वृषभ

    04-Jan-2023
Total Views |
1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023  
 
 

Horocope 
 
व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल; व्यवसायात समाधानकारक स्थिती
 
 
 
वृषभ
 
 
‘वृषभ’ ही राशी चक्रातील दुसरी रास आहे. ‘धष्टपुष्ट बैल’ हे या राशीचे प्रतीक आहे. भरपूर ताकद, शक्ती, धिमा व शांत स्वभाव, परंतु खवळला, तर उग्र, असे या राशी बैलाचे स्वरूप आहे. ‘शुक्र’ या ग्रहाच्या अमलाखालील ही रास आहे. अर्थतत्त्वाची, बहुप्रसव व ही स्त्री रास आहे. ‘शांतता’ व ‘स्थिरता’ हे आपल्या राशीचे स्थायिभाव आहेत. आपल्या राशीचा स्वामी शुक्र असल्याने आपले व्यक्तिमत्त्व हे प्रसन्न व आनंदी असते. शुक्र हा ग्रह ऐहिक साैख्याचा कारक असल्यामुळे वृषभ व्यक्ती या जीवनामध्ये संपन्न, समृद्ध या स्थितीत असतात.आनंदी, आशावादी व सकारात्मक दृष्टीने जगणे व विचार करणे, अशी आपल्या स्वभावाची ठेवण आहे. प्रत्येक गाेष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा आपला स्वभाव आहे.आपल्या आर्जवी, मधुर व गाेड बाेलण्यामुळे सर्वांना आपण हवेहवेसे असता.
 
शुक्राच्या स्वामित्वाखालील ही रास असल्यामुळे आपल्याकडे एक आकर्षण शक्ती असते. प्रसन्नता, जीवनाकडे आनंदाने व आशावादीपणाने पाहणे, प्रेमळपणा, ऋजुता, नम्रता, विनयशीलता यामुळे वृषभ व्यक्तींना सहजपणे लाेकप्रियता लाभते. विशेषत: मतभेद न निर्माण करता स्वत:च्या स्वभावाचे कंगाेरे इतरांना बाेचणार नाहीत अशा पद्धतीने वागण्याची आपली पद्धत असल्यामुळे आपले स्वागत सर्वत्र हाेत असते.ही शुक्राची रास असल्यामुळे आपल्याकडे अभिजात रसिकता आहे. काव्य, संगीत, नाट्य यांची आपणाला आवड आहे. जीवनातील सर्व साैंदर्य, सर्व कला व जीवनातील जे जे चांगले आहे, त्यांचा उपभाेग घेण्याकडे आपला कल असताे.आपली रास ही संसारप्रिय आहे. वृषभ राशीच्या व्यक्ती या आतिथ्यशील असतात. येणाऱ्या अतिथींचे, पाहुण्यांचे, मित्रांचे, नातेवाइकांचे आपण मनापासून स्वागत करता. सर्वांची आस्थेवाईकपणाने व आपुलकीने विचारपूस करण्याचा आपला स्वभाव आहे. कुटुंबातील सर्वांकडे आपले लक्ष असते.
 
आपल्याकडे एककल्लीपणा नाही. वृषभ व्यक्ती या ध्येयासाठी किंवा एखाद्या विशिष्ट कार्यासाठी आपल्या प्रपंचाकडे दुर्लक्षकरून वेळ देणार नाहीत. कुटुंबासाठी आपले पहिले प्राधान्य असते.रचनात्मक, विधायक कामाची आवड, नेमून दिलेले काम,नाकासमाेर जाऊन पूर्णत्वाला नेण्याचा आपला स्वभाव असल्यामुळे व कसल्याही गाेष्टीबद्दल तक्रार न करण्याचा स्वभाव, संयम, शांतता, सुस्वभावीपणा यामुळे ज्यांना ज्यांना माेठमाेठी कामे करावयाची आहेत, त्यांनी वृषभ राशीच्या व्यक्तींना आपल्या सेवेत ठेवावे. वृषभ रास ही स्थिर आहे. त्यामुळे वृषभ राशीच्या व्यक्ती एकदा का एखाद्या ऑिफसमध्ये, कंपनीमध्ये, उद्याेगसमूहामध्ये रुजू झाल्या की, सहसा ती कंपनी किंवा ते ऑिफस त्याला त्या व्यक्ती चिकटून राहणार. थाेड्याशा अधिक ायद्यासाठी आहे ही नाेकरी साेडणे हा वृषभ व्यक्तींचा स्वभाव नसताे.
 
