तूळ

    09-Jan-2023
Total Views |
 
 
तूळ
 
1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023
 
प्राॅपर्टी, संततिसाैख्यासाठी शनी अनुकूल राहणार
 

Saggitarious 
 
तूळ ही राशी चक्रातील सातवी रास आहे. ‘तराजूची दाेन पारडी’ हे या राशीचे प्रतीक आहे. शुक्र या ग्रहाचे या राशीवर स्वामित्व आहे. ही रास साैंदर्याची देवता म्हणून ओळखली जाते. ही पुरुष रास आहे.तसेच रजाेगुणी, वायुतत्त्वाची व चर रास आहे. मनुष्य व प्राणी यामध्ये जर काेणता फरक असेल, तर ताे हा की, मनुष्य हा बाैद्धिक व कलेची भूक असलेली व्यक्ती आहे. नाटक, सिनेमा, रंगभूमी, चित्रपटसृष्टी, नृत्य, काव्य, चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला, संगीत, कथा, काव्य हे तूळ व्यक्तींचे विशेष आहेत. साहित्य व संगीत यांची ज्यांना आवड नाही त्यांची संभावना पंडितांनी पशूत केली आहे. संगीत, वाद्य, चित्रपट व नाट्य यांची माेहिनी तुळा व्यक्तींना जन्मजात असते.
 
साैंदर्याचे, निसर्गाचे खरे रसिक आपणच असता. आपली साैंदर्याची अभिरुची ही अभिजात असते. एखाद्या गाण्याचे, काव्याचे, चित्राचे व शिल्पाचे रसग्रहण आपणच करू शकता. केवळ पैसा व संपत्ती हे आपले ध्येय असत नाही. सुंदर वृक्षराजी, निळे हिरवे डाेंगर, विस्तीर्ण जलाशय, सराेवरे, अथांग सागर, आकाशाचे विविध रंग, विस्तीर्ण बागा, माेराचे नृत्य, मधुर संगीत यामुळे वेडे हाेणारे व त्यात रसिकतेने आकंठ बुडणाऱ्या व्यक्ती म्हणजे तुळा राशीच्या व्यक्ती हाेत. जीवनातील, काव्यातील, निसर्गातील, साहित्यातील साैंदर्य आपण रसिकतेने टिपता. त्याचा खराखुरा आस्वाद घेता. या साऱ्याला लागणारी उत्कट मनाेवृत्ती, तरल संवेदना व मनस्वी स्वभाव या गाेष्टी आपणाला जन्मजात मिळालेल्या आहेत.
 
नि:पक्षपातीपणा व न्यायाची आवड या गाेष्टी आपल्याकडे जन्मजात आहेत.समताेल वृत्तीबद्दल आपण प्रसिद्ध असता. काेणत्याही घटनेत, विचारात व प्रसंगात अटीतटीची भूमिका न घेणे, टाेकापर्यंत न ताणणे, दुराग्रही वृत्ती न ठेवणे हा स्वभाव आहे. स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुभाव ही तत्त्वे आपल्या राेमाराेमात भिनली आहेत.ज्याला इंग्रजीमध्ये ‘गाेल्डन मीन’ म्हणतात ताे आपण नेहमी स्वीकारता. सर्वत्र तडजाेड, वैचारिक देवाण-घेवाण, मिळतेजुळते घेण्याची वृत्ती, लाेकशाहीवादी वृत्ती, परमताबद्दल सहिष्णुता व आदर, दुसऱ्या व्यक्तीची प्रतिष्ठा सांभाळण्याबद्दल आपला असलेला आग्रह यामुळे सर्वत्र आपले स्वागत हाेते. आपल्या हातून चुका झाल्या, तरी त्या प्रांजळपणे, प्रामाणिकपणे, उघडपणे कबूल करण्याचा मनाचा माेठेपणा आपल्याकडे आहे.
 
