कर्क

    04-Jan-2023
Total Views |
 
 
1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023
 

Horocope 
 
कर्क
 
सुयशाचे शिखर गाठू शकाल; असामान्य लाभाचे वष कर्क राशी चक्रातील चाैथी रास आहे. ‘खेकडा’ हे या राशीचे प्रतीक आहे.‘चंद्र’ या ग्रहाचे या राशीवर स्वामित्व आहे. ही चर रास आहे. स्त्री रास आहे. जल रास आहे व बहुप्रसव रास आहे. या राशीवर चंद्राचा अंमल असल्यामुळे चंद्राची शीतलता व प्रसन्नता या राशीत आहे. अतिशय संवेदनक्षम अशी ही रास आहे.व्यक्तीच्या मनावर, व्यक्तिमत्त्वावर, स्वभावावर, मनाेवृत्तीवर परिणाम करणारी ही रास आहे. या राशीमध्ये सतत चढ-उतार हाेत असतात. भावनाप्रधानता, स्वभावाचा मनस्वीपणा, उत्कटता हे या राशीचे वैशिष्ट्य आहे. क्षणात हसू, तर क्षणात रडणे, क्षणात प्रसन्नता, तर क्षणात औदासीन्य, कधी उत्साह, तर कधी निरुत्साह, अशी क्षणाक्षणाला मूड बदलणारी ही रास आहे.आपण मनाने शुद्ध असता, सात्त्विक असता, निर्मळ असता, विशुद्ध मन ही परमेश्वराने आपल्याला दिलेली देणगी आहे.
 
हळवेपणा, भावाकूल वृत्ती, अत्यंत संवेदनक्षमता, नाजूकपणा ही आपल्या स्वभावाची वैशिष्ट्ये आहेत. राजकारणात, समाजकारणात, सार्वजनिक जीवनात कर्क व्यक्ती या अधिक पुढे आलेल्या दिसून येतील. जनमानसावर, जनसामान्यांच्यावर कर्क व्यक्तींची अधिक छाप पडते.सामाजिक कार्याची आवड, देशप्रेम, राष्ट्रप्रेम या गाेष्टी कर्क व्यक्तींकडे अधिक सापडतात. भारतीय राजकारणात कर्क व्यक्ती अधिक पुढे आलेल्या दिसतात.आकर्षक व्यक्तिमत्त्व, राष्ट्रप्रेम, देशप्रेम, प्रसन्न व तेजस्वी व्यक्तिमत्त्व, सम ाजप्रियतेची आवड, यामुळे राजकारणात यांच्याकडे नेतृत्व आपाेआप चालून येते.यांच्याकडे खरीखुरी धर्मनिरपेक्षता असते. या राशीचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे एकाचवेळी पारिजातकासारखे काेमल मन व प्रसंगी वज्रासारखी कठाेर मनाेवृत्ती यांच्याकडे असते. कर्क व्यक्ती या जन्मजात नेत्या असतात. मुत्सद्दी असतात, शहाण्या असतात, दूरदर्शी असतात व यांच्याकडे द्रष्टेपणा असताे. नेतृत्व, प्रभुत्व, अधिकार, उच्चपद या सर्व गाेष्टी यांच्याकडे चालून येतात.
 
भूमीवर, देशावर आपले निस्सीम प्रेम असते. कर्क व्यक्ती अचानकपणे, अनपेक्षितपणे जगात पुढे येतात. समूहाचे, जनतेचे नेतृत्व करू शकतात व आपल्या कर्तृत्वाने असामान्य लाेकप्रियता मिळवतात. आपली कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती, आपली कार्यपद्धती छाप पाडणारी व भारदस्त असते. कर्क व्यक्तींकडे एकप्रकारची संमाेहन शक्ती असते. कर्क व्यक्ती ज्या संस्थेत, ज्या पक्षात असतात, त्या ठिकाणी मन लावून, जीव ओतून काम करतात. गतिमान पद्धत, लाेकांची नाडी, लाेकांचे मन, लाेकांचे अंत:करण जाणून घेण्याचे लाभलेले जन्मजात नैपुण्य, पुढे येणाऱ्या गाेष्टीचा वेध घेण्याची शक्ती, गतिमानता, स्वभावातील लवचिकता, क्षमाशीलता, सत्त्वशीलता व प्रामाणिकपणा, पारदर्शक स्वभाव, संघटन काैशल्य, यामुळे कर्क व्यक्तींनी जगाच्या इतिहासावर आपली मुद्रा उमटविलेली आहे.
 