जीवनाच्या रंगभूमीवरील काेणतीही भूमिका आपण यशस्वीपणे पार पाडू शकता. वृषभ व्यक्ती कितीही माेठ्या पदावर असाे, हे काम छाेटे किंवा माेठे असे ते पाहात नाहीत. त्याचप्रमाणे सर्वत्र निर्माेही, निरपेक्ष व नि:स्वार्थीपणाने काम करण्याचा आपला स्वभाव आहे. मेष, सिंह किंवा वृश्चिक या व्यक्तींच्या मानापमानाच्या कल्पना भरपूर असतात. परंतु, वृषभ व्यक्ती यांनाही मानअपमान असताेच. परंतु, वृषभ व्यक्तींचे आपल्या कर्तव्यबुद्धीकडे अधिक लक्ष असते. कर्क, मीन या राशीप्रमाणे वृषभ व्यक्ती कधीही कल्पनारम्य, आभासमय अशा जगात राहात नाहीत. भविष्यकाळाचा अधिक विचार न करता वर्तमानकाळात जगण्याचा वृषभ व्यक्तींचा स्वभाव असताे. वृषभ व्यक्ती अत्यंत वास्तववादी असतात. त्यांचे पाय सतत जमिनीवर असतात. मेष, कर्क, सिंह, तूळ या राशींच्यासारख्या वृषभ व्यक्ती नव्हेत. काेणत्याही क्रांतीमध्ये किंवा काेणत्याही एखाद्या राजकीय विचारसरणीच्या पक्षामध्ये नेतृत्वपदी वृषभ व्यक्ती क्वचितच दिसतील. पुढारपणा करण्यापेक्षा, नेतृत्व करण्यापेक्षा नेतृत्वाचे अनुयायी हाेणे व निष्ठेने आज्ञाधारकपणे नेत्यांच्या आज्ञा ऐकणे या गाेष्टी वृषभ व्यक्तींना अधिक आवडतात.
 
 
 आराेग्य
 
सामान्यत: वृषभ व्यक्तींचे आराेग्य चांगले असते. या वर्षीही वर्षाचा बराचसा कालखंड चांगला राहणार आहे. आराेग्याची साथ मिळणार आहे. दि.21/04/2023 पर्यंतचा कालखंड हा आराेग्याच्या दृष्टीने अधिक चांगला आहे.या वर्षी तुम्ही आराेग्याकडे अधिक लक्ष द्यावे. कारण आपली प्रवृत्ती ही अत्यंत जबाबदारीने काम करण्याची आहे व या वर्षी शनी हा आपल्या पत्रिकेत दहाव्या स्थानी आहे. त्यामुळे अधिक काम करण्याकडे कल राहील व काम करण्याकडे लक्ष असल्यामुळे न कळत आराेग्याकडे दुर्लक्ष हाेईल.त्यामुळे आराेग्याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे.सामान्यत: आपणाला आराेग्याची काळजी करण्याचे कारण नाही. परंतु, वृषभ राशीच्या व्यक्ती प्रमाणापेक्षा अधिक जबाबदारीने काम करतात.
 
