सिंह

    06-Jan-2023
Total Views |
 
1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023
 
सिंह
 

Horocope 
 
जबाबदारी वाढेल, सुसंधी लाभेल, निर्णय अचूक ठरतील सिंह ही राशी चक्रातील पाचवी रास आहे. जंगलाचा राजा ‘सिंह’ हे या राशीचे प्रतीक आहे. ही अग्नितत्त्वाची रास आहे. स्थिर रास आहे. तसेच अल्पप्रसव व वंध्या रास आहे. या राशीवर ‘रवी’ या ग्रहाचे स्वामित्व आहे. ‘रवी’ या ग्रहाचे या राशीवर स्वामित्व असल्यामुळे आपल्याकडे उदंड आत्मविश्वास आहे. महत्त्वाचे म्हणजे आपल्या स्वभावात स्वाभिमान खूप आहे. तेजस्वीपणा, चमकदारपणा, आकर्षकता व भव्यता ही आपल्या राशीची वैशिष्ट्ये आहेत. आपणाला स्वातंत्र्य प्रिय असते.इतर काेणाही व्यक्तीच्या हाताखाली काम करणे आपणाला आवडत नाही. इतर काेणाचेही स्वामित्त्व आपण खपवून घेऊ शकत नाही. आपल्या स्वत:च्या काही विशिष्ट कल्पना असतात.ही राज राशी आहे. त्यामुळे आपण मनाने उदार आहात, दिलदार आहात.
 
सिंह हा वनाचा राजा असताे. माझे जीवन व व्यक्तिमत्त्व स्वयंभू आहे हे जसे त्या सिंहाचे असते, तसेच आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल असते. या तुमच्या स्वभावामुळे लग्न समारंभ असाे, वाढदिवस असाे, साखरपुडा असाे, धार्मिक कार्यक्रम असाे किंवा काेणतेही मंगल शुभ कार्य असाे, सिंह राशीच्या घरामध्ये काेणतेही कार्य असले, काेणताही कार्यक्रम असला, तरी त्यामध्ये भव्यता, माेठेपणा, संपत्तीचा दिमाख, राजेशाही, श्रीमंत या गाेष्टी दिसून येणारच. सिंह व्यक्तींकडे संकुचितपणा, कमीपणा, क्षुद्रपणा, हलकटपणा या गाेष्टी दिसणार नाहीत.कर्णाने आपली कवचकुंडले काढून देताना मागेपुढे पाहिले नाही. त्याप्रमाणे आपले मित्र असाेत, नातेवाईक असाेत, सहकारी असाे, ज्या ज्या व्यक्ती अडचणीच्याप्रसंगी आपणाकडे येतील त्यावेळी आपण मुक्तहस्ताने त्यांना आपणाला जे काही शक्य आहे ते देत असता, मदत करत असता. उदात्त, भव्य व दिव्य याची आपणास जन्मजात आवड आहे.
 
ज्या ठिकाणी सिंह व्यक्तींना मान मिळणार नाही त्या ठिकाणी सिंह व्यक्ती िफरकणार नाहीत.सिंह रास ही नशीबवान रास आहे. ही राज राशी असल्यामुळे एखादी व्यक्ती जीवनाच्या सुरुवातीला कितीही खालच्या पदावर असली, तरी आपल्या केवळ राशीच्या प्रभावामुळे कालांतराने ती उच्च पदावर जाणार यात संशय नसताे. सत्ता, संपत्ती, कीर्ती या गाेष्टी कितीही मिळाल्या तरी सिंह व्यक्तींचे समाधान हाेत नाही.आपल्याकडे प्रचंड आत्मविश्वास आहे. दमदारपणा आहे. आशावाद आहे, उत्साह आहे. आपण मनाने सतत चिरतरुण असता. मनाने निराेगी असता. आपल्याकडे खिलाडू वृत्ती असते. आपली मते कायम व स्थिर स्वरूपाची असतात. आपले दुसरे वैशिष्ट्यम्हणजे आपला राग दीर्घकाळ टिकत नाही. एखाद्यावर आपण रागावला तरी लगेच क्षमा करणे हे आपले खास वैशिष्ट्य आहे.
 