कर्क राशीच्या व्यक्तींचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे क्षमा आणि शांती. दीर्घकाळ रागावणे, सूडबुद्धीने वागणे, दीर्घ द्वेष करणे या गाेष्टी कर्क व्यक्तींच्याकडे असत नाहीत. क्षमाशीलता हा कर्क व्यक्तींचा महत्त्वाचा गुण असताे. औदार्य, सहनशीलता, शांतपणा, ममताळूपणा, कनवाळूपणा, वात्सल्य या गुणांमुळे कर्क स्त्रिया उत्तम संसार करू शकतात. एखादी व्यक्ती दु:खात किंवा संकटात सापडली असेल, तर कर्क व्यक्तीच्या मनात तत्काळ सहानुभूती निर्माण हाेते. संकटात सापडलेल्या व्यक्तींना आत्मीयतेने व आपुलकीने मदत करण्यात कर्क व्यक्ती आघाडीवर असतात.एखाद्या ुलांच्या गुच्छामध्ये अनेक ुले असतात, त्याप्रमाणे कर्क व्यक्तीच्या परिवारामध्ये वेगवेगळ्या स्वभावाची, उलटसुलट स्वभावाची, अनेक धर्माची, अनेक सांप्रदायाची माणसे असतात. कर्क व्यक्तींचा मित्र परिवार माेठा असताे.
 
सर्वसमावेशक वृत्ती, क्षमाशीलता, न्यायप्रियता, नि:स्वार्थी व निरपेक्ष वृत्ती, यामुळे जनतेचे प्रेम यांना आपाेआप मिळते. कर्क व्यक्ती आनंदी व भविष्यकाळाविषयी आशावादी असतात. सर्वांना सांभाळून घेण्याकडे त्यांचा कल असताे. लाेकांच्या चुका, त्यांच्या उणिवा, त्यांच्यातील अपुरेपण हे या सर्व गाेष्टी समजून घेऊन ते आपल्या सभाेवतालच्या लाेकांवर प्रेम करतात. बेरजेचे राजकारण करण्याचा त्यांचा स्वभाव असताे.काेणतीही गाेष्ट मध्येच साेडून न देण्याचा आपला स्वभाव असताे. आपल्या राशीचे प्रतीक खेकडा आहे. खेकड्याने एखादी वस्तू आपल्या पंजात घेतली की, ती ताे साेडत नाही. त्याप्रमाणे काेणत्याही ध्येयाला किंवा विचाराला कर्क व्यक्ती चिकटून बसल्या, की त्या ध्येयाशी कायमपणे निगडित राहतात. कर्क व्यक्ती या आदर्शवादी असतात.
 
इतिहास, राजकारण, समाजकारण, राज्यशास्त्र यांची यांना आवड असते. कर्क राशी ही जलतत्त्वाची रास असल्यामुळे यांना निसर्गसाैंदर्याचे, समुद्राचे, नद्यांचे आकर्षण असते.ही चर रास असल्यामुळे कर्क व्यक्तींना अधिकांश प्रवास आवडताे. देशपरदेशांत प्रवास केलेल्यांमध्ये कर्क व्यक्ती अधिक आढळून येतील. आनंदाने, प्रसन्नपणे, गतिमानतेने काम करणे हा स्वभाव असल्यामुळे कर्क व्यक्ती जगात यशस्वी हाेतात. चतुर्थस्थान हे मातेचे स्थान आहे व नैसर्गिक कुंडलीत चतुर्थ स्थानचे स्वामित्व हे चंद्राकडे असल्यामुळे मातेप्रमाणे ही रास ममताळू व कनवाळू अशी आहे. यामुळेच कर्क स्त्रिया या आपल्या मुलांच्यावर, पतीवर निस्सीम प्रेम करू शकतात.
 
