कन्या

06 Jan 2023 16:59:14
 
 
1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023
 
कन्या
 

Horocope 
 
आराेग्य आणि वैवाहिक, संततिसाैख्यासाठी अनुकूल काळ
 
कन्या ही राशी चक्रातील सहावी रास आहे. ‘हातात ुलाची ांदी घेतलेली कन्या’ हे या राशीचे प्रतीक आहे. बुध या ग्रहाचे या राशीवर स्वामित्व आहे. ही पृथ्वी तत्त्वाची द्विस्वभाव व स्त्री रास आहे. बुध या ग्रहाची सत्ता या राशीवर असल्यामुळे बाैद्धिक क्षेत्राला प्राधान्य हे या राशीचे वैशिष्ट्य आहे. आपल्याकडे ज्ञानलालसा आहे, कुशाग्र बुद्धिमत्ता, तीव्र स्मरणशक्ती, कल्पकता, नवीन शाेध, सतत नावीन्याचा शाेध, नवनवीन कल्पना यासाठी आपली ख्याती असते. बुद्धीचे चातुर्य याचा अर्थ केवळ बुद्धिमत्ता नव्हे, तर त्यामध्ये कल्पकता, चातुर्य, शहाणपणा या गाेष्टींचा अंतर्भाव हाेत असताे. आपल्याला काेणताही विषय अवघड नसताे. काेणताही विषय आपणाला अगम्य नसताे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपण रस घेऊ शकता, ज्ञान संपादन करू शकता व त्यामध्ये यश मिळवू शकता.
 
प्रत्यक्ष एखाद्या चळवळीच्या अग्रभागी राहण्यापेक्षा एखाद्या राजकीय पक्षाचे किंवा एखाद्या संस्थेचे नेतृत्व करण्यापेक्षा, पडद्यावर प्रत्यक्ष चमकण्यापेक्षा पडद्यामागे राहून सूत्रे हलविणारी अशी ही रास आहे. किंग हाेण्यापेक्षा किंगमेकर हाेणे आपणाला ार आवडते. प्रत्येक गाेष्टीचे आपले निरीक्षण चाैेर असते. उद्याेगपतींचे, राजकीय व्यक्तींचे सल्लागार कन्या राशीचे असण्याची शक्यता असते. प्रत्यक्ष लढण्यापेक्षा शांतिदूताचे काम, तडजाेडीचे काम आपले असते. कल्पकता, दूरदर्शीपणा व सावधपणा हे आपले वैशिष्ट्य आहे. प्रत्येक गाेष्टीची चिकित्सा करण्याकडे आपला कल आहे.मुत्सद्दी, परराष्ट्र वकील, शिक्षक, प्राध्यापक, वकील, बँकर्स, मुद्रक, प्रकाशक हे आपले व्यवसाय असू शकतात. त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची शक्यता अधिक असते. सेवावृत्तीने राहण्याची प्रवृत्ती असते.
 
काेणत्याही ग्रंथाचे, घटनेचे समीक्षक म्हणून आपण याेग्य मूल्यमापन करू शकता.ज्ञानार्जन करणे किंवा ज्ञानदान करणे हे खरे आपले जीवित कार्य असते. हृदयापेक्षा, भावनेपेक्षा आपण विचारांना अधिक किंमत देता. शिक्षक, प्राध्यापक, वृत्तपत्र संपादक, वृत्तपत्र स्तंभलेखक, ग्रंथवाचक, ग्रंथप्रेमी ही आपली खास ओळख असते. आपल्या राशीला प्रत्येक गाेष्टीत गती असते. माेठमाेठ्या संस्थेचे, बँकेचे प्रबंध तयार करून देणे, नियाेजन करणे, विश्लेषण करणे हे आपले खरे कार्य असते.कन्या ही निसर्गाची आवडती रास आहे. त्यामुळे कन्या राशीच्या व्यक्ती या तुलनेने अधिक चिरतरुण दिसतात. आपले व्यक्तिगत ग्रंथालय हे समृद्ध असते, संपन्न असते. कारखान्याचा किंवा व्यवसायाचा प्राेजेक्ट रिपाेर्ट करणे, जमा-खर्च करणे, अंदाजपत्रक करणे या गाेष्टींमध्ये आपणाला विशेष यश मिळते.
 