सिंह व्यक्ती या अत्यंत धीराेदात्त स्वभावाच्या असतात. रघुवंशातील किंवा संस्कृत महाकाव्यातील अत्यंत श्रेष्ठ अशा कर्तबगार पुरुषांसारखे सिंह व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व असते. भावनाप्रधानता, मनस्वीपणा, उत्कटपणा हे आपले स्थायिभाव आहेत. आपल्या मनात काेणाबद्दल कपट नसते. मनाची अत्यंत प्रगल्भता, विचारांची तेजस्विता या गाेष्टी नियतीने आपणाला बहाल केलेल्या आहेत. परिवारातील सगळ्यांसाठी मनाने आपण मदत करत असता. काेणत्याही प्रसंगाला, संकटाला आपण धैर्याने सामाेरे जाता. संकटाच्या काळात हतबल हाेणे किंवा गळून जाणे हे आपल्या स्वभावात नाही. सतत आनंदीपणाने, आशावादीपणाने व निर्भयपणाने स्वतंत्र वृत्तीने आपण जगत असता.आपण स्तुतीप्रिय आहात. पूर्वीच्या राजे लाेकांच्या दरबारात सतत खुषमस्करी असायची. तसे आपल्या सभाेवतालच्या लाेकांनी आपली सतत खुषमस्करी करावी, स्तुती करावी, वाहवा करावी असे आपणाला वाटत असते. प्रेमसंबंधात आपण एकनिष्ठ असता.
 
आपल्या अवतीभाेवती सतत आपल्याबद्दल गाेड बाेलणारी, आपले दाेष न दाखवणारीही माणसे आपणाला हवीत. आपण दयाळू असता. पालक म्हणून आपण अत्यंत आदर्श असता. आपण मातृ-पितृ भक्त असता. शासकीय कामात आपणाला यश लाभत असते. थाेरामाेठ्यांची कृपा लाभते. वरिष्ठांची, वडीलधाऱ्यांची आपणाला सतत मदत मिळत असते. राजकारणात, सार्वजनिक कार्यात व वेगवेगळ्या शासकीय सेवेत अनेक सिंह व्यक्ती उच्चपद भूषवत असलेल्या दिसतील. आपल्या हातून काही चांगल्या चिरस्थायी गाेष्टी व्हाव्यात, आपल्या मागेही आपली कीर्ती राहावी असे आपणाला वाटत असते. काेणतेही काम आपण गतिमानतेने करत असता. स्वभावाने थाेडासा रागीटपणा आपल्यात असताे. आपण एखाद्यावर निष्ठा ठेवल्या तर ती निष्ठा शेवटपर्यंत ठेवत असता 
 
 आराेग्य
 
दि. 21/04/2023 नंतरचा कालखंड आराेग्याच्या दृष्टीने चांगला आहे.दि. 01/01/2023 ते दि. 20/04/2023 पर्यंतच्या कालखंडात आपणाला आराेग्याकडे लक्ष द्यावे लागेल. या वर्षी जबाबदारी वाढणार आहे. मग ही जबाबदारी काैटुंबिक जीवनातही असू शकते, नाेकरी, व्यवसायातही असू शकते, सार्वजनिक कार्यात असू शकते. यामुळे तुमचे वेळापत्रक, अंदाजपत्रक बदलू शकते. जबाबदारीमुळे कामाचा ताण वाढणार आहे. आराेग्याकडे या वर्षी आपण अधिक लक्ष द्यावे.
 
धावपळ हाेणार आहे. कामे मागे-पुढे हाेणार आहेत. त्यामुळे या वर्षी प्रत्येक गाेष्ट वेळापत्रकाप्रमाणे हाेईल अशी शक्यता कमी आहे. सिंह राशीच्या व्यक्ती दुसऱ्यांना उत्तम स्ूर्ती देऊ शकतात. दुसऱ्यांना चैतन्य देऊ शकतात, संजीवनी देऊ शकतात, नेतृत्व करणे हा त्यांचा जन्मजात हक्क आहे. सत्तेची वा अधिकाराची अनिवार लालसा सिंह राशीच्या व्यक्तींकडे असते. त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींचे नाेकरीत खालच्या पातळीवर किंवा कनिष्ठ पायरीवर वा दर्जावर कधी जमणार नाही. एकवेळ आपण पैशाचा माेह साेडाल; परंतु सत्ता आपणास हवीच.
 
खालील कालखंड आराेग्याच्या दृष्टीने अनुकूल आहेत.
 
दि. 01/01/2023 ते दि. 10/05/2023
दि. 17/08/2023 ते दि. 16/09/2023
दि. 17/12/2023 ते दि. 31/12/2023
 
खालील कालखंडात आपण आराेग्याकडे विशेष लक्ष द्यावे.
 