 
 आराेग्य
 
 
आराेग्याच्या बाबतीत आपण या वर्षी नशीबवान आहात. भाग्यात व दहाव्या स्थानात गुरू राहणार आहे. त्यामुळे आराेग्य वर्षभर चांगले राहणार आहे.आपल्यापैकी काहींच्या जीवनात अनुकूल मानसिक परिवर्तनाची शक्यता आहे.याेग्यप्रकारे या वर्षी मानसिक परिवर्तन हाेऊ शकते. उत्साह, उमेद वाढेल.मानसिक प्रसन्नता लाभेल. आशावादी व सकारात्मक दृष्टीने या वर्षी जीवनाकडे पाहणार आहात. या वर्षी मनामध्ये निराशेला जागा राहणार नाही. आत्मविश्वासाने, निर्धाराने व जिद्दीने काम कराल.
 
खालील कालखंड आराेग्याच्या दृष्टीने अनुकूल आहेत.
 
दि. 16/02/2023 ते दि. 01/05/2023
दि. 06/07/2023 ते दि. 06/08/2023
दि. 02/10/2023 ते दि. 01/11/2023
सामान्यत: या वर्षी आराेग्याच्या बाबतीत विशेष तक्रार राहणार नाही.
 
 
 व्यवसाय, उद्याेग, आर्थिक स्थिती
 
या वर्षी आपल्या अपेक्षेप्रमाणे व इच्छेप्रमाणे आर्थिक लाभ हाेणार आहेत.संपूर्ण वर्षभर व्यवसायात नवनवीन संधी लाभणार आहे. बाजारपेठ वाढवू शकाल.व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. तुमचे निर्णय बराेबर येणार आहेत. दि. 17 जानेवारी 2023 पासून शनी आठव्या स्थानात असल्यामुळे काही वेळा निर्णय चुकतील. त्यामुळे काेणताही निर्णय घेताना चाैेर विचार करून व साधकबाधक पद्धतीने विचार करून निर्णय घ्यावा.दि. 21/04/2023 पर्यंत व्यवसायात नवीन संधी मिळतील. नवीन संपर्क हाेतील. तुमचा लाेकसंग्रह वाढेल. व्यापारात व व्यवसायात नवीन कल्पना अमलात आणू शकाल व या सर्वांचा लाभ दि. 22/04/2023 पासून मिळणार आहे. दि.22/04/2023 पासून प्रत्यक्ष आर्थिक लाभ हाेतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभणार आहे.
 
खालील कालखंड व्यवसाय व आर्थिक लाभाला चांगले आहेत.
 
दि. 01/01/2023 ते दि. 11/03/2023
दि. 20/03/2023 ते दि. 14/06/2023
दि. 01/07/2023 ते दि. 01/11/2023
 
वरील कालखंडात उधारी, उसनवारी वसूल हाेईल. बाजारपेठेचा व शेअर्सचा अभ्यास करून तारतम्याने धाडस करायला हरकत नाही. ट्रान्स्पाेर्ट, दळणवळण, कुरिअर, ज्वेलरी, कापड, ूड प्राॅडक्टस्, केटरिंग, हाॅटेल व रेस्टाॅरंट, तसेच शैक्षणिक व बाैद्धिक क्षेत्रांतील व्यक्तींना हे वर्ष चांगले जाणार आहे.
 
खालील कालखंडात प्रत्येक निर्णय घेताना, धाडस करताना, व्यवहार करताना खूप विचार करावयास हवा. नुकसानीची शक्यता अधिक हाेऊ शकते.अनपेक्षितरीतीने व्यवसायात अडचणी येऊ शकतात.
दि. 16/11/2023 ते दि. 27/12/2023
 
 नाेकरी
 
नाेकरीतील व्यक्तींना हे वर्ष खूपच समाधानकारक आहे. ज्या संधीची वाट आपण पाहात हाेता ती संधी आपणाला लाभणार आहे. वरिष्ठांचे, थाेरामाेठ्यांचे सहकार्य लाभेल. या वर्षी तुमची वाटचाल याेग्यरीतीने सुरू राहणार आहे. आपला प्रवास प्रगतीच्या दृष्टीने सुरू राहील. दि. 22/04/2023 ते दि. 31/12/2023 हा कालखंड अत्यंत सुयशाचा, बढतीचा आहे. प्रमाेशनचा आहे. तुमच्या जबाबदारीत वाढ हाेईल. उच्च अिर्ंधकारपद मिळेल. तसेच, ज्यांना बदली हवी आहे त्यांनी दि. 22/04/2023 ते दि. 31/12/2023 या कालखंडात प्रयत्न करावेत.तुम्हाला बदलीचे ठिकाण पाहिजे ते मिळणार आहे. दि. 22/04/2023 नंतर पगारवाढीचीही शक्यता आहे.
 