जीवनातील सारी द्वंद्वे व त्यातील सीमारेषा आपणास ठाऊक आहेत. न्याय व अन्याय, सत्य व असत्य, सुंदर व असुंदर, खाेटेपणा व खरेपणा यातील सीमारेषा व या साऱ्यांच्या मर्यादा आपणाला ठाऊक आहेत. आपली रास ही सहवासप्रिय व समाजप्रिय अशी आहे. जीवन कसे जगायचे, याची खरी कला आपणालाच उमगलेली असते.जीवनातील ताल व ताेल आपण बराेबर सांभाळलेला असताे. काेणत्याही गाेष्टीचा साधकबाधकपणे, शांतपणे व चाैेर विचार केल्याशिवाय निर्णय न घेण्याची आपली पद्धत आहे. जीवनातील विसंगतीतून सुसंगती, अस्थिरतेतून स्थिरता, अव्यवस्थेतून सुव्यवस्था या गाेष्टी आपण निर्माण करू शकता.
आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता व शुद्ध प्रेम याचे आपण भाेक्ते असता.
 
श्रीमंत व्यक्तीपेक्षा आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी, दिलदार अंत:करणाची, उदार मनाची माणसे आपणाला हवीत. असे मित्र आपणाला हवेत. अत्यंत न्यायनिष्ठूर अशी आपली रास आहे. त्याचबराेबर गरिबांचे, दीनदुबळ्यांचे अश्रू पुसणारी आपली रास आहे.इतरांच्या सुखात सुख व दुसऱ्यांच्या दु:खात दु:ख मानणारी आपली रास आहे. तुळा ही रास याेगी पुरुषाची रास आहे. स्थितप्रज्ञांची रास आहे. आसक्ती व अनासक्ती यातील खरे मर्म आपण ओळखलेले असते. आपल्याकडे श्रद्धा आहे, भक्ती आहे.
सुख व दु:ख, आशा व निराशा, जय-पराजय, स्तुती-निंदा, यश-अपयश या दाेन्ही प्रसंगी आपली वृत्ती समताेल असते.
 
खाेटेपणा, मायावीपणा, नकलीपणा, ढाेंगीपणा याचा आपणाला तिरस्कार आहे. कारुण्याने ओथंबणारी, दुसऱ्याच्या दु:खाने मनात कष्टी हाेणारी, साधुत्वाची पूजा करणारी आपली रास आहे. काेणत्याही प्रसंगात, संकटात कासवासारखी धीमेपणाने वाटचाल करणारी आपली रास आहे. ब्रह्मदेवाने, विधात्याने अत्यंत काैशल्याने व परिश्रमाने तुळा राशीची निर्मिती केलेली आहे.ताजमहालासारखी, काेहिनूर हिऱ्यासारखी किंवा राजा रविवर्माच्या कुंचल्यातून निर्माण झालेली कलाकृती म्हणजे तुळा रास. तुळा रास म्हणजे मानवी जीवनातील एक माेठे वैभवच आहे.प्रेम, पावित्र्य, सात्त्विकता, शुद्धता, निर्मळता, सुंदरता, आकर्षकता यातून न्हाऊन निघालेली आपली रास आहे.
 
प्रसन्नतेने चमकणारी, आनंदाने कार्य करणारी, आशावादी दृष्टिकाेन ठेवून अखिल मानव जातीची सेवा करणारी, मानवतेवर विश्वास ठेवणारी आपली रास आहे. भूतदया, शांती, क्षमाशीलता, प्राणिमात्रावर प्रेम हे साऱ्या साधुत्वाचे गुण आपल्याकडे आहेत.
जीवनातील, काव्यातील, निसर्गातील साैंंदर्य टिपण्यास, त्याचा आस्वाद घेण्यास लागणारी संवेदनक्षमता परमेश्वराने आपणास उपजतच बहाल केलेली आहे. आपल्या बाेलण्या, वागण्यात माधुर्य आहे. गाेडवा आहे. त्यामुळे आपण सर्वांना हवेहवेसे वाटता.
आपण समाजप्रिय आहात. सहवासप्रिय आहात. आपल्या कार्यक्षेत्रात लाेकप्रिय आहात.मांगल्यावर, शुचित्वावर, सत्यावर, न्यायावर आपली श्रद्धा असते. ‘सत्यम शिवम सुंदरम’ या तत्त्वावर व मूल्यावर आपला गाढ विश्वास असताे. आपण शुद्ध प्रेमाचे भुकेले असता. प्रेम, पावित्र्य, सुंदरता, सात्त्विकता यामध्ये न्हाऊन निघालेली आपली रास आहे. आपली सदसद्विवेक बुद्धी सतत जागृत असते.
 