दि. 11/05/2023 ते दि. 29/06/2023
दि. 17/07/2023 ते दि. 16/08/2023
दि. 16/11/2023 ते दि. 15/12/2023
 
 
 व्यवसाय, उद्याेग, आर्थिक स्थिती
 
व्यवसाय, उद्याेग, आर्थिक स्थिती या दृष्टीने हे वर्ष समाधानकारक आहे.विशेषत: दि. 21/04/2023 नंतर आपणाला विशेष यश लाभणार आहे. दि.21/04/2023 नंतर व्यवसायातील आपले निर्णय अचूक ठरणार आहेत.दि. 21/04/2023 नंतर आपली वाटचाल याेग्य दिशेने सुरू राहील. सिंह राशीच्या व्यक्तींचे या वर्षीचे व्यवसायातील अंदाज व निर्णय अचूक ठरतील. दि.21/04/2023 नंतर तुमचा व्यवसायातील सर्व प्रवास याेग्य दिशेने चालणार आहे. दि. 17/01/2023 पासून बदलणारा शनी हा जबाबदारी वाढवणारा आहे. कामाचा ताण वाढवणारा आहे. काही वेळा चिंता करायला लावणारा आहे.
 
मात्र, कामाचा ताण वाढला, जबाबदारी वाढली, कटकटी वाढल्या तरीही आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. आर्थिक आवक चांगली राहणार आहे. उधारी, उसनवारी वसूल हाेईल. फक्त प्राॅपर्टी, जागा, जमिनी, वाहने, बिल्डर्स, डेव्हलपर्स व काॅन्ट्रॅक्टर्स यांनी मात्र या वर्षी व्यवहार करताना ार सावधगिरी बाळगली पाहिजे.सिंह राशीच्या व्यक्तींचे प्राॅपर्टी व वाहने या व्यवसायाच्या संदर्भातील वेळापत्रक व अंदाजपत्रक मागे-पुढे हाेणार आहे. तेव्हा ार माेठे धाडस करताना अधिक विचार करून मगच धाडस करावे.
 
खालील कालखंडात व्यवसाय व आर्थिक लाभाला चांगले आहेत.
 
दि. 01/01/2023 ते दि. 05/02/2023
दि. 16/02/2023 ते दि. 10/05/2023
दि. 01/07/2023 ते दि. 17/08/2023
दि. 02/10/2023 ते दि. 02/11/2023
 
खालील कालखंड संमिश्र स्वरूपाचे आहेत.
 
दि. 11/05/2023 ते दि. 29/06/2023
दि. 16/11/2023 ते दि. 27/12/2023
 
 नाेकरी
 
नाेकरी, नाेकरीतील बढती या दृष्टीने हे वर्ष सर्वसाधारण आहे. दि.21/04/2023 नंतरच्या कालखंडात नाेकरीतील व्यक्तींना थाेडे स्वास्थ्य लाभेल.या वर्षी काहींना बदलीच्या प्रश्नांना ताेंड द्यावे लागेल. व ही बदली काही प्रमाणात प्रतिकूल असण्याची शक्यता आहे. दि. 21/04/2023 नंतर जर बदली झाली, तर काही प्रमाणात अनुकूल ठिकाणी बदली मिळण्याची शक्यता आहे. हे वर्ष सिंह राशीच्या व्यक्तींना कामाचा ताण, जबाबदारी या पद्धतीचे आहे. त्यामुळे श्रम वाढणार आहेत, मानसिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. या वर्षीचे ग्रहमान हे ार माेठ्या अपेक्षा करण्यासारखे नाही. या वर्षी जबाबदारी वाढणार आहे.कामाचा ताण वाढणार आहे आणि काहींना नकाे त्या ठिकाणी बदलीच्या प्रश्नांना सामाेरे जावे लागणार आहे.
  
खालील कालखंड नाेकरीतील व्यक्तींना चांगले आहेत.
 
दि. 23/01/2023 ते दि. 14/02/2023
दि. 07/04/2023 ते दि. 16/07/2023
दि. 17/08/2023 ते दि. 17/09/2023
दि. 02/10/2023 ते दि. 01/11/2023
 
खालील कालखंड नाेकरीतील व्यक्तींना संमिश्र स्वरूपाचे जातील.
 