आपण प्रतिष्ठेला अधिक महत्त्व देत असता. त्यामुळे कन्या राशीच्या व्यक्ती सहसा काेर्ट-कचेरीच्या प्रकरणापासून लांब राहण्यात समाधान मानतात.आपल्याकडे धूर्तपणा असताे, कावेबाजपणा असताे, मुत्सद्दीपणा असताे. जिद्द, चिकाटी, धाडस, साहस हे यशस्वी व्यवसायासाठी आवश्यक गुण आहेत. त्यामुळे ार माेठे दीर्घकाळचे काम अवलंबून ते करत राहण्याचा आपल्याला कंटाळा असताे.बुद्धिमत्ता हे आपले भांडवल असल्यामुळे आपण बैठ्या खेळाला प्राधान्य देता. कन्या ही रास स्त्रियांना अधिक चांगली असते. कन्या राशीच्या स्त्रिया माेठ्या प्रमाणावर कारकून, शिक्षक, प्राध्यापक, वकील, संपादक, पत्रकार, प्रवचनकार, व्याख्याते या दृष्टीने काम करू शकतात.
 
ही रास बुधाच्या अमलाखालील आहे. अर्थतत्त्वाची ही रास आहे. प्रपंच आदर्शरीतीने करणाऱ्यांची ही रास आहे. बँकिंग, विमा, वृत्तपत्र, कायदा, वाचनालय ही आपली खरी क्षेत्रे आहेत. कन्या राशीच्या व्यक्ती या इतरांचे अनुकरण करतात.त्यामुळे सहसा फसण्याची शक्यता कमी असते. अंदाजपत्रक ठेवणे, जमा-खर्च करणे, गूढ विद्या, ज्याेतिष, काेणत्याही संस्थेची व्यावहारिक बाजू आपण अतिशय मनापासून करता. कन्या राशीच्या स्त्रिया या अधिक अविवाहित राहिलेल्या दिसून येतात. माेठ्या व्यक्तींबद्दल यांच्या मनात प्रेम निर्माण झाले, तर त्या मदत करतात. निसर्गत:च आपली काैटुंबिक स्थिती चांगली असते. मानसशास्त्र, ज्याेतिष, अंकगणित, स्टॅटिस्टिक हे आपले आवडीचे विषय हाेत. कन्या राशीच्या व्यक्ती आपल्या प्रेमाचे प्रदर्शन करत नाहीत. मात्र इतरांनी आपणाला समजून घ्यावे, अशी यांची कल्पना असते.
 
ही बुधाची अर्थतत्त्वाची रास असल्यामुळे कन्या व्यक्ती या माेठ्या प्रमाणावर श्रीमंत असतात. कन्या राशीच्या स्त्रिया आपल्या घरातील किंवा घराबाहेरील लाेकांना मदत करत असतात व आपले पती-पत्नीमधील कलह कधीही चव्हाट्यावर आणणार नाहीत. कन्या राशीच्या स्त्रियांकडे अधिक याेजकता असते. व्यवहार दक्षता, याेजकता व अंथरूण पाहून पाय पसरण्याची आपली पद्धत असते. चारित्र्याच्या संदर्भात कन्या राशीच्या स्त्रिया या अत्यंत प्रसिद्ध असतात. पती कसाही असला, तरी केवळ प्रतिष्ठेकरिता कन्या राशीच्या स्त्रिया त्याबद्दल तक्रार करणार नाहीत. मात्र, विवाह झाल्यावर कन्या राशीच्या स्त्रिया प्रपंच उत्तम करू शकतात.
 
 
 आराेग्य
 
आराेग्याच्या दृष्टीने दि. 21/04/2023 पूर्वीचा कालखंड हा अधिक चांगला आहे. त्यानंतरच्या काळात मात्र, आपण आराेग्याकडे विशेष लक्ष द्यावयास हवे. अर्थात या वर्षी आपणाला ार माेठे आजार हाेणार नाहीत. आजारावर नियंत्रण राहणार आहे. आराेग्याच्या दृष्टीने हे वर्ष कन्या राशीच्या व्यक्तींना बरेच प्रतिकूल आहे.शनी आठव्या स्थानात व दि. 22/04/2023 नंतर गुरू आठव्या स्थानात अशी स्थिती आहे. त्यामुळे आराेग्याच्या दृष्टीने दि. 21/04/2023 पूर्वीचा कालखंड हा समाधानकारक असेल. आराेग्याकडे या वर्षी कन्या राशीच्या व्यक्तींनी कटाक्षाने लक्ष द्यावयास हवे. शनीची बाराव्या स्थानावर दृष्टी व तिसऱ्या स्थानावर दृष्टी व गुरू अष्टमात ही स्थिती ारशी चांगली नाही. बरेचसे तुमच्या मूळच्या पत्रिकेवर अवलंबून राहील. ज्यांची मूळची प्रकृती ही नाजूक आहे त्यांनी प्रकृतीकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
 
खालील कालखंड आराेग्याच्या दृष्टीने चांगले आहेत.
 
