मिथुन

    04-Jan-2023
Total Views |
 
 
1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023
 
यश देणारे, उत्साह आणि उमेद वाढविणारे वर्ष
 

Horocope 
 
मिथुन
 
मिथुन ही राशी चक्रातील तिसरी रास आहे. ‘स्त्री-पुरुषाचे जाेडपे’ हे या राशीचे प्रतीक आहे. केवळ एवढेच नव्हे, तर या स्त्रीच्या हातात वाद्य आहे. हे जाेडपे गायन, वादन, क्रीडा करत आहेत अशी या राशीची मांडणी आहे. ‘बुध’ या ग्रहाचे या राशीवर स्वामित्व आहे. ही विषम रास आहे व पुरुष रास आहे.आपली रास ही बुद्धिप्रधान आहे. त्यामुळे आपणाकडे नैसर्गिक अशी असामान्य ग्रहणशक्ती आहे. कुशाग्र बुद्धिमत्ता आहे. असाधारण पांडित्य आहे. अलाैकिक प्रतिभा आहे. दूरदृष्टी आहे. त्यामुळे आपल्याला कथा, कादंबरी, कविता, नाट्य, संगीत, वाद्य यामध्ये विशेष रुची असते. याची वेगळी आवड असते. गुरू या ग्रहासारखीच बुद्धीला प्राधान्य देणारी अशी ही रास आहे.
 
आपल्या जीवनाची ूटपट्टी वेगळी आहे. आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान वेगळे आहे. आपला दृष्टिकाेन इतरांपेक्षा अलग आहे. जीवनाचे यशापयश, मूल्यमापन व माेजमाप आपण इतरांपेक्षा वेगळ्या दृष्टीने करत असता. केवळ भाकरीसाठी जगणे, चतकाेर तुकड्यासाठी यातायात करणे व त्यासाठी जीवनभर सतत धावत राहणे, केवळ पैशासाठी सारे आयुष्य व्यतीत करणे हे आपल्या विचारात बसत नाही. पशुपक्षीही घरटे बांधून राहतात. चारा मिळवून जगतात; परंतु मानवी जीवनाचा एक वेगळा उदात्त हेतू आहे व ताे तसा असावा याबद्दल आपण आग्रही असता. पैसा मिळविणे व त्याचा संग्रह करणे हा जीवनाचा एकमेव हेतू असू शकत नाही, याच्यावर आपली दृढ श्रद्धा आहे.वाचन, चिंतन, मनन, संशाेधन, एखाद्या विषयाचा व्यासंग हे आपले जीवनध्येय असते.
 
आपणाला सतत वैचारिक खाद्य हवे असते. यासाठी ग्रंथप्रेम हा आपला स्थायिभाव असताे. ग्रंथवाचन व ग्रंथलेखन हे आपल्या जीवनाचे विशेष आहे. बुद्धीला, विचाराला प्राधान्य देणारी ही रास आहे. त्यामुळे अनेक शिक्षक, प्राध्यापक, लेखक, लघुकथाकार, कादंबरीकार, नाटककार, कवी, वृत्तपत्रकार, संपादक, प्रवचनकार, कीर्तनकार, प्रकाशक, संशाेधक, शास्त्रज्ञ यांची ही रास आहे. आपल्याकडे कदाचित पैशाची तिजाेरी नसेल, कदाचित बँकेत आपली ार माेठी ठेव नसेल, परंतु आपणाकडे अत्यंत चाेखंदळपणे, रसिकपणे, मर्मज्ञपणे, प्रसंगी खिशाला चाट लावून जीवनातील महत्त्वाच्या गरजांकडे दुर्लक्ष करून जमविलेली, हेवा करणारी ग्रंथसंपत्ती असेल.त्याचप्रमाणे मुद्रणकला, छापखाने, टंकलेखन, प्रकाशन, ज्याेतिषी, गूढशास्त्र यांच्याशी आपला संबंध येऊ शकताे.
 