दि. 17/07/2023 ते दि. 16/08/2023
दि. 16/11/2023 ते दि. 27/12/2023
 
 प्राॅपर्टी
 
प्राॅपर्टी, गुंतवणूक या दृष्टीने हे वर्ष सामान्य स्वरूपाचे आहे. बरेचसे प्रतिकूल स्वरूपाचे आहे. ज्यांचे प्लाॅट, फ्लॅट, बांधकाम, वाहने या स्वरूपाचे काम आहे त्यांना हे वर्ष बेताचे जाणार आहे. ज्यांना आयुष्यात एकदाच प्राॅपर्टी, बंगला या गाेष्टी करायच्या आहेत त्यांनी शक्यताे या वर्षी आपले निर्णय पुढे ढकलावेत.ज्यांची प्राॅपर्टीची कामे सुरू आहेत ती लांबणीवर पडणार आहेत. वेळापत्रक मागेपुढे हाेणार आहे; परंतु ज्यांना प्राॅपर्टीचे व्यवहार करणे गरजेचे आहे
 
त्यांना खालील कालखंड अनुकूल ठरतील.
 
दि. 01/01/2023 ते दि. 09/05/2023
दि. 07/07/2023 ते दि. 06/08/2023
दि. 01/10/2023 ते दि. 01/11/2023
 
खालील कालखंड प्राॅपर्टीच्या दृष्टीने संमिश्र स्वरूपाचे जातील.
 
दि. 11/05/2023 ते दि. 30/06/2023
दि. 08/08/2023 ते दि. 30/09/2023
दि. 16/11/2023 ते दि. 27/12/2023
 
 संततिसाैख्य
 
संततिसाैख्य, मुलामुलींची प्रगती, मुलामुलींचे शाळा, काॅलेजमधील यश, नाेकरी, व्यवसायातील संधी या सर्व दृष्टीने सिंह राशीच्या व्यक्तींना दि. 21/04/2023 नंतरचा कालखंड चांगला आहे. दि. 21/04/2023 नंतरच्या कालखंडात मुलामुलींची प्रगती अपेक्षेप्रमाणे हाेईल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. संततिसाैख्याच्या दृष्टीने दि. 21/04/2023 नंतरचा कालखंड सिंह राशीच्या व्यक्तींना असाधारण व असामान्य अनुकूलतेचा ठरणार आहे. विद्यार्थ्यांचे शाळा, काॅलेजमधील प्रवेश व नाेकरी, व्यवसाय यामध्ये तुम्हाला शंभर टक्के यश लाभेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत सुयश लाभेल. मुलामुलींची प्रगती ही आपल्याला मानसिक समाधान देणारी व प्रसन्नता देणारी असेल.
  
खालील कालखंड संततिसाैख्याच्या दृष्टीने चांगले आहेत.
 
दि. 14/03/2023 ते दि. 10/05/2023
दि. 31/06/2023 ते दि. 15/07/2023
दि. 18/08/2023 ते दि. 16/09/2023
दि. 01/10/2023 ते दि. 02/11/2023
दि. 27/11/2023 ते दि. 27/12/2023
 
खालील कालखंड संततिसाैख्याच्या दृष्टीने प्रतिकूल आहेत.
 
दि. 11/05/2023 ते दि. 30/06/2023
दि. 16/07/2023 ते दि. 16/08/2023
 
 वैवाहिक साैख्य
 
विवाह, वैवाहिक साैख्याच्या दृष्टीने सिंह राशीच्या व्यक्तींना हे वर्ष सामान्य आहे, सर्वसाधारण आहे. विवाहेच्छूंचे विवाह जमण्याच्या दृष्टीने व घरात मंगल कार्य घडण्याच्या दृष्टीने दि. 21/04/2023 नंतरचा कालखंड चांगला आहे.वैवाहिक साैख्याच्या दृष्टीने सिंह राशीच्या व्यक्तींना हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे आहे.मतभेदाची शक्यता ार आहे. विशेषत: दि. 16/11/2023 ते दि. 26/12/2023 हा कालखंड खूपच त्रासदायक ठरणार आहे. या कालखंडात ज्यांच्या वैवाहिक जीवनात मूळचेच मतभेद आहेत ते अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वर्षी सिंह राशीच्या व्यक्तींनी आपल्या वैवाहिक जीवनात संयम, सहनशीलता या गाेष्टी अंगीकारने याेग्य ठरणार आहे. मात्र, विवाहेच्छूंचे विवाह जमण्याच्या दृष्टीने दि. 22/04/2023 नंतरचा कालखंड हा अनुकूल ठरणार आहे. घरामध्ये मंगल कार्य घडेल.
 