सार्वजनिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रात ज्या व्यक्ती पुढे आलेल्या आहेत, ज्यांनी काेणत्याही एका क्षेत्रात आपली नाममुद्रा उमटवली आहे अशा बऱ्याचशा व्यक्ती या तूळ राशीच्या आहेत. विशेषत: कला, संगीत, नाट्य या क्षेत्रामध्ये तुळा व्यक्ती या पुढे आलेल्या आहेत. राजकीय क्षेत्र असाे, सामाजिक क्षेत्र असाे किंवा कलेचे क्षेत्र असाे, तुळा व्यक्ती या आपआपल्या क्षेत्रामध्ये आपल्या बुद्धिमत्तेमुळे, आपल्या जन्मजात अंगभूत गुणांमुळे त्या क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटविल्याशिवाय राहणार नाहीत. कारण तूळ ही रास अत्यंत समाजप्रिय आहे. अनेक गुणांनी समन्वित अशी ही रास आहे. त्यामुळे तुळा राशीच्या व्यक्तींना आपआपल्या क्षेत्रात यश हे लाभतेच. सफलता मिळते.
 
 आराेग्य आराेग्याच्या दृष्टीने तूळ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष चांगले आहे. मुळातच तुळा राशीच्या व्यक्तींचे आराेग्य हे सामान्यत: चांगले असते. दि. 17/01/2023 ला शनी पाचव्या स्थानात कुंभ राशीत जाणार आहे. त्यामुळे आता या वर्षी आराेग्यावर व मानसिक स्थितीवर प्रतिकूल परिणाम हाेणार नाही. या वर्षी काहींच्या जीवनात अनुकूल मानसिक परिवर्तनाची शक्यता आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल.
 
खालील कालखंड आराेग्याच्या दृष्टीने चांगले आहेत.
दि. 01/01/2023 ते दि. 14/02/2023
दि. 02/05/2023 ते दि. 02/11/2023
 
वरील सर्व कालखंड हे तूळ राशीच्या व्यक्तींना आराेग्याच्या दृष्टीने चांगले आहे.खालील कालखंड आराेग्याच्या दृष्टीने प्रतिकूल आहे.
दि. 03/11/2023 ते दि. 28/11/2023
 
 व्यवसाय, उद्याेग, आर्थिक स्थिती
 
व्यवसाय, उद्याेग, व्यापार, आर्थिक स्थिती या दृष्टीने तुळा राशीच्या व्यक्तींना हे वर्ष समाधानकारक आहे. या वर्षी तुमचे व्यवसायातील निर्णय अचूक ठरणार आहेत. अंदाज बराेबर येणार आहेत. आर्थिक लाभाच्या दृष्टीने संपूर्ण वर्ष चांगले आहे.
कामगार, गडी, नाेकर यांचे सहकार्य वर्षभर लाभेल. शत्रुपीडा नाही. तूळ राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभाच्या दृष्टीने, व्यवसाय वाढण्याच्या दृष्टीने हे वर्ष खूपच चांगले जाईल. आराेग्याची साथ लाभणार आहे. व्यवसायातील निर्णय व अंदाज अचूक ठरणार आहेत. या वर्षी आपण प्रत्येक गाेष्टीचा साधकबाधक विचार करून निर्णय घ्याल व या अचूक निर्णयाचा ायदा आर्थिक लाभाच्या दृष्टीने हाेईल. उधारी, उसनवारी वसूल हाेईल. व्यवसायात अनेकांचे सहकार्य लाभेल. संपूर्ण वर्ष आर्थिक लाभाच्या दृष्टीने तूळ राशीच्या व्यक्तींना चांगले जाणार आहे.
 