जीवनाचे समग्र सार जाणणारी, विचार जागृती करणारी, समाजाला, देशाला नवीन विचार देणारी, वैचारिक क्रांती करणारी, समाजाच्या विचारांना वळण लावणारी अशी आपली रास आहे. आपल्या राशीच्या व्यक्तींनी समाजाला, देशाला, नवनवीन विचार पुरविले आहेत. वैचारिक जागृती दिलेली आहे. आमरण प्रबाेधनाचे कार्य हाती घेणाऱ्यांमध्ये आपल्याच राशीचा प्रभाव असताे. अध्ययन व अध्यापन यामध्ये संपूर्ण आयुष्य वेचणारी आपली रास आहे. जीवनातील अनेक गाेष्टींची याेग्यायाेग्यता, बरे-वाईटपणा यांचे तारतम्य आपल्याकडे असते. त्यामुळे व्यापारात, उद्याेगात व देवघेवीच्या व्यवहारात आपण यशस्वी हाेऊ शकता. आपली रास विशेष संवेदनक्षम आहे. गुरूच्याबराेबर आपली रास असण्यामुळे त्याला विशेष बळ प्राप्त हाेते.सहज हसतहसत बाेलणे, शाब्दिक काेट्या करणे, विनाेद करणे, इतरांना मानसिक स्ूर्ती देणे, चैतन्य देणे, त्याच्यामध्ये वैचारिक जागृती करणे यात आपण अग्रेसर असता.
 
सवंग लाेकप्रियतेच्या अधीन जाणे हा आपला स्वभाव नसताे. सवंग लाेकप्रियतेपेक्षा एकांतात राहून ज्ञानाचा व्यासंग करणे, संशाेधन करणे हे आपणाला आवडते. वक्तृत्व, विविध चर्चासत्रे, परिसंवाद, वादविवाद, बाैद्धिक चळवळी, व्याख्याने, प्रवचने ही आपल्या आवडीची क्षेत्रे आहेत. चांगले ग्रंथ वाचावेत, उत्तमाेत्तम पुस्तके लिहावीत, वेगवेगळ्या भाषा शिकाव्यात, ज्ञानसंग्रह वाढवावा, मधमाश्यांसारखे ज्ञानाचे कण गाेळा करावेत ही आपली खरी वृत्ती आहे.या राशीने जगाला त्रिकालदर्शी तत्त्वज्ञ, मान्यवर लेखक, प्रतिभावंत कवी, नाटककार दिलेले आहेत. मैदानी व मर्दानी खेळापेक्षा कॅरम व बुद्धिबळ, पत्ते असे बैठे खेळ आपणाला प्रिय असतात. जीवनात चिरंतन काय आहे, शाश्वत काय आहे याचा सतत शाेध घेणारी आपली रास आहे. एखाद्या उच्च ध्येयासाठी, देशासाठी, वैचारिक प्रणालीसाठी संपूर्ण आयुष्य घालवणारी, ध्येयवादीपणाने समर्पण वृत्तीने आपले आयुष्य व्यतीत करणारी आपली ही अत्यंत आगळीवेगळी रास आहे.
 
 
 आराेग्य
 
हे संपूर्ण वर्ष आपले आराेग्य चांगले राहणार आहे. काहींच्या जीवनात वैचारिक अनुकूल परिवर्तनाची शक्यता आहे. उत्साह वाढेल, उमेद वाढेल. जीवनात जर नैराश्य असेल, उदासीनता असेल, मनावर काजळी असेल, तर ती आता निघून जाणार आहे. हे वर्ष अत्यंत चांगले असल्यामुळे या वर्षी आपण समरसून व संजीवक असे काम करू शकाल. वैचारिक परिपक्वता येणार आहे. आशावादी, आनंदी व सकारात्मक दृष्टीने आपण जगाकडे पाहू शकाल.
 
खालील कालखंड आराेग्याच्या दृष्टीने चांगले आहेत.
 
दि. 01/01/2023 ते दि. 06/02/2023
दि. 28/02/2023 ते दि. 07/06/2023
दि. 24/06/2023 ते दि. 07/07/2023
दि. 25/07/2023 ते दि. 05/11/2023
 
खालील कालखंड आराेग्याच्या दृष्टीने प्रतिकूल आहेत.
दि. 07/02/2023 ते दि. 27/02/2023
दि. 08/06/2023 ते दि. 23/06/2023
दि. 07/11/2023 ते दि. 26/11/2023
 