खालील कालखंड वैवाहिक साैख्याच्या दृष्टीने चांगले आहेत.
 
दि. 13/03/2023 ते दि. 29/05/2023
दि. 07/07/2023 ते दि. 06/08/2023
दि. 01/10/2023 ते दि. 02/11/2023
दि. 01/12/2023 ते दि. 24/12/2023
 
खालील कालखंड संमिश्र स्वरूपाचे आहेत.
 
दि. 11/05/2023 तेदि. 30/06/2023
दि.16/07/2023 ते दि. 01/10/2023
 
 प्रवास
 
प्रवास, सहली, तीर्थयात्रा, परदेश प्रवास या दृष्टीने हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे आहे. विशेषत: दि. 21/04/2023 नंतरचा कालखंड हा प्रवास, तीर्थयात्रा या दृष्टीने चांगला आहे व अनुकूल आहे. विशेषत: दि. 21/04/2023 नंतरच्या कालखंडात तीर्थयात्रेचे याेग येतील.
खालील कालखंड हे प्रवास, तीर्थयात्रा या दृष्टीने चांगले आहेत.
 
दि. 03/03/2023 ते दि. 29/05/2023
दि. 01/07/2023 ते दि. 19/09/2023
दि. 01/10/2023 ते दि. 01/11/2023
दि. 01/12/2023 ते दि. 24/12/2023
 
खालील कालखंड प्रवासाच्या दृष्टीने प्रतिकूल ठरतील. खालील कालखंडात वाहने चालवताना विशेष काळजी घ्यावी व प्रवासातही दक्षता हवी.
 
दि. 30/05/2023 ते दि. 29/06/2023
दि. 16/07/2023 ते दि. 17/08/2023
दि. 16/11/2023 ते दि. 27/12/2023
 
 सुसंधी, प्रसिद्धी, लेखन, साहित्य
 
सुसंधी, प्रसिद्धी, अंगीकृत कार्यात यश या दृष्टीने हे वर्ष सिंह राशीच्या व्यक्तींना दि. 21/04/2023 नंतरचा कालखंड चांगला आहे. दि. 21/04/2023 नंतर लेखन, प्रकाशन, साहित्य, वृत्तपत्र, कायदा, कला, संगीत, नाट्य, अभिनय, रंगभूमी या क्षेत्रांमध्ये तुम्हाला चांगली संधी मिळेल. तुमच्या आशा आकांक्षा सफल हाेतील. तुम्हाला अनेकांचे सहकार्य लाभेल. नवी वाट दिसेल, नवी दिशा सापडेल.तुमचा जनसंपर्क वाढेल. सिंह राशीच्या व्यक्तींना अपेक्षेपेक्षा अधिक सुसंधी या वर्षी लाभणार आहे. तुम्ही आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा व प्रतिभेचा ठसा आपल्या कार्यावर उमटवू शकाल. प्रसिद्धी, सुसंधी, वृत्तपत्र, कायदा, प्रसार माध्यमे, कला, संगीत, नाट्य, मनाेरंजन या क्षेत्रांत सिंह राशीच्या व्यक्ती आघाडीवर असतील.तुम्हाला या वर्षी अनेकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. थाेरामाेठ्यांची कृपा राहील व आपण अपेक्षित यश मिळविण्यात या वर्षी निश्चितपणे यशस्वी व्हाल. काहीजण शैक्षणिक व बाैद्धिक क्षेत्रात शाश्वत स्वरूपाची कामगिरी करू शकतील.
 
खालील कालखंड सुसंधी, प्रसिद्धी या दृष्टीने चांगले आहेत.
 
दि. 01/01/2023 ते दि. 06/02/2023
दि. 12/03/2023 ते दि. 30/05/2023
दि. 07/07/2023 ते दि. 17/08/2023
दि. 01/10/2023 ते दि. 01/11/2023
दि. 01/12/2023 ते दि. 24/12/2023
 
