‌‘गजांत अंगठी'च्या बुकिंगला मिळत आहे नेहमीसारखाच प्रचंड प्रतिसाद

14 Oct 2023 15:41:55
 
rings
 
पुणे, 13 ऑक्टोबर (आ.प्र.) :
 
दिवाळीच्या निमित्ताने अनेक प्रकारचे दागिने लोक नव्याने खरेदी करतात. त्यात जशी हौस असते तशीच गुंतवणुकीची इच्छादेखील असते. दिवाळीसारखे निमित्त हे अशा खरेदीला उपयोगी ठरत असते. मात्र, आपली गुंतवणूक वाढली पाहिजे आणि समृद्धी यायला हवी, अशा इच्छेनेही काहीजण लक्ष्मीपूजन करत असतात. त्यासाठी इतर दागिन्यांसोबतच ‌‘गजांत अंगठी'चे पूजन करून ती परिधान करण्यालाही गेल्या काही वर्र्षांत ग्राहकांची पसंती वाढलेली आहे. साहजिकच, या अंगठीच्या बुकिंगला प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे, अशी माहिती पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक आणि मे. पिंपळदास सीताराम घोडकेचे, (सोन्या मारुती चौक) व्यवस्थापक जितेंद्र घोडके सराफ यांनी दिली आहे.
 
गेल्या काही वर्षांपासून पुण्यातील सराफ बाजारात ‌‘गजांत अंगठी' आणि जितेंद्र घोडके हे एक वेगळेच समीकरण बनले आहे. त्यामुळेच ज्यांना गजांत अंगठी तयार करून घ्यायची असते, ते ग्राहक अगदी गणेशोत्सवापासूनच या अंगठीची ऑर्डर देत असतात. दरवर्षी दिवाळीच्या काळात अशा शेकडो ‌‘गजांत अंगठी' ग्राहक बनवून घेत असतात. ऐन दिवाळीत धावपळ नको म्हणून काही ग्राहकांनी आत्तापासूनच या अंगठीची ऑर्डर नोंदवायला सुरुवात केलेली आहे. या ‌‘गजांत अंगठी'चे वैशिष्ट्य आणि इतर माहिती देताना जितेंद्र घोडके म्हणाले, ही अंगठी तयार करण्यासाठी हत्तीच्या शेपटीचा केस उपयोगात आणला जातो, हेच तिचे वेगळेपण आहे. इंडोनेशिया, थायलंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि केनिया या देशांमध्ये हत्तींची संख्या भरपूर आहे. त्यामुळे हे केस मिळवण्यासाठी मी त्या देशांमध्ये जाऊन येतो.
 
 
j
 
 
जितेंद्र घोडके
व्यवस्थापक 
 
ही ‌‘गजांत अंगठी' स्त्रियांसाठी अंदाजे 4 ग्रॅममध्ये, तर पुरुषांसाठी 5 ग्रॅममध्ये तयार केली जाते. सोने किंवा चांदी यांचे वजन आणि त्या अंगठीमध्ये जडवलेल्या हत्तीच्या केसांची संख्या, यानुसार अंगठीची किंमत कमी-अधिक होऊ शकते. जितेंद्र घोडके म्हणाले, ज्यांनी पूर्वी ही अंगठी धारण केली आहे, असे ग्राहक त्यांना आर्थिकदृष्ट्या लाभ झाल्याचे सांगतात. तेच आमचे खरे ‌‘ब्रँड ॲम्बेसिडर' आहेत. त्यामुळे मी त्यांना नाराज करत नाही. ही अंगठी सोन्यामध्येच करायला हवी, असा आग्रह नाही. चांदीमध्येही अंगठी तयार करून घेतली तरी चालते, असे मी सांगतो. कारण अंगठी परिधान केल्यानंतर येणारा अनुभव चांगला असतो आणि ती व्यक्ती पुढील वर्षी सोन्याची अंगठी तयार करून घेते, हा माझा खात्रीशीर अनुभव आहे. पुण्यामध्ये सोन्या मारुती चौकातील मे. ‌‘पिंपळदास सीताराम घोडके' या पेढीवर मी स्वतः नेहमीच उपलब्ध असतो. कारण ती आमची मूळची पेढी आहे. 1926 मध्ये माझ्या पूर्वजांनी सुरू केलेल्या या पेढीला पुढील काळात शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे याच पेढीवर ग्राहकांची भेट घेण्यासोबत तेथेच त्यांच्याकडून अंगठीची ऑर्डर स्वीकारत आहे.
 
 
आम्हाला लोकांच्या ‌‘श्रद्धेचा बाजार' मांडायचा नाही ‌‘गजांत अंगठी' ही लक्ष्मीपूजनामध्येच पूजा करुन हातात परिधान केली जाते. पंचांगानुसार हा अमावास्येचा मुहूर्त आहे. निव्वळ व्यावसायिक विचार केला तर वर्षभरात 12 अमावास्या येतात. पण म्हणून आम्ही प्रत्येक अमावास्येला ‌‘गजांत अंगठी' विक्रीचा निव्वळ व्यवसाय करत नाही. ग्राहकांची कितीही मागणी आली तरीही आम्ही वर्षभरात फक्त एकदाच या अंगठ्या तयार करुन देतो. कारण आम्हाला लोकांच्या श्रद्धेचा खेळ करायचा नाही. ही अंगठी परिधान करणारी व्यक्ती चांगला विचार करत असते. त्यांची समृद्धी ही आम्हालाही लाभदायी ठरते. त्यामुळेच आम्ही हे पथ्य नक्की पाळतो आणि वर्षभरात फक्त एकदाच अंगठी तयार करुन देतो. या अंगठीचा आकार कमी-जास्त करता येत नाही. त्यामुळे ही ‌‘गजांत अंगठी' माप देऊनच तयार करून घ्यावी लागते. ‌‘गजांत अंगठी'ची ऑर्डर देण्यासाठी सध्या चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
 
मे. पिंपळदास सीताराम घोडके & सन्स, 820, सोन्या मारुती चौक, लक्ष्मी रोड, बुधवार पेठ, पुणे. मोबाइल : 8390212143, दूरध्वनी : 020-24480536
 
 
Powered By Sangraha 9.0