 व्यवसाय, उद्याेग, आर्थिक स्थिती
 
व्यापार, व्यवसाय, उद्याेग, आर्थिक लाभ या दृष्टीने मिथुन राशीच्या व्यक्तींना हे वर्ष असामान्य यशाचे व असाधारण लाभाचे जाणार आहे. या वर्षी बाजारपेठेचा अभ्यास करून चाैेर विचार करून साधकबाधक पद्धतीने, सांगाेपांग अभ्यास करून व्यवसायात, उद्याेगात व शेअर्समध्ये धाडस करायला हरकत नाही. ‘आंधळा मागताे एक डाेळा व देव देताे दाेन’ अशी या वर्षी मिथुन राशीच्या व्यक्तींची स्थिती राहणार आहे. या वर्षी नियती आपणाला भरभरून देणार आहे. तुम्ही जितके कष्ट कराल, परिश्रम कराल, चिकाटी ठेवाल, कामामध्ये सातत्य ठेवाल तितके यश किंबहुना त्यापेक्षा अधिक यश आपणाला या वर्षी मिळणार आहे. निर्धार, जिद्द, निश्चयात्मकता, असीम इच्छाशक्ती व कामाची पराकाष्ठा कराल, ते सर्व कारणी लागेल. या वर्षी ग्रहांचे वरदान आपणाला आहे. त्याचा आपण या वर्षी ायदा करून घ्यावा.
 
दि. 17/06/2023 नंतर शनी भाग्यात, तर वर्षभर गुरू दशमात व लाभात राहणार आहे. त्यामुळे वर्षभर ग्रहमान आपणाला अपेक्षेपेक्षा अधिक अनुकूल आहे. ही सर्व स्थिती व्यवसायासाठी व आर्थिक लाभासाठी चांगली आहे. शैक्षणिक, बाैद्धिक क्षेत्र, न्याय, कायदा, वृत्तपत्र, सर्व माध्यमे, अकाैंटस्, विमा, कागद, प्रिंटिंग, प्रकाशन, साहित्य या क्षेत्रातील व्यक्तींना हे सर्व वर्ष चांगले आहे. तसेच ज्वेलर्स, साडी सेंटर, कापड या व्यवसायासाठीही चांगले आहे. दि. 21/04/2023 पर्यंत प्राॅपर्टी, जागा, जमिनी, वाहने, बिल्डर्स, डेव्हलपर्स व काॅन्ट्रॅक्टर्स यांना हे वर्ष चांगले आहे.
 
खालील कालखंड व्यवसाय व आर्थिक लाभाच्या दृष्टीने चांगले आहेत.
 
दि. 01/01/2023 ते दि. 05/04/2023
दि. 14/04/2023 ते दि. 14/05/2023
दि. 01/06/2023 ते दि. 11/08/2023
दि. 01/10/2023 ते दि. 01/11/2023
 
खालील कालखंडात मित्रांच्या आश्वासनांवर अवलंबून राहू नका.फसवणुकीची शक्यता आहे. हितशत्रूंचा त्रास हाेण्याची शक्यता आहे. अकारण खर्च हाेण्याची शक्यता आहे.
दि. 17/11/2023 ते दि. 27/12/2023
 
 नाेकरी
 
नाेकरीतील व्यक्तींना हे वर्ष खूपच समाधानकारक आहे. वरिष्ठांबराेबर चांगले संबंध राहतील. दि. 01/01/2023 ते दि. 21/04/2023 या कालखंडात बढतीची शक्यता आहे. ज्यांना बदली हवी आहे, त्यांनासुद्धा या कालखंडात बदली मिळेल. दि. 22/04/2023 नंतरच्या कालखंडात पगारवाढीची शक्यता आहे.सामान्यत: नाेकरीतील व्यक्तींना हे संपूर्ण वर्ष चांगले आहे. नाेकरीतील मिथुन राशीच्या व्यक्तींना हे वर्ष खूपच मानसिकदृष्ट्या चांगले जाणार आहे. वरिष्ठांची कृपा लाभणार आहे. ज्यांना बदली हवी आहे त्यांनी या वर्षी निश्चित दि. 21/04/2023 पूर्वी प्रयत्न करावेत. त्यांना हव्या त्या ठिकाणी निश्चित बदली मिळेल.
तुम्हाला जे हवे आहे ते ठिकाण मिळेल व जी बढती मिळेल ती अत्यंत मनासारखी असेल. या वर्षी तुमच्या बढतीच्या आड काेणीही हितशत्रू येणार नाहीत. पगारवाढीची मनीषाही पार पडणार आहे.
 
खालील कालखंड नाेकरीतील व्यक्तींना चांगले आहेत.
 
दि. 16/02/2023 ते दि. 15/05/2023
दि. 01/07/2023 ते दि. 16/09/2023
दि. 18/10/2023 ते दि. 15/11/2023
 
खालील कालखंड नाेकरीतील व्यक्तींना संमिश्र स्वरूपाचे जाणार आहेत.
 