खालील कालखंड नाेकरीतील व्यक्तींना चांगले आहेत.
 
दि. 01/03/2023 ते दि. 11/03/2023
दि. 01/07/2023 ते दि. 16/09/2023
दि. 01/10/2023 ते दि. 02/11/2023
 
(बदलीसाठी विशेष अनुकूल कालखंड) खालील कालखंड नाेकरीमध्ये प्रतिकूल राहण्याची शक्यता आहे. तेव्हा नाेकरीतील व्यक्तींनी प्रत्येक बाबतीत जागरूक व दक्ष राहिले पाहिजे. आपण काेणत्याही जाळ्यामध्ये अडकणार नाही याची दक्षता घ्यावयास हवी. निर्णय चुकणे, प्रलाेभनाला बळी पडणे व एखाद्या प्रकरणात अडकणे असा हा कालखंड आहे.
दि. 13/03/2023 ते दि. 09/05/2023
दि. 17/11/2023 ते दि. 27/12/2023
 
 प्राॅपर्टी
 
प्राॅपर्टी, गुंतवणूक, जागा, जमिनी, फ्लॅट, प्लाॅट, बंगला, वाहन खरेदीसाठी हे वर्ष अत्यंत चांगले आहे. ज्यांना आयुष्यात एकदाच प्राॅपर्टी खरेदी करायची आहे, त्यांना हे वर्ष चांगले आहे. अनेकांचे प्राॅपर्टी खरेदी करण्याचे किंवा वाहन खरेदी करण्याचे स्वप्न या वषीं पूर्ण हाेणार आहे.
 
दि. 16/02/2023 ते दि. 01/05/2023
दि. 07/07/2023 ते दि. 06/08/2023
दि. 20/10/2023 ते दि. 01/11/2023
दि. 01/12/2023 ते दि. 24/12/2023
 
 संततिसाैख्य
 
संततिसाैख्य, मुलामुलींची प्रगती, मुलामुलींचे शाळा, काॅलेजमधील यश, नाेकरी, व्यवसायातील संधी या सर्व दृष्टीने कर्क राशीच्या व्यक्तींना हे वर्ष चांगले आहे. विद्यार्थ्यांना सुयश मिळणार आहे. मुलामुलींची प्रगती संताेषजनक असेल. मुलामुलींचे रखडलेले प्रश्न मार्गी लागतील. मात्र, आठव्या स्थानात शनी असल्यामुळे काही वेळा अनपेक्षितरीतीने काही समस्या निर्माण हाेण्याची शक्यता आहे. अर्थात त्याची ार चिंता करण्याचे कारण नाही.
 
खालील कालखंड संततिसाैख्याच्या दृष्टीने चांगले आहेत.
 
दि. 01/01/2023 ते दि. 12/03/2023
दि. 01/07/2023 ते दि. 18/08/2023
दि. 01/10/2023 ते दि. 02/11/2023
 
खालील कालखंडात मात्र, मुलामुलींच्या संदर्भात एखादी चुकीची, मनस्तापदायक देणारी घटना घडू शकते. तेव्हा खालील कालखंडात आपण मुलामुलींच्या दैनंदिन जीवनाकडे बारकाईने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
दि. 16/11/2023 ते दि. 27/12/2023
 
 वैवाहिक साैख्य
 
वैवाहिक साैख्याच्या दृष्टीने कर्क राशीच्या व्यक्तींना हे वर्ष चांगले आहे.पत्नी-पत्नीच्या वैवाहिक जीवनामध्ये हे वर्ष साैख्यकारक व प्रसन्नदायक असणार आहे. विवाहेच्छू मुलामुलींचे विवाह जमण्याच्या दृष्टीने हे वर्ष अत्यंत चांगले आहे. घरामध्ये मंगलकार्य, शुभ कार्य घडेल व घरात सर्व कार्ये या वर्षी अत्यंत प्रसन्नपणाने, आनंदाने, उमेदीने व उत्साहाने पार पडणार आहेत. या वर्षी मंगलकार्यामध्ये काेणत्याही अडचणी येणार नाहीत.
 