आपल्यावर साेपवलेली जबाबदारी चाेख पद्धतीने पार पाडण्याची एवढी काही त्यांनी धास्ती घेतलेली असते, की त्यांचे बाकीच्या कसल्याही गाेष्टीकडे मग ते जेवण असाे, औषधे घेणे असाे, या सर्वांच्याकडे दुर्लक्ष हाेते. या संदर्भात अधिक कुचंबणा हाेणार आहे. तुम्ही नाेकरीत असाल, सार्वजनिक जीवनात असाल, व्यवसायात असाल, तर या वर्षी दरराेज काही तरी नवीन जबाबदारी येऊन पडेल. तुमच्या स्वभावाप्रमाणे काही गाेष्टी तुम्ही स्वत:च्या अंगावर ओढवून घ्याल. तेव्हा वृषभ राशीच्या व्यक्तींनी आपले संपूर्ण दिवसाचे वेळापत्रक आखताना आपले आराेग्य, आपली औषधे व काैटुंबिक जबाबदाऱ्या याकडे लक्ष देणे हे अधिक गरजेचे ठरणार आहे. व्यवसाय, उद्याेग व नाेकरी व सार्वजनिक कार्य या सगळ्याच्या नादात काैटुंबिक गाेष्टींकडे दुर्लक्ष हाेण्याची ार माेठी शक्यता आहे.
 
खालील कालखंड आराेग्याच्या दृष्टीने चांगले आहेत.
दि. 03/01/2023 ते दि. 10/03/2023
दि. 08/04/2023 ते दि. 28/11/2023
 
खालील कालखंडात आपण आराेग्याकडे विशेष लक्ष द्यावे.
दि. 19/11/2023 ते दि. 23/12/2023
 
 
 व्यवसाय, उद्याेग, आर्थिक स्थिती
 
व्यवसाय, उद्याेग, व्यापार या दृष्टीने हे वर्ष वृषभ राशीच्या व्यक्तींना समाधानकारक आहे. या वर्षी व्यवसायाची वाढ करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.व्यवसायाची उलाढाल वाढेल. या वर्षी काैटुंबिक जीवनापेक्षा तुम्ही व्यवसायाकडे अधिक लक्ष देणार आहात. मात्र, आर्थिक लाभाच्या दृष्टीने दि. 21/04/2023 पर्यंतचा कालखंड अधिक चांगला आहे. दि. 22/04/2023 पासून गुरू बाराव्या स्थानात जात असल्यामुळे आर्थिक लाभाचे प्रमाण कमी राहणार आहे. या वर्षी तुमचे निर्णय बऱ्यापैकी चांगले येणार आहेत. विशेषत: व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय दि. 21/04/2023 पूर्वी घ्यावेत.
 
धिमेपणा व चिकाटी, निष्ठा व कामाबद्दलची कळकळ या गाेष्टी असल्यामुळे व या वर्षी शनीची साथ विशेष असल्यामुळे व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. दि. 21/04/2023 पर्यंत मित्रांचे सहकार्य लाभेल. या वर्षी ारशी शत्रुपीडा नाही.या वर्षी आपण व्यवसाय, व्यापार, उद्याेग या संदर्भात नशीबवान ठरणार आहात. मात्र, ज्यांच्याकडे येणे बाकी आहे, ज्यांच्याकडे उधारी आहे व जे काही आर्थिक व्यवहार निकडीचे आहेत, ते शक्यताे दि. 21/04/2023 पूर्वी पूर्ण करण्याकडे अधिक लक्ष देणे याेग्य ठरेल.
 
खालील कालखंड व्यवसाय व आर्थिक लाभाच्या दृष्टीने चांगले आहेत.
 
दि. 02/01/2023 ते दि. 30/03/2023
दि. 09/05/2023 ते दि. 28/05/2023
दि. 07/07/2023 ते दि. 06/08/2023
दि. 02/10/2023 ते दि. 16/10/2023
 
खालील कालखंड व्यवसायाच्या दृष्टीने संमिश्र स्वरूपाचे जातील.
दि. 18/10/2023 ते दि. 06/11/2023
दि. 16/11/2023 ते दि. 28/12/2023
 
वरील कालखंडात माेठे आर्थिक धाडस करताना किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक करताना चाैेर व साधकबाधक विचार करावा
 