दि. 01/01/2023 ते दि. 05/02/2023
दि. 17/03/2023 ते दि. 30/05/2023
दि. 25/06/2023 ते दि. 07/07/2023
दि. 26/07/2023 ते दि. 01/10/2023
दि. 19/10/2023 ते दि. 06/11/2023
 
खालील कालखंड आराेग्याच्या दृष्टीने त्रासदायक आहे.
 
दि. 28/02/2023 ते दि. 15/03/2023
 
 व्यवसाय, उद्याेग, आर्थिक स्थिती
 
व्यवसायाच्या दृष्टीने कन्या राशीच्या व्यक्तींना हे वर्ष समाधानकारक आहे.विशेषत: प्राॅपर्टी, जागा, जमिनी, वाहने, बिल्डर्स, डेव्हलपर्स, काॅन्ट्रॅक्टर्स व सप्लायर्स यांना विशेष यश मिळणार आहे. या वर्षी आपणाला गडी, नाेकर, कामगार यांचे सहकार्य लाभणार आहे. या वर्षी ार शत्रुपीडा संभवत नाही. मात्र, या वर्षी निर्णय चुकण्याची शक्यता आहे. तेव्हा माेठे आर्थिक निर्णय घेताना किंवा शेअर्सचे व्यवहार करताना अधिक काळजी घ्यावयास हवी. प्राॅपर्टीच्या बराेबर कागद, स्टेशनरी, बुकसेलर्स, प्रकाशन, कायदा, अकाैंटन्सी, विमा, शैक्षणिक व बाैद्धिक क्षेत्र या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश लाभेल. तसेच खानावळ, रेस्टाॅरंट, हाॅटेल, कापड, साैंदर्यप्रसाधने, ज्वेलर्स यांनाही यश लाभणार आहे.
 
खालील कालखंड आपणाला आर्थिक बाबतीत विशेष लाभदायक ठरतील.
 
दि. 01/01/2023 ते दि. 22/01/2023
दि. 07/02/2023 ते दि. 11/03/2023
दि. 17/03/2023 ते दि. 30/03/2023
दि. 07/04/2023 ते दि. 24/07/2023
दि. 07/08/2023 ते दि. 01/10/2023
दि. 19/10/2023 ते दि. 23/12/2023
 
खालील कालखंडात आर्थिक व्यवहार करताना विशेष सावधगिरी बाळगावी.
 
दि. 01/07/2023 ते दि. 17/09/2023
 
हा कालखंड संमिश्र स्वरूपाचा आहे. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी व माेठे आर्थिक व्यवहार करताना व धाडस करताना अधिक विचार करावा.
 
 
 नाेकरी
 
कन्या राशीच्या नाेकरीतील व्यक्तींना हे वर्ष सर्वसामान्य आहे. ार माेठ्या यशाची अपेक्षा करण्यासारखे हे वर्ष नाही. नाेकरीतील कन्या राशीच्या व्यक्तींना बढती मिळणे, उच्च जागेवर नाेकरी करण्याची संधी मिळणे, त्यांना या वर्षीचे ग्रहमान सामान्य आहे. काहींना बदलीच्या प्रश्नांना सामाेरे जावे लागेल. नाेकरीमध्ये मनस्ताप हाेणे, शारीरिक स्वास्थ्य बिघडणे, अशा गाेष्टी संभवू शकतात. या वर्षी तुमचे नाेकरीतील वैचारिक पद्धतीही चुकण्याची शक्यता आहे, निर्णय चुकण्याची शक्यता आहे. आपल्या वरिष्ठ पदावर असलेल्या व्यक्ती किंवा आपल्या हाताखालील व्यक्तींचे याेग्य मूल्यमापन हाेऊ शकणार नाही. त्यामुळे तुम्ही या वर्षी अधिक सावधगिरी, अधिक जागरूकता बाळगावयास हवी. या वर्षी पगारवाढ किंवा काेणत्याही आर्थिक लाभाची अपेक्षा करणे चुकीचे ठरेल.
 