दि. 01/01/2023 ते दि. 11/03/2023
दि. 15/05/2023 ते दि. 15/06/2023
दि. 16/11/2023 ते दि. 27/12/2023
 
वरील कालखंडात नाेकरीत प्रगती सुरू असली, तरी या कालखंडामध्ये किरकाेळ प्रमाणात कमी-अधिक त्रास हाेणार आहे. तेव्हा वरील कालखंडात आपण अधिक जागरूक राहावयास हवे.
 
 
 प्राॅपर्टी
 
प्राॅपर्टी व गुंतवणूक यासाठी संपूर्ण वर्ष चांगले आहे. विशेषत: दि.01/01/2023 ते दि. 21/04/2023 हा कालखंड ज्यांना प्राॅपर्टी घ्यायची आहे, जीवनामध्ये एकदाच घराचे स्वप्न पूर्ण करायचे आहे, त्यांना खालील कालखंड अनुकूल आहेत. प्रत्येकाचे स्वत:च्या घराचे एक स्वप्न असतेच. या वर्षी मिथुन राशीच्या व्यक्तींची आपल्या स्वत:च्या घरासंदर्भातील मनीषा, स्वप्ने व मनाेरथ शंभर टक्के परिपूर्ण हाेणार आहेत. तुम्हाला सर्व दृष्टीने अत्यंत चांगली, अत्यंत याेग्य अशी वास्तू मिळणार आहे. वास्तूकरिता लागणारे जे अर्थसाह्य आहे तेही या वर्षी ार खटपट व यातायात न करता मिळणार आहे. ज्यांना वाहन खरेदी करायचे आहे त्यांनाही हे वर्ष चांगले आहे. ज्यांना गुंतवणूक करायची आहे त्यांनाही हे वर्ष चांगले आहे.
 
खालील कालखंड आपणाला चांगले जातील.
 
दि. 01/01/2023 ते दि. 06/02/2023
दि. 26/02/2023 ते दि. 07/07/2023
दि. 25/07/2023 ते दि. 02/10/2023
 
खालील कालखंडात प्राॅपर्टीचे व्यवहार करताना काळजी घ्यावी.
दि. 16/11/2023 ते दि. 27/12/2023
 
 
 
 संततिसाैख्य
 
संततिसाैख्य, मुलामुलींचे शाळा, काॅलेजमधील प्रवेश, मुलामुलींचे परीक्षेतील यश, त्यांचे नाेकरी, व्यवसायाचे प्रश्न या दृष्टीने मिथुन राशीच्या व्यक्तींना हे संपूर्ण वर्ष चांगले आहे. विशेषत: दि. 22/04/2023 ते दि. 31/12/2023 हा कालखंड मुलामुलींची प्रगती, संततिसाैख्य, विद्यार्थ्यांचे परीक्षेतील यश, शाळा, काॅलेजचे प्रवेश, नाेकरी, व्यवसायातील प्रगती हे व्यवस्थित पार पडणार आहे.
 
खालील कालखंड संततिसाैख्याच्या दृष्टीने चांगले आहेत.
 
दि. 23/01/2023 ते दि. 05/04/2023
दि. 03/05/2023 ते दि. 29/05/2023
दि. 06/07/2023 ते दि. 06/08/2023
दि. 01/10/2023 ते दि. 02/11/2023
 
खालील कालखंड संततिसाैख्याच्या दृष्टीने संमिश्र आहे.
दि. 01/12/2023 ते दि. 24/12/2023
 
 
 वैवाहिक साैख्य
 
वैवाहिक साैख्य, विवाहेच्छूंचे विवाह या दृष्टीने हे वर्ष मिथुन राशीच्या व्यक्तींना साैख्यकारक आहे. विवाहेच्छूंचे विवाह जमतील व हाेतील. विशेषत: विवाहेच्छूंचे विवाह जमण्याच्या दृष्टीने दि. 21/04/2023 नंतरचा कालखंड अनुकूल आहे. याच कालखंडात फक्त विवाह हाेऊ शकतात. काेणत्याही शुभकार्यासाठी दि. 22/04/2023 नंतरचा कालखंड अनुकूल आहे.विवाहेच्छूंचे विवाह जमणे या दृष्टीने मिथुन राशीची मुले-मुली अत्यंत नशीबवान ठरणार आहेत. या वर्षी संपूर्ण वर्षभर गुरू अनुकूल आहे. त्यामुळे संपूर्ण वर्षाच्या कालखंडात केव्हाही तुमचे विवाह जमू शकतात व हाेऊ शकतात. या वर्षी मिथुन राशीच्या मुलामुलींच्या मातापित्यांना ारसे नाराज व्हावे लागणार नाही. आपल्या मुलामुलींना अनुरूप व अनुकूल अशी स्थळे लाभतील. घरामध्ये विघ्न न येता, अडचणी न येता मंगलकार्य पार पडेल. वैवाहिक साैख्याच्या दृष्टीनेही मिथुन राशीच्या व्यक्तींना हे संपूर्ण वर्ष चांगले आहे, साैख्यकारक आहे व प्रसन्नतेचे, आनंदाचे व सुखासमाधानाचे आहे.
 