नाेकरी
 
वृषभ राशीच्या व्यक्तींना नाेकरीच्या संदर्भात हे वर्ष चांगले आहे. परंतु, जबाबदारी वाढणार आहे व आपणाला मिळालेले काम असे असणार आहे, की ते काम अधिक जबाबदारीने करावे लागणार आहे. त्यामुळे कामाचा ताण व दगदग वाढेल. मात्र, तुम्ही आपल्यावर टाकलेल्या जबाबदारीचे समाधानकारक काम करू शकाल व जबाबदारी पार पाडाल. दि. 21/04/2023 पर्यंत पगारवाढीची शक्यता आहे.दर वर्षीपेक्षा या वर्षी तुमच्या कर्तृत्वाला अधिक संधी लाभणार आहे.
 
तुम्ही जरी नाेकरीत असला, तरी या वर्षी चांगल्या पद्धतीची जबाबदारीची भर पडणार आहे. या वर्षी बदलीची ार माेठी शक्यता आहे. नेहमीपेक्षा या वर्षी धावपळ ार हाेणार आहे. या वर्षी वेळापत्रकाप्रमाणे ार काही घडेल असे नाही. वरिष्ठांनी दिलेल्या जबाबदाऱ्या व अंगावर टाकलेले ओझे हे पार पडताना ार माेठी कसरत हाेणार आहे. त्याचा काैटुंबिक जीवनावर व आराेग्यावर ताण पडणार आहे.
 
खालील कालखंड नाेकरीतील व्यक्तींना चांगले आहेत.
 
दि. 02/01/2023 ते दि. 12/02/2023
दि. 15/03/2023 ते दि. 14/04/2023
दि. 16/08/2023 ते दि. 02/11/2023’
 
खालील कालखंडात वरिष्ठांबराेबर मतभेदाची शक्यता आहे.
दि. 15/04/2023 ते दि. 14/05/2023
दि. 17/08/2023 ते दि. 17/09/2023
 
खालील कालखंडात बदलीची शक्यता आहे.
दि. 01/07/2023 ते दि. 15/08/2023
 
 
 प्राॅपर्टी
 
प्राॅपर्टी, गुंतवणूक या दृष्टीने हे वर्ष सर्वसामान्य आहे. अत्यंत चांगले, आशादायक असे हे प्राॅपर्टीच्या दृष्टीने वर्ष नाही. ज्यांना एकदाच प्राॅपर्टी करायची आहे, त्यांनी या वर्षी थांबावे. परंतु, ज्यांना प्राॅपर्टी घ्यायची आहे, व्यवहार करायचे त्यांनी खालील कालखंडात घ्यावी.प्राॅपर्टीचे व्यवहार शक्यताे दि. 21/04/2023 पूर्वी पूर्ण करावेत. या वर्षी प्राॅपर्टीचे व्यवहार हाेताना कमी-अधिक मागे-पुढे हाेणार आहे. तुम्ही जे ठरविले आहे किंवा जे घडणार आहे ते वेळापत्रकाप्रमाणे हाेणार नाही. या संदर्भातील मानसिकतेची तयारी ठेवावी.
 
खालील कालखंड आपणाला चांगले जातील.
 
दि. 15/01/2023 ते दि. 12/02/2023
दि. 08/04/2023 ते दि. 01/05/2023
दि. 07/07/2023 ते दि. 17/09/2023
दि. 01/10/2023 ते दि. 01/11/2023
 
 संततिसाैख्य
 
संततिसाैख्य, मुलामुलींचे शाळा, काॅलेजमधील प्रवेश, मुलामुलींचे परीक्षेतील यश, त्यांचे नाेकरी, व्यवसायाचे प्रश्न या दृष्टीने वृषभ राशीच्या व्यक्तींना दि. 21/04/2023 पूर्वीचा कालखंड अत्यंत चांगला आहे. आपणाला मुलामुलींच्या संदर्भात जे काही करायचे आहे, त्यासाठी दि. 21/04/2023 पूर्वीचा कालखंड चांगला आहे.दि. 21/04/2023 नंतरचा कालखंड हा संततिसाैख्यासाठी प्रतिकूल आहे.आपल्याला जे महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत, ते दि. 21/04/2023 पूर्वी घ्यावेत. विद्यार्थ्यांना या वर्षी यशासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील.
 