खालील कालखंड नाेकरीतील व्यक्तींना प्रगतिकारक ठरतील.
 
दि. 01/01/2023 ते दि. 06/02/2023
दि. 13/03/2023 ते दि. 09/05/2023
दि. 16/06/2023 ते दि. 15/07/2023
दि. 01/10/2023 ते दि. 17/10/2023
 
खालील कालखंड नाेकरीच्या सदंर्भात कन्या राशीच्या व्यक्तींना प्रतिकूल आहेत.त्यामुळे खालील कालखंडात आपण अतिशय जागरूकतेने व सावधगिरीने राहावयास हवे.
 
दि. 17/08/2023 ते दि. 17/09/2023
दि. 16/11/2023 ते दि. 27/12/2023
 
 प्राॅपर्टी
 
प्राॅपर्टी, गुंतवणूक या संदर्भात कन्या राशीच्या व्यक्तींना हे वर्ष समाधानकारक आहे. ज्यांना फ्लॅट, बंगला, जागा, जमीन घ्यायची आहे, त्यांना खालील कालखंड सुखावह ठरतील. प्राॅपर्टीच्या दृष्टीने हे वर्ष अनुकूल नाही. तसे ारसे प्रतिकूलही नाही. सर्वसामान्य आहे. ज्यांना प्राॅपर्टीचे व्यवहार करणे गरजेचेच आहे, गुंतवणुकीचे व्यवहार करणे गरजेचेच आहे, त्यांना खालील कालखंड उपयुक्त ठरतील. ज्यांना प्राॅपर्टीचे व्यवहार करणे गरजेचे आहे त्यांनी विशेषत: दि. 21/04/2023 पूर्वीच प्राॅपर्टीचे व्यवहार उरकून घ्यावेत.
 
खालील कालखंड प्राॅपर्टीच्या दृष्टीने अनुकूल आहेत.
 
दि. 01/01/2023 ते दि. 26/02/2023
दि. 16/03/2023 ते दि. 30/03/2023
दि. 07/04/2023 ते दि. 05/07/2023
दि. 02/10/2023 ते दि. 17/10/2023
 
 संततिसाैख्य
 
संततिसाैख्य, मुलामुलींची प्रगती, मुलामुलींचे शाळा, काॅलेजमधील यश, नाेकरी, व्यवसायातील संधी या सर्व दृष्टीने कन्या राशीच्या व्यक्तींना हे वर्ष सर्वसामान्य आहे.दि. 01/01/2023 ते दि. 21/04/2023 हा कालखंड काहीसा समाधानकारक राहील. मात्र, या वर्षात विद्यार्थ्यांना अतिशय अधिक परिश्रम करावे लागतील. शाळा, काॅलेजमधील प्रवेश, परीक्षेचे निकाल, नाेकरीमधील बढती, व्यवसायात वाढ या संदर्भात मुलामुलींच्याकडून ार अपेक्षा नकाे. हे वर्ष खूपच सामान्य आहे. तरीही खालील कालखंड संततिसाैख्याला व मुलामुलींच्या प्रगतीला अनुकूल आहेत.
 
खालील कालखंड संततिसाैख्याच्या दृष्टीने चांगले आहेत.
 
दि. 01/01/2023 ते दि. 21/01/2023
दि. 07/02/2023 ते दि. 26/02/2023
दि. 17/03/2023 ते दि. 30/03/2023
दि. 07/04/2023 ते दि. 01/05/2023
दि. 08/07/2023 ते दि. 24/07/2023
दि. 02/10/2023 ते दि. 05/11/2023
 
 
 
 वैवाहिक साैख्य
 
वैवाहिक साैख्य, विवाहेच्छूंचे विवाह या दृष्टीने कन्या राशीच्या व्यक्तींना दि.21/04/2023 पूर्वीचा कालखंड हा अधिक साैख्यकारक ठरणार आहे. विवाहेच्छू मुलामुलींचा साखरपुडा, विवाह, काेणतेही शुभ कार्य यासाठी फक्त दि. 21/04/2023 पूर्वीचाच कालखंड अनुकूल आहे. त्यामुळे जी काही शुभ कार्ये करायची असतील ती दि. 21/04/2023 पूर्वीच करायची आहेत. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे. त्यासाठी संयम, विवेक, सहनशीलता या गाेष्टींची विशेष गरज आहे.
 