 नातेसंबंध व आवक-जावक यांचा ताळमेळ
 
नातेसंबंधाच्या दृष्टीने, तसेच कुटुंबातील आई, वडील, भाऊ, बहीण, मुले, मुली, मामा, मावशी इ. नातेसंदर्भात हे वर्ष चांगले आहे. विशेषत: दि. 21/04/2023 नंतरचा कालखंड हा विशेष चांगला आहे. आपल्यापैकी काही व्यक्तींचे नातेसंबंध बिघडले असेल, तर ते आता सुरळीत हाेणार आहेत. नातेवाइकांचा सल्ला लाभदायक ठरेल. तुम्ही अडचणीत असाल, तर नातेवाइकांची आपणाला मनापासून मदत मिळेल, साह्य मिळेल, सहकार्य मिळेल. तसेच आपल्या कुटुंबातील मुलामुलींबराेबरचे संबंध चांगले राहतील. मुलामुलींची प्रगती समाधानकारक असेल.मित्रांचेही सहकार्य लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. नवीन परिचय हाेतील. या वर्षी तुमचे ज्यांच्याबराेबर संबंध येतील, ज्यांच्याशी परिचय हाेतील ते हितसंबंध लाभदायक ठरतील.
 
या वर्षी तुम्ही काही नवीन उपक्रम सुरू करू शकाल. व्यवसायात किंवा तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन प्रयाेग करू शकल, नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. मात्र, या वर्षी जबाबदारी वाढणार आहे. कामाचा ताण वाढणार आहे. त्याचा प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम हाेण्याची शक्यता आहे. या वर्षी काही वेळा मानसिक अस्वस्थतेला व आराेग्याच्या तक्रारींना सामाेरे जाण्याची शक्यता आहे. अर्थात दि. 21/04/2023 नंतर गुरू भाग्यस्थानी असल्यामुळे टाेकाचे काही त्रास हाेणार नाहीत. या वर्षी तुमच्या कुटुंबाचा जमा-खर्च, ताळेबंद, आवकजावक याेग्य प्रमाणात राहणार आहे. आर्थिक आवक अपेक्षेप्रमाणे राहील. या वर्षी तुमचे निर्णय, अंदाज अचूक येणार आहेत. यामुळे व्यवसायातील फसवणुकीची शक्यता कमी आहे. सामान्यत: या वर्षी ार माेठ्या मनस्तापाला सामाेरे जावे लागणार नाही किंवा ार माेठ्या आपत्तीला सामाेरे जावे लागणार नाही.
 
 
 
 
 प्रतिष्ठा, मानसन्मान
 
सार्वजनिक जीवनात यश, अधिकारपद, राजकीय जीवनात प्रतिष्ठा, अधिकारपद, मानमान्यता या दृष्टीने सिंह राशीच्या व्यक्तींना दि. 21/04/2023 नंतरचा कालखंड चांगला आहे. प्रत्यक्ष अधिकारापेक्षा या वर्षी तुम्हाला तुमच्या आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. सार्वजनिक जीवन, राजकीय जीवन या क्षेत्रात तुमचा या वर्षी प्रवेश हाेईल. काहींना राजकृपा लाभेल, गुरुकृपा लाभेल. मात्र, प्रत्यक्ष अधिकारापेक्षा त्या क्षेत्रात एक मानसिक समाधान मिळण्याचे हे वर्ष आहे. तुमचे थाेरामाेठ्यांबराेबर परिचय हाेतील. शासकीय कामात यश मिळेल.
 
खालील कालखंड प्रतिष्ठा, मानसन्मान या दृष्टीने चांगले आहेत.
 
दि. 01/01/2023 ते दि. 12/03/2023
दि. 14/04/2023 ते दि. 18/08/2023
दि. 01/10/2023 ते दि. 01/11/2023
 
सिंह राशीच्या व्यक्तींना खालील कालखंड हे भाग्यकारक ठरतील. या कालखंडात उत्साह वाढेल, उमेद वाढेल. अपेक्षितगाठीभेटी व पत्रव्यवहार हाेईल, अनेकांचे सहकार्य लाभेल. रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे.
 
दि. 01/01/2023 ते दि. 07/01/2023
दि. 28/01/2023 ते दि. 03/02/2023
दि. 24/02/2023 ते दि. 02/03/2023
दि. 24/03/2023 ते दि. 29/03/2023
दि. 20/04/2023 ते दि. 26/04/2023
दि. 17/05/2023 ते दि. 23/05/2023
दि. 14/06/2023 ते दि. 19/06/2023
दि. 11/07/2023 ते दि. 17/07/2023
दि. 07/08/2023 ते दि. 13/08/2023
दि. 03/09/2023 ते दि. 09/09/2023
दि. 01/10/2023 ते दि. 07/10/2023
दि. 28/10/2023 ते दि. 03/11/2023
दि. 25/11/2023 ते दि. 30/11/2023
दि. 22/12/2023 ते दि. 28/12/2023