमच्या मनावरील ताण हलका हाेईल.
7) स्वतःसाठी वेळ काढा. असे करणे अजिबात स्वार्थीपणाचे नसते. दिवसातील एक ते दाेन तासांचा वेळ स्वतःसाठी काढून त्या काळात आपल्याला आवडणाऱ्या गाेष्टी करणे तणाव कमी हाेण्यासाठी पूरक ठरते.
8) ब्रेक घ्या. कुठलीही कामे करत असताना दीड ते दाेन तासांनी ब्रेक घेणे आणि 100 ते 200 पावले चालून फ्रेश हाेणे, हातपाय स्ट्रेच करणे यामुळेदेखील तणाव कमी हाेण्यास मदत हाेते.
9) तुमच्या कुटुंबात जर का मानसिक आराेग्यचा इतिहास असेल किंवा आनुवंशिकता असेल, तर याबाबत तुम्ही तज्ज्ञांची मदत घ्या. मानसाेपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्या.
10) कुठल्याही गाेष्टीचे व्यसन लावून घेऊ नका. अनेकदा आपण चहा, काॅफी किंवा आराेग्यासाठी घातक असणाऱ्या गाेष्टी सतत करत राहताे.त्या टाळल्या पाहिजेत.
11) माइंड फुलनेस.मनाची जागरूकता ही तणावावर मात करण्यासाठी अतिशय आवश्यक असते.जेव्हा तुम्हाला अचानक डाेकेदुखी, पाेटदुखी जाणवू लागते, तेव्हा ती तणावाची लक्षणे आहेत. याबाबत सजगता दाखवून संतुलन साधने आवश्यक ठरते.
Powered By Sangraha 9.0