खालील कालखंड वैवाहिक साैख्याच्या दृष्टीने चांगले आहेत.
 
दि. 01/01/2023 ते दि. 21/01/2023
दि. 16/02/2023 ते दि. 11/03/2023
दि. 07/04/2023 ते दि. 29/06/2023
दि. 15/08/2023 ते दि. 30/09/2023
 
खालील कालखंड वैवाहिक साैख्याच्या दृष्टीने प्रतिकूल आहेत.
 
दि. 01/07/2023 ते दि. 14/08/2023
दि. 01/11/2023 ते दि. 27/12/2023
 
 
 प्रवास
 
प्रवास, तीर्थयात्रा या दृष्टीने हे वर्ष समाधानकारक आहे. विशेषत: दि. 21/04/2023 पूर्वीचा कालखंड हा प्रवास, तीर्थयात्रा, परदेश प्रवास यासाठी विशेष अनुकूल आहे.तीर्थयात्रेचे विशेष याेग येतील.
 
खालील कालखंड हे प्रवास, तीर्थयात्रा या दृष्टीने चांगले आहेत.
 
दि. 01/01/2023 ते दि. 21/03/2023
दि. 01/06/2023 ते दि. 05/07/2023
दि. 04/10/2023 ते दि. 15/11/2023
 
खालील कालखंड प्रवासाच्या दृष्टीने प्रतिकूल ठरेल.
 
दि. 06/07/2023 ते दि. 19/09/2023
दि. 16/11/2023 ते दि. 27/12/2023
दि. 13/03/2023 ते दि. 05/04/2023
 
 सुसंधी, प्रसिद्धी, लेखन, साहित्य
 
सुसंधी, प्रसिद्धी, अंगीकृत कार्यात यश या दृष्टीने हे वर्ष कन्या राशीच्या व्यक्तींना समाधानकारक आहे. कारण बाैद्धिक क्षेत्र, साहित्य, संशाेधन, प्रकाशन व कला या क्षेत्रात मुळात उपजतच आपली प्रगती असते. त्यामुळे यासाठी हे वर्ष समाधानकारक ठरेल.
 
खालील कालखंड सुसंधी, प्रसिद्धी या दृष्टीने चांगले आहेत.
 
दि. 01/01/2023 ते दि. 30/03/2023
दि. 05/04/2023 ते दि. 04/07/2023
दि. 06/08/2023 ते दि. 01/10/2023
दि. 02/10/2023 ते दि. 05/11/2023
 
 नातेसंबंध व आवक-जावक यांचा ताळमेळ
 
मानवी जीवनात अनेक प्रश्न असतात. आर्थिक प्रश्नामुळेही मानसिक त्रास हाेताे.पण, त्यापेक्षाही कुटुंबातील आई, वडील, बहीण, भाऊ, मुले, मुली, नात्यातील काका, मामा, मावशी व मित्र, हाताखालील कामगार, व्यवसायातील भागीदार व नाेकरीतील, वरिष्ठ, कनिष्ठ या सर्वांचे संबंध येतच असतात. जीवनामध्ये खरे त्रास हाेतात ते नातेसंबंधातच हाेतात. एखादा अनेक वर्षांचा जवळचा मित्र त्याच्याबराेबर जर गैरसमज झाले व मैत्रीपूर्ण असलेले संबंध बिघडले, तर माेठ्या प्रमाणावर मानसिक त्रास हाेताे.कुटुंबातील इतर अडचणी, आर्थिक प्रश्नाच्या संदर्भातील, नाेकरीच्या संदर्भातील काही प्रश्न असले, समस्या असल्या, तर त्या आपण इतरांशी बाेलू शकताे, चर्चा करू शकताे.
 