खालील कालखंड वैवाहिक साैख्याच्या दृष्टीने चांगले आहेत.
 
दि. 25/01/2023 ते दि. 02/04/2023
दि. 07/05/2023 ते दि. 26/05/2023
दि. 09/07/2023 ते दि. 09/08/2023
दि. 03/10/2023 ते दि. 28/10/2023
 
खालील कालखंड वैवाहिक साैख्याच्या दृष्टीने संमिश्र स्वरूपाचे जातील.
 
दि. 01/01/2023 ते दि. 09/05/2023
दि. 19/08/2023 ते दि. 04/10/2023
दि. 16/11/2023 ते दि. 27/12/2023 संमिश्र याचा अर्थ हे कालखंड काही प्रमाणात अनुकूल व काही प्रमाणात प्रतिकूल अशी स्थिती असते.
 
 प्रवास
 
प्रवास, तीर्थयात्रा, परदेश प्रवास या दृष्टीने हे संपूर्ण वर्ष चांगले आहे.काहींना शिक्षणासाठी परदेश प्रवासाची संधी मिळेल. तीर्थयात्रेचे याेग या वर्षी विशेषत्वाने येणार आहेत.
 
खालील कालखंड हे प्रवासाच्या दृष्टीने विशेष चांगले जातील.
 
दि. 23/01/2023 ते दि. 05/04/2023
दि. 14/04/2023 ते दि. 14/05/2023
दि. 01/06/2023 ते दि. 10/08/2023
दि. 01/10/2023 ते दि. 12/11/2023
 
खालील कालखंड प्रवासाच्या दृष्टीने शक्यताे टाळावेत. तसेच खालील कालखंडात वाहने काळजीपूर्वक चालवावीत. रात्रीचा प्रवास शक्यताे टाळावा.
दि. 16/11/2023 ते दि. 27/12/2023
 
 सुसंधी, प्रसिद्धी
 
सुसंधी, प्रसिद्धी, अंगीकृत कार्यात यश या दृष्टीने मिथुन राशीच्या व्यक्तींना हे संपूर्ण वर्ष अनुकूल आहे. तुमच्या इच्छा, आकांक्षा, तुमची स्वप्ने, तुमचे मनाेरथ साकार हाेणार आहे. ज्या संधीची आपण वाट पाहात हाेतात ती संधी या वर्षी लाभणार आहे. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. अनेकांचे सहकार्य मिळेल. तुमच्या अनुभवाच्या कक्षा व्यापक हाेणार आहेत. हे वर्ष फलप्राप्तीचे आहे. तुम्हाला अपेक्षित यश लाभणार आहे.
 
खालील कालखंड सुसंधी, प्रसिद्धी या दृष्टीने चांगले आहेत.
 
दि. 16/02/2023 ते दि. 06/06/2023
दि. 25/06/2023 ते दि. 07/07/2023
दि. 25/07/2023 ते दि. 06/11/2023
 
 
 नातेसंबंध व आवक-जावक यांचा ताळमेळ
 
मानवी जीवनात अनेक प्रश्न असतात. आर्थिक प्रश्नामुळेही मानसिक त्रास हाेताे; पण त्यापेक्षाही कुटुंबातील आई, वडील, बहीण, भाऊ, मुले, मुली, नात्यातील काका, मामा, मावशी व मित्र, हाताखालील कामगार, व्यवसायातील भागीदार व नाेकरीतील, वरिष्ठ, कनिष्ठ या सर्वांचे संबंध येतच असतात. या वर्षी मिथुन राशीच्या व्यक्तींना नातेसंबंधाच्या संदर्भात माेठी अनुकूलता लाभणार आहे. नात्यातील व्यक्तींचे सहकार्य लाभणार आहे. त्यांचा सल्ला लाभदायक ठरणार आहे; परंतु त्याचबराेबर काहींना नातेवाइकांकरिता खर्च करावा लागणार आहे. अडचणीच्या काळात त्यांना मदत करावी लागणार आहे.काहींच्यावर नातेवाइकांची जबाबदारी येऊन पडणार आहे. मित्रांच्या संदर्भात दि. 21/04/2023 नंतरचा कालखंड हा अत्यंत चांगला जाणार आहे. तुमच्या अडचणीच्या व संकटाच्या प्रसंगी मित्रांची तुम्हाला निश्चित मदत मिळणार आहे.
 