काेणत्याही परिस्थितीत मुलामुलींच्या संदर्भातील ज्या काही जबाबदाऱ्या आहेत, त्या दि. 21/04/2023 पूर्वी कटाक्षाने पूर्ण करण्याची मानसिकता ठेवावी. कारण दि. 22/04/2023 नंतर गुरू, राहू, हर्षल अशी गाेंधळाची स्थिती निर्माण हाेणार आहे. विद्यार्थ्यांनी दि. 22/04/2023 नंतरच्या कालखंडात आपण काेणाच्या चुकीच्या संगतीत अडकत नाही ना, याची काळजी घ्यावी. आपल्या अभ्यासाकडे दुर्लक्ष हाेत नाही व वेळापत्रकाप्रमाणे व ठरविल्याप्रमाणे अभ्यास हाेताे की नाही याकडे लक्ष देणे विशेष गरजेचे ठरेल. दि. 22/04/2023 नंतर मुलामुलींच्या यशाच्या संदर्भात पालकांनी ार माेठ्या अपेक्षा ठेवू नयेत.
 
खालील कालखंड संततिसाैख्याच्या दृष्टीने सामान्यत: चांगले आहेत.
 
दि. 07/02/2023 ते दि. 28/03/2023
दि. 25/06/2023 ते दि. 08/07/2023
दि. 01/10/2023 ते दि. 18/10/2023
दि. 02/11/2023 ते दि. 29/11/2023
 
खालील कालखंड संततिसाैख्याच्या दृष्टीने संमिश्र आहे.
दि. 18/08/2023 ते दि. 29/09/2023
 
 वैवाहिक साैख्य
 
विवाहेच्छूंचे विवाह, वैवाहिक साैख्य या दृष्टीने हे वर्ष सामान्य आहे.थाेडेसे प्रतिकूल आहे. वृषभ व्यक्ती सामान्यत: सांसारिक जीवनात जुळवून घेणाऱ्या असतात. त्या स्वत: अधिक प्रामाणिक असतात व तडजाेडीने वागणाऱ्या असतात. त्यामुळे तुमच्या बाजूने संसार सुखाचा करण्याचा प्रयत्न राहील. विवाहेच्छूंचे विवाह ठरण्याच्या व हाेण्याच्या दृष्टीने दि. 21/04/2023 पूर्वीचा कालखंड चांगला आहे. दि. 22/04/2023 पासून गुरू बाराव्या स्थानात जात असल्यामुळे विवाह, साखरपुडा, काेणतेही शुभ कार्य हाेऊ शकत नाही. या वर्षी दि. 17/01/2023 पासून दहाव्या स्थानात कुंभ राशीत जाे शनी जात आहे, त्याचा वैवाहिक जीवनावर कमी-अधिक प्रमाणावर प्रतिकूल परिणाम हाेणार आहे.
 
अर्थात ही प्रतिकूलता केवळ वादावादीची असेल असे नाही. पती किंवा पत्नीची बदली अन्य ठिकाणी झाल्यामुळेही वैवाहिक जीवनात थाेडेसे अंतर राहण्याची शक्यता आहे. या वर्षी अनपेक्षितपणे नाेकरीत असणाऱ्या व्यक्तींची बदली हाेण्याची शक्यता असल्यामुळे वैवाहिक जीवनात थाेडीशी कमतरता राहण्याची शक्यता आहे. विवाहेच्छूंचे विवाह हे दि. 21/04/2023 पूर्वीच हाेणे गरजेचे ठरेल. वृषभ राशीच्या विवाहेच्छू मुलामुलींचा पालकांनी या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून मुलामुलीचा विवाह हाेण्याच्या दृष्टीने अधिक निकडीने लक्ष देण्याची गरज आहे.
 