खालील कालखंड आपणाला आर्थिक बाबतीत विशेष लाभदायक ठरतील.
दि. 01/01/2023 ते दि. 14/02/2023
दि. 13/03/2023 ते दि. 30/05/2023
दि. 16/06/2023 ते दि. 16/09/2023
दि. 01/10/2023 ते दि. 01/11/2023
दि. 01/12/2023 ते दि. 23/12/2023
 
खालील कालखंडात आर्थिक व्यवहार करताना विशेष सावधगिरी बाळगावी.
दि. 19/08/2023 ते दि. 03/10/2023
 
खालील कालखंडात आर्थिक व्यवहार करताना किंवा शेअर्समध्ये धाडस करताना विशेष काळजी घ्यावी. हाही कालखंड थाेडासा संमिश्र स्वरूपाचा आहे. त्याच्यामुळे तुमच्या स्वत:च्या व्यवसायातील दैनंदिन अभ्यास हा महत्त्वाचा आहे. फक्त विचार करून निर्णय घ्यावा.
दि. 17/11/2023 ते दि. 26/12/2023
 
 नाेकरी
 
नाेकरीतील तूळ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष समाधानकारक आहे. तुम्हाला मिळणारे काम हे विशेष करून बाैद्धिक दर्जाचे असेल. या वर्षी तुमचे अंदाज, निर्णय अचूक ठरतील. तुम्हाला मिळणारे काम हे अधिक वैचारिक दर्जाचे असेल. दि. 21/04/2023 पूर्वीच्या कालखंडात आपणाला बढतीची शक्यता आहे. एकूणच हे वर्ष नाेकरीतील व्यक्तींना समाधानकारक ठरेल. वरिष्ठांचे चांगले सहकार्य लाभेल. वरिष्ठांच्या बराेबरची कामाची चर्चा ही स्नेहपूर्ण राहील.
 
खालील कालखंड नाेकरीतील व्यक्तींना प्रगतिकारक ठरतील.
दि. 01/01/2023 ते दि. 21/01/2023
दि. 14/04/2023 ते दि. 24/05/2023
दि. 16/06/2023 ते दि. 16/07/2023
 
खालील कालखंड नाेकरीच्या संदर्भात तूळ राशीच्या व्यक्तींना प्रतिकूल आहेत. त्यामुळे खालील कालखंडात आपण अतिशय जागरूकतेने व सावधगिरीने राहावयास हवे.
दि. 17/07/2023 ते दि. 17/09/2023
दि. 16/11/2023 ते दि. 27/12/2023
 
वरील कालखंड पूर्णपणे प्रतिकूल नाही; परंतु वरील कालखंडात चढ-उतार हाेऊ शकताे. काही गाेष्टी चांगल्या घडतील. काही गाेष्टी त्रासदायक ठरतील.कालखंड पूर्णपणे प्रतिकूल नाही.
 
 प्राॅपर्टी
 
प्राॅपर्टी, गुंतवणूक या संदर्भात मात्र तूळ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष चांगले आहे.समाधानकारक आहे. गुंतवणुकीलाही चांगले आहे. प्राॅपर्टी व गुंतवणुकीच्या दृष्टीने तुळा राशीच्या व्यक्तींना हे वर्ष यशदायक आहे. तुमचे प्राॅपर्टी संदर्भातील निर्णय याेग्य ठरणार आहेत. तुमची प्राॅपर्टीच्या संदर्भातील स्वप्ने व मनाेरथ फलदायक हाेणार आहेत. या वर्षी प्राॅपर्टी घेण्यासाठी लागणारी रक्कम सहजपणे उपलब्ध हाेईल. गुंतवणुकीलाही हे वर्ष चांगले आहे.
 