खालील कालखंड वैवाहिक साैख्याच्या दृष्टीने चांगले आहेत.
 
दि. 01/01/2023 ते दि. 12/03/2023
दि. 01/07/2023 ते दि. 18/08/2023
दि. 01/10/2023 ते दि. 02/11/2023
 
खालील कालखंडात वैवाहिक जीवनात मतभेद हाेण्याची शक्यता आहे.
दि. 13/03/2023 ते दि. 11/05/2023
दि. 16/11/2023 ते दि. 27/12/2023
 
 प्रवास
 
प्रवास, सहली, तीर्थयात्रा, परदेश प्रवास या दृष्टीने हे वर्ष अत्यंत अपवादात्म करीतीने चांगले ठरणार आहे. अनेकांना तीर्थयात्रेची संधी लाभणार आहे. व्यापार, शिक्षण, उद्याेग यासाठी काहींना परदेश प्रवासाची संधी लाभेल. ऐतिहासिक व धार्मिक ठिकाणी सहली आयाेजित करण्याचे याेग येतील. सर्व प्रवास सुखकर हाेणार आहेत.
 
खालील कालखंड हे प्रवासाच्या दृष्टीने विशेष साैख्यप्रद हाेणार आहेत.
 
दि. 01/01/2023 ते दि. 11/03/2023
दि. 01/07/2023 ते दि. 17/08/2023
दि. 01/10/2023 ते दि. 15/11/2023
 
खालील कालखंडात प्रवासात विशेष काळजी घ्यावी. वस्तू हरविणार नाहीत किंवा गहाळ हाेणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. तसेच वाहने चालवताना व प्रवासात खालील कालखंडात विशेष जागरूक राहावे.
दि. 16/11/2023 ते दि. 27/12/2023
 
 सुसंधी, प्रसिद्धी, लेखन, साहित्य
 
सुसंधी, प्रसिद्धी या दृष्टीने हे वर्ष कर्क राशीच्या व्यक्तींना असामान्य व असाधारण संधीचे आहे. तुमच्या इच्छा, आकांक्षा सफल हाेतील. तुमची मनाेरथे पूर्ण हाेणार आहेत. या वर्षी यशश्री तुम्हाला माळ घालणार आहे. तुमच्या कर्तृत्वाचा, तुम्हाला मिळालेल्या संधीचा अनेकांना हेवा वाटेल. तुमच्या भाेवती प्रसिद्धीचे वलय निर्माण हाेणार आहे. तुम्हाला अनपेक्षित असे यश लाभणार आहे. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. तुमचे अनुभवाचे क्षितिज व्यापक हाेणार आहे. सामाजिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात सहभागी हाेण्याची संधी मिळणार आहे. नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. लेखक, साहित्यिक, शैक्षणिक, बाैद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना खालील कालखंड चांगले जाणार आहेत.
 
खालील कालखंड सुसंधी, प्रसिद्धी या दृष्टीने चांगले आहेत.
 
दि. 15/03/2023 ते दि. 31/03/2023
दि. 07/06/2023 ते दि. 23/06/2023
दि. 25/07/2023 ते दि. 30/09/2023
दि. 01/10/2023 ते दि. 06/11/2023
 
तर कला, संगीत, नाट्य, मनाेरंजन, चित्रपट, चित्रकार व जीवनाच्या सर्व कलेच्या क्षेत्रांमध्ये या वर्षी आपणाला अपूर्व संधी मिळणार आहे. कलेच्या क्षेत्रात आपण या वर्षी एक वेगळी उंची गाठू शकाल.
 
खालील कालखंड या दृष्टीने अनुकूल आहेत.
 
दि. 16/02/2023 ते दि. 11/05/2023
दि. 07/06/2023 ते दि. 07/08/2023
दि. 02/10/2023 ते दि. 01/11/2023
दि. 01/12/2023 ते दि. 24/12/2023
 
 नातेसंबंध व आवक-जावक
 
यांचा ताळमेळ व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक प्रश्न असतात, अनेक समस्या असतात.काही समस्या आराेग्याच्या असतात, काही आर्