खालील कालखंड वैवाहिक साैख्याच्या दृष्टीने चांगले आहेत.
 
दि. 01/01/2023 ते दि. 11/03/2023
दि. 06/04/2023 ते दि. 02/05/2023
दि. 07/07/2023 ते दि. 05/08/2023
दि. 02/10/2023 ते दि. 01/11/2023
 
खालील कालखंड वैवाहिक साैख्याच्या दृष्टीने प्रतिकूल आहेत.
दि. 11/05/2023 ते दि. 29/06/2023
दि. 16/11/2023 ते दि. 27/12/2023
 
 प्रवास
 
प्रवास, तीर्थयात्रा, परदेश प्रवास या दृष्टीने दि.21/04/2023 पूर्वीचा कालखंड चांगला आहे. प्रवास, तीर्थयात्रा या दृष्टीने विशेषत: धार्मिक स्थळे व तीर्थयात्रा या दृष्टीने हे वर्ष समाधानकारक आहे.
 
खालील कालखंड हे प्रवासाच्या दृष्टीने विशेष साैख्यप्रद हाेणार आहेत.
 
दि. 01/01/2023 ते दि. 11/03/2023
दि. 13/05/2023 ते दि. 28/06/2023
दि. 08/07/2023 ते दि. 06/08/2023
दि. 01/10/2023 ते दि. 01/11/2023
 
खालील कालखंड प्रवासाच्या दृष्टीने शक्यताे टाळावेत. तसेच, खालील कालखंडात वाहने काळजीपूर्वक चालवावीत. रात्रीचा प्रवास शक्यताे टाळावा.
दि. 16/11/2023 ते दि. 27/12/2023
 
 
 
 सुसंधी, प्रसिद्धी
 
सुसंधी, प्रसिद्धी या दृष्टीने हे वर्ष समाधानकारक आहे. विशेषत: तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी, प्रसिद्धी, नावलाैकिक, कीर्ती या दृष्टीने दि. 21/04/2023 पूर्वीचा कालखंड चांगला आहे. दि. 21/04/2023 पूर्वीच्या कालखंडात कला, संगीत, नाट्य, मनाेरंजन, साहित्य, लेखन, प्रकाशन या क्षेत्रातील व्यक्तींना सुयश लाभेल. दि. 21/04/2023 पूर्वीच्या कालखंडात तुमच्या आशाआकांक्षा पूर्ण हाेणार आहेत. स्वप्ने, मनाेरथ साकार हाेणार आहेत. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल.खालील कालखंडात आपणाला नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. तुमचा जनसंपर्क वाढेल व अनुभवाचे क्षितिज वाढेल.
 
खालील कालखंड सुसंधी, प्रसिद्धी या दृष्टीने चांगले आहेत.
 
दि. 04/01/2023 ते दि. 30/03/2023
दि. 06/04/2023 ते दि. 18/10/2023
 
नातेसंबंध व आवक-जावक यांचा ताळमेळ माणसांची जी दु:खं असतात, ज्यातून आनंद लाभताे असे नातेसंबंध हे अत्यंत महत्त्वाचे असतात. वृषभ राशीच्या व्यक्तींना मित्रांचे व नातेवाइकांचे सहकार्य हे दि. 21/04/2023 पर्यंत अत्यंत यशदायक, लाभदायक, साैख्यकारक असे असणार आहे. नातेवाइकांचा सल्ला लाभदायक ठरेल.अडचणीच्या प्रसंगी मित्रांची मदत मिळेल. अडीअडचणीच्या प्रसंगात नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. नातेवाइकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. या वर्षी विराेधकांच्या तसेच हितशत्रूंच्या कारवायांचा ारसा उपद्रव हाेणार नाही.घरातील गडी, माणसे, व्यवसायातील, उद्याेगातील कर्मचारी यांचे चांगले सहकार्य लाभणार आहे. तुमचे जे विराेधक आहेत त्यांच्यावर तुम्ही मात कराल.या वर्षी खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. खर्च याेग्य कामासाठी हाेणार आहेत.
 