खालील कालखंड प्राॅपर्टीला व गुंतवणुकीला चांगले आहेत.
दि. 01/01/2023 ते दि. 21/01/2023
दि. 07/02/2023 ते दि. 26/02/2023
दि. 13/03/2023 ते दि. 05/04/2023
दि. 01/06/2023 ते दि. 05/07/2023
दि. 08/08/2023 ते दि. 01/10/2023
दि. 01/12/2023 ते दि. 24/12/2023
 
 संततिसाैख्य
 
संततिसाैख्य, मुलामुलींची प्रगती, मुलामुलींचे शाळा, काॅलेजमधील यश, नाेकरी, व्यवसायातील संधी या सर्व दृष्टीने तूळ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष चांगले आहे.समाधानकारक आहे. या वर्षाची मुलामुलींची प्रगती चांगली राहणार आहे व टिकून राहणार आहे. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. विद्यार्थ्यांची प्रगती चांगली असेल.या वर्षीचे निर्णय तुम्ही जबाबदारीने व गांभीर्याने व विचारपूर्वक घ्याल. संततिसाैख्याच्या दृष्टीने तूळ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष अपेक्षेपेक्षा चांगले जाईल. मुलामुलींची शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी व नाेकरी, व्यवसायातील यश हे सुखावह ठरणार आहे. त्यांची प्रगती ही संताेष देणारी ठरेल. विद्यार्थ्यांना विशेष यश मिळेल. या वर्षी विद्यार्थी आपल्या क्षेत्रात अपूर्व कामगिरी करून दाखवू शकतील.
 
खालील कालखंड संततिसाैख्याच्या दृष्टीने चांगले आहेत.
दि. 23/01/2023 ते दि. 14/02/2023
दि. 28/02/2023 ते दि. 15/03/2023
दि. 02/05/2023 ते दि. 01/07/2023
दि. 19/08/2023 ते दि. 01/11/2023
दि. 16/11/2023 ते दि. 27/12/2023
 
खालील कालखंड संततिसाैख्याच्या दृष्टीने काही प्रमाणात प्रतिकूल आहेत.त्यामुळे एखादी गाेष्ट, घटना प्रतिकूल हाेण्याची शक्यता आहे.
दि. 17/11/2023 ते दि. 26/12/2023
 
 वैवाहिक साैख्य
 
वैवाहिक साैख्य, विवाहेच्छूंचे विवाह या दृष्टीने तूळ राशीच्या व्यक्तींना दि. 21/04/2023 नंतरचा कालखंड चांगला आहे.
विवाहेच्छू मुलामुलींचे विवाह जमण्याच्या व हाेण्याच्या दृष्टीने वर्षभर गुरुबळ आहे; परंतु विशेषत: दि. 21/04/2023 नंतर गुरूची अनुकूलता अधिक आहे. मात्र, वैवाहिक साैख्याच्या दृष्टीने हे वर्ष काही प्रमाणात प्रतिकूल आहे. विवाहेच्छूंचे विवाह सहजासहजी ठरणार नाहीत. ज्यांच्या वैवाहिक जीवनात मूळचेच मतभेद आहेत ते या वर्षी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयम, विवेक, परस्परांना समजून घेण्याची व मतभेद विचारविनिमयाने कमी करण्याची आवश्यकता आहे. अर्थात मतभेद ार टाेकाला जातील असे नाही.
 
खालील कालखंड वैवाहिक साैख्याच्या दृष्टीने चांगले आहेत.
दि. 14/03/2023 ते दि. 17/08/2023
दि. 04/10/2023 ते दि. 15/11/2023
 
खालील कालखंड वैवाहिक साैख्याच्या दृष्टीने प्रतिकूल आहेत.
दि. 01/01/2023 ते दि. 13/03/2023
दि. 18/08/2023 ते दि. 03/10/2023
दि. 16/11/2023 ते दि. 27/12/2023
 
वरील कालखंडात वैवाहिक जीवनातील मतभेद सामंजस्याने मिटविणे हे अधिक चांगले आहे. अर्थात मतभेद ार तीव्र स्वरूपाचे राहतील असे नाही.
 