तुम्ही आर्थिक अडचणीत असाल, तर मित्र तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत. या वर्षी गडी, नाेकर, कर्मचारी यांचेही चांगले सहकार्य मिळणार आहे. हितशत्रूंचा त्रास हाेण्याची शक्यता ार कमी आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींना हे वर्ष अफलातून ठरणार आहे. अनेक वर्षांत लक्षात ठेवण्यासारखे संस्मरणीय ठरणार आहे. अपेक्षेपेक्षा आवक चांगली राहणार आहे. अपेक्षेपेक्षा व्यवसायाची वाढ, उलाढाल वाढणार आहे. अनेक जण तुम्हाला सहकार्य करणार आहेत. नवी संधी लाभणार आहे. तुमची आवक या वर्षी अपेक्षेपेक्षा किती तरी अधिक राहणार आहे. धार्मिक कार्यात लक्ष द्याल. तीर्थयात्रेचे प्रसंग येतील व विशेष म्हणजे ज्यांना या वर्षी घर, प्राॅपर्टी करायची आहे, ती शंभर टक्के तुमची मनीषा पार पडणार आहे.
 
 
 
 प्रतिष्ठा, मानसन्मान
 
प्रतिष्ठा, मानसन्मान, अधिकार, कीर्ती, सुयश या दृष्टीने मिथुन राशीच्या व्यक्तींना हे वर्ष खूप चांगले जाणार आहे. तुमच्या अनुभवाचे, कार्याचे चीज हाेईल. तुम्ही आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा आपल्या कार्यावर उमटवू शकाल.शिक्षण, सांस्कृतिक, आध्यात्मिक, राजकीय, सार्वजनिक व ज्या क्षेत्रात आपण असाल त्या क्षेत्रात आपणाला दि. 21/04/2023 पूर्वी अधिकार लाभेल, प्रतिष्ठा लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. तुम्हाला या वर्षी अपेक्षित, अनपेक्षित अशा अनेकांची साथ लाभणार आहे. विराेधकांवर मात कराल. अपेक्षित यश संपादन करू शकाल.
 
खालील कालखंड प्रतिष्ठा, मानसन्मान या दृष्टीने अनुकूल आहेत.
 
दि. 16/02/2023 ते दि. 14/05/2023
दि. 01/07/2023 ते दि. 14/09/2023
दि. 18/10/2023 ते दि. 15/11/2023
 
खालील कालखंड प्रतिष्ठा, मानसन्मान या दृष्टीने संमिश्र स्वरूपाचे जातील.
दि. 16/11/2023 ते दि. 27/12/2023
 
खालील दिलेले कालखंड मिथुन राशीच्या व्यक्तींना अनुकूल ठरणार आहेत.
उत्साह, उमेद वाढेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
 
खालील दिलेले कालखंड हे कामे मार्गी लागण्याच्या दृष्टीने व प्रवास व महत्त्वाची कामे पार पाडण्याच्या दृष्टीने यशदायक व लाभदायक आहेत.
दि. 24/01/2023 ते दि. 29/01/2023
दि. 20/02/2023 ते दि. 25/02/2023
दि. 19/03/2023 ते दि. 25/03/2023
दि. 16/04/2023 ते दि. 21/04/2023
दि. 13/05/2023 ते दि. 18/05/2023
दि. 09/06/2023 ते दि. 15/06/2023
दि. 07/07/2023 ते दि. 12/07/2023
दि. 03/08/2023 ते दि. 08/08/2023
दि. 30/08/2023 ते दि. 04/09/2023
दि. 27/09/2023 ते दि. 02/10/2023
दि. 24/10/2023 ते दि. 29/10/2023
दि. 20/11/2023 ते दि. 26/11/2023
दि. 16/12/2023 ते दि. 23/12/2023