परंतु, नातेसंबंध इतके नाजूक असतात, हळवे असतात, इतके भावपूर्ण असतात, उत्कट असतात, की त्याला जर धक्का लागला, तर भावनाप्रधान व्यक्तींना त्याचा विशेष त्रास हाेताे. या वर्षी कन्या राशीच्या व्यक्तींना आपले जे जवळचे नातेवाईक आहेत, त्यांचे सहकार्य लाभणार आहे. त्यांचा सल्ला, मार्गदर्शन लाभदायक ठरणार आहे व अडचणीला त्यांची मदतही लाभणार आहे. काही जणांचे नातेवाइकांबराेबर जर मतभेद असतील, मग ते इस्टेटीच्या संदर्भातील असाे, आर्थिक संदर्भातील असाे, तर ते मतभेद मिटण्याची शक्यता आहे. मात्र, हा कालखंड दि. 21/04/2023 पूर्वीचा आहे. दि. 22/04/2023 पासून नातेसंबंधात ार माेठे साैख्य लाभणार नाही. दि. 22/04/2023 नंतरच्या कालखंडात नातेसंबंध बिघडणार आहेत.
 
नात्यातील व्यक्तींकडून सहकार्याची अपेक्षा करू नका. विशेषत: दि. 16/11/2023 ते दि. 26/12/2023 हा कालखंड नात्याच्या संदर्भात मनस्तापाचा ठरण्याची शक्यता आहे. या वर्षी दि. 17/01/2023 पासून वर्षअखेरपर्यंत शनी सहाव्या स्थानात, तर दि. 22/04/2023 पासून वर्षअखेरपर्यंत गुरू आठव्या स्थानात, ही स्थिती आर्थिकबाबतीत ारशी चांगली नाही. सिंह राशीच्या व्यक्तींनी या वर्षी आर्थिक क्षेत्रात आपण काही तरी भरीव कामगिरी करू शकू, ार माेठे लाभ मिळवू, यश मिळवू अशा प्रकारची अपेक्षा करणे हे याेग्य ठरणार नाही. तेव्हा या वर्षी आपण आपल्या अपेक्षा माफक ठेवाव्यात. अर्थात कन्या राशीच्या व्यक्तींना गुरू व शनी हे जरी ग्रह अनुकूल नसले, तरी बुध व शुक्र यांची भ्रमणे आपणाला लाभदायक ठरतील. तेव्हा ार माेठ्या पराकाेटीच्या प्रतिकूल परिस्थितीला सामाेरे जावे लागणार नाही.
 
 
 प्रतिष्ठा, मानसन्मान सार्वजनिक
 
जीवनात यश, अधिकारपद, राजकीय जीवनात प्रतिष्ठा, अधिकारपद, मानमान्यता या दृष्टीने कन्या राशीच्या व्यक्तींना हे वर्ष सर्वसामान्य आहे. त्यामुळे आपणाला या वर्षी विशेष यशाची, अधिकाराची, मानसन्मानाची अपेक्षा करता येण्यासारखे हे वर्ष नाही. त्यासाठी पुढील वर्षापर्यंत आपणास थांबावयास हवे. मात्र, या वर्षी जे कार्य कराल त्याचा ायदा पुढच्या वर्षी हाेईल.
 
खालील कालखंड प्रतिष्ठा, मानसन्मान यादृष्टीने अनुकूल आहेत.
 
दि. 13/03/2023 ते दि. 09/05/2023
दि. 24/06/2023 ते दि. 07/07/2023
दि. 01/10/2023 ते दि. 15/11/2023
 
खालील कालखंड संमिश्र स्वरूपाचे जातील.
 
दि. 08/07/2023 ते दि. 15/09/2023
दि. 16/11/2023 ते दि. 26/12/2023
 
कन्या राशीच्या व्यक्तींना खालील कालखंड हे भाग्यकारक ठरतील.या कालखंडात उत्साह वाढेल, उमेद वाढेल. अपेक्षित गाठीभेटी व पत्रव्यवहार हाेईल, अनेकांचे सहकार्य लाभेल. रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे.
 
दि. 03/01/2023 ते दि. 09/01/2023
दि. 30/01/2023 ते दि. 05/02/2023
दि. 26/02/2023 ते दि. 05/03/2023
दि. 26/03/2023 ते दि. 01/04/2023
दि. 22/04/2023 ते दि. 28/04/2023
दि. 20/05/2023 ते दि. 26/05/2023
दि. 16/06/2023 ते दि. 22/06/2023
दि. 13/07/2023 ते दि. 19/07/2023
दि. 09/08/2023 ते दि. 15/08/2023
दि. 06/09/2023 ते दि. 12/09/2023
दि. 03/10/2023 ते दि. 09/10/2023
दि. 30/10/2023 ते दि. 05/11/2023
दि. 27/11/2023 ते दि. 03/12/2023
दि. 24/12/2023 ते दि. 30/12/2023
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0