 प्रवास
 
प्रवास, तीर्थयात्रा या दृष्टीने तूळ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष समाधानकारक आहे.
शिक्षण, व्यापार, सहली व तीर्थयात्रा या दृष्टीने हे वर्ष साैख्यकारक आहे. प्रवास, तीर्थयात्रा, सहली, परदेश प्रवास या दृष्टीने तूळ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष विशेष संधी उपलब्ध करून देणारे ठरेल. परदेश प्रवासाचे याेग निश्चित येणार आहेत. या वर्षी तुमच्या प्रवासामध्ये नातेवाईक व मित्र असण्याची शक्यता अधिक आहे. विशेषत: विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी मिळणार आहे. तसेच डाॅक्टर्स व उद्याेगपती यांनाही या वर्षी व्यवसायातील व मेडिकल क्षेत्रातील नवीन ज्ञान मिळण्याच्या दृष्टीने परदेश प्रवासाची संधी लाभणार आहे.
 
खालील कालखंड हे प्रवास, तीर्थयात्रा या दृष्टीने चांगले आहेत.
दि. 01/01/2023 ते दि. 12/02/2023
दि. 13/03/2023 ते दि. 09/05/2023
दि. 01/06/2023 ते दि. 17/08/2023
 
खालील कालखंडात प्रवासात व वाहने चालवताना विशेष काळजी घ्यावी.
दि. 19/08/2023 ते दि. 02/10/2023
दि. 16/11/2023 ते दि. 27/12/2023
 
 सुसंधी, प्रसिद्धी, लेखन, साहित्य
 
सुसंधी, प्रसिद्धी, अंगीकृत कार्यात यश या दृष्टीने हे वर्ष तूळ राशीच्या व्यक्तींना खूपच समाधानकारक जाणार आहे. विशेषत: बाैद्धिक, शैक्षणिक, साहित्य, संशाेधन या क्षेत्रातील व्यक्तींना हे वर्ष प्रगतिकारक ठरणार आहे. या वर्षीचे कार्य मूलभूत स्वरूपाचे व शाश्वत स्वरूपाचे हाेईल. लेखक व साहित्यिक यांना हे वर्ष विशेष चांगले आहे. कला, संगीत, नाट्य, अभिनय व प्रसारमाध्यमे या क्षेत्रातील व्यक्तींना तुमच्या आशाआकांक्षा, स्वप्ने व मनाेरथ पूर्ण करणारे हे वर्ष आहे.
  
खालील कालखंड सुसंधी, प्रसिद्धी या दृष्टीने चांगले आहेत.
दि. 01/01/2023 ते दि. 11/03/2023
दि. 03/05/2023 ते दि. 29/05/2023
दि. 25/06/2023 ते दि. 07/07/2023
दि. 25/07/2023 ते दि. 01/11/2023
 
 नातेसंबंध व आवक-जावक यांचा ताळमेळ
 
मानवी जीवनात अनेक प्रश्न असतात. आर्थिक प्रश्नांमुळेही मानसिक त्रास हाेताे; पण त्या पेक्षाही कुटुंबातील आई, वडील, बहीण, भाऊ, मुले, मुली, नात्यातील काका, मामा, मावशी व मित्र, हाताखालील कामगार, व्यवसायातील भागीदार व नाेकरीतील, वरिष्ठ, कनिष्ठ या सर्वांचे संबंध येतच असतात. जीवनामध्ये खरे त्रास हाेतात ते नातेसंबंधातच हाेतात. एखादा अनेक वर्षांचा जवळचा मित्र त्याच्याबराेबर जर गैरसमज झाले व मैत्रीपूर्ण असलेले संबंध बिघडले, तर माेठ्या प्रमाणावर मानसिक त्रास हाेताे.कुटुंबातील इतर अडचणी, आर्थिक प्रश्नाच्या संदर्भातील, नाेकरीच्या संदर्भातील काही प्रश्न, समस्या असल्या तर त्या आपण इतरांशी बाेलू शकताे, चर्चा करू शकताे; परंतु नातेसंबंध इतके नाजूक असतात, हळवे असतात, इतके भावपूर्ण असतात, उत्कट असतात, की त्याला जर धक्का लागला, तर भावनाप्रधान व्यक्तींना त्याचा विशेष त्रास हाेताे.
 
तूळ राशीच्या व्यक्तींना नातेवाईक, मित्र, सहकारी, काैटुंबिक जीवनातील व्यक्ती, नाेकरीतील वरिष्ठ व हाताखालील व्यक्ती या सर्वांचे चांगले सहकार्य लाभणार आहे. नातेवाइकांचा सल्ला लाभदायक ठरेल. तुमच्या अडचणीच्या प्रसंगी नातेवाइकांची तुम्हाला बहुमाेल मदत लाभेल. संकटाच्या काळात मित्र धावून येतील. मित्रांचे सहकार्य अत्यंत माेलाचे ठरणार आहे. या वर्षी नवीन मित्र जाेडू शकाल.नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. तुमचे अनुभवाचे विश्व व्यापक हाेणार आहे.जमा-खर्चाची ताेंडमिळवणी या वर्षी व्यवस्थित हाेणार आहे. संपूर्ण वर्षभर आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. उधारी, उसनवारी वसूल हाेईल. मनाचा विकास हाेणे, मानसिक अनुकूल परिवर्तन हाेणे, काही चांगल्या गाेष्टी जीवनात घडणे या दृष्टीने हे वर्ष चांगले आहे. काहींच्या हातून या वर्षी लेखनाच्या, साहित्याच्या व बाैद्धिक क्षेत्रात माैलिक कामगिरी हाेईल. या वर्षी मानसिक उत्साह व उमेद वाढणार आहे. या वर्षाकडे आशेने व अपेक्षेने पाहाण्यास हरकत नाही.
 
 प्रतिष्ठा, मानसन्मान
 
सार्वजनिक जीवनात यश, अधिकारपद, राजकीय जीवनात प्रतिष्ठा, अधिकारपद, मानमान्यता या दृष्टीने तूळ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष समाधानकारक आहे. दि.21/04/2023 पूर्वीचा कालखंड हा सार्वजनिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना विशेष चांगला आहे. दि. 21/04/2023 पर्यंतच्या कालखंडात आपणाला आपल्या क्षेत्रामध्ये अधिकार मिळेल, पद मिळेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.कर्तृत्वाला संधी मिळेल. तुमच्या आजपर्यंतच्या कार्याचे व अनुभवाचे चीज हाेईल.
मानसन्मानाचे याेग येतील.
 
खालील कालखंड प्रतिष्ठा, मानसन्मान या दृष्टीने चांगले आहेत.
दि. 01/01/2023 ते दि. 16/02/2023
दि. 11/05/2023 ते दि. 29/06/2023
दि. 01/07/2023 ते दि. 17/08/2023
 
खालील कालखंड संमिश्र स्वरूपाचा आहे.
दि. 18/08/2023 ते दि. 16/09/2023
 
तूळ राशीच्या व्यक्तींना खालील कालखंड हे भाग्यकारक ठरतील. या कालखंडात उत्साह वाढेल, उमेद वाढेल. अपेक्षित गाठीभेटी व पत्रव्यवहार हाेईल, अनेकांचे सहकार्य लाभेल. रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे.
 
दि. 05/01/2023 ते दि. 12/01/2023
दि. 01/02/2023 ते दि. 08/02/2023
दि. 01/03/2023 ते दि. 07/03/2023
दि. 28/03/2023 ते दि. 04/04/2023
दि. 24/04/2023 ते दि. 01/05/2023
दि. 22/05/2023 ते दि. 28/05/2023
दि. 18/06/2023 ते दि. 25/06/2023
दि. 15/07/2023 ते दि. 22/07/2023
दि. 12/08/2023 ते दि. 18/08/2023
दि. 08/09/2023 ते दि. 14/09/2023
दि. 05/10/2023 ते दि. 12/10/2023
दि. 02/11/2023 ते दि. 08/11/2023
दि. 29/11/2023 ते दि. 05/12/2023
दि. 26/12/2023 ते दि. 31/12/2023