या वर्षी जबाबदारी वाढणार आहे. आवक अपेक्षेप्रमाणे हाेईल. जमा-खर्चाची ताेंडमिळवणी तुम्ही याेग्य पद्धतीने करू शकाल. या वर्षीची तुमची मानसिकता ही अत्यंत आशादायी, प्रेरणादायी व सातत्याने आपले काम चाेखपणाने बजावण्याकडे राहील. साेपवलेली जबाबदारी अत्यंत कार्यक्षमतेने पार पाडाल.या वर्षी जबाबदारी वाढणार आहे. त्यामुळे कामाचा ताण पडणार आहे. या वर्षी तुम्हाला तुमच्या घरातील, कुटुंबातील व्यक्तींकडे ारसे लक्ष देता येणार नाही.काही वेळा वेळापत्रक याेग्य पद्धतीने राबवताना ार माेठी धावपळ हाेणार आहे.कामाचे स्वरूपच इतके गुंतागुंतीचे असेल, की तुमची या वर्षी अनेक वेळा तारेवरची कसरत हाेणार आहे. खर्च करताना आपण याेग्य कामासाठी करताे की नाही, याचा विचार करणे याेग्य ठरेल.
 
 प्रतिष्ठा, मानसन्मान
 
प्रतिष्ठा, मानसन्मान, अधिकार, कीर्ती, सुयश या दृष्टीने वृषभ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष समाधानकारक आहे. मात्र, मुळात वृषभ राशीच्या व्यक्तींना राजकारण, समाजकारण, नेतृत्व या बाबतीत हे वर्ष चांगले जाईल. आपण भले व आपले काैटुंबिक साैख्य भले एवढीच मर्यादित त्यांची आकांक्षा असते. त्याच्यामुळे नेते हाेऊन काम करण्याकडे आपला कल कमी असताे. मात्र, सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक कार्याकडे आपला ओढा असताे व त्या दृष्टीने हे वर्ष समाधानकारक आहे. निष्ठेने, श्रद्धेने व समर्पित भावनेने या वर्षी काम कराल व त्याचे समाधान आपणाला मिळेल.खालील कालखंड त्या दृष्टीने अनुकूल आहेत.
 
खालील कालखंड प्रतिष्ठा, मानसन्मान या दृष्टीने अनुकूल आहेत.
 
दि. 01/01/2023 ते दि. 14/03/2023
दि. 01/07/2023 ते दि. 16/09/2023
 
खालील कालखंडात आपण सार्वजनिक काम करताना अधिक दक्ष राहावे.नकाे त्या जबाबदाऱ्या अंगावर येऊन पडतील. याचा शारीरिक त्रासही हाेईल.
दि. 16/11/2023 ते दि. 24/12/2023
 
वृषभ राशीच्या व्यक्तींना प्रत्येक महिन्याचे दिलेले खालील कालखंड सामान्यत: सुयश, प्रवास, उत्साह, उमेद, कामे मार्गी लागणे या दृष्टीने अनुकूल ठरणार आहेत.
खालील कालखंड आपणाला भाग्यकारक ठरतील.
 
दि. 21/01/2023 ते दि. 27/01/2023
दि. 18/02/2023 ते दि. 23/02/2023
दि. 17/03/2023 ते दि. 22/03/2023
दि. 14/04/2023 ते दि. 19/04/2023
दि. 11/05/2023 ते दि. 16/05/2023
दि. 07/06/2023 ते दि. 12/06/2023
दि. 05/07/2023 ते दि. 10/07/2023
दि. 01/08/2023 ते दि. 06/08/2023
दि. 28/08/2023 ते दि. 02/09/2023
दि. 25/09/2023 ते दि. 30/09/2023
दि. 22/10/2023 ते दि. 27/10/2023
दि. 18/11/2023 ते दि. 23/11/2023
दि. 16/12/2023 ते दि. 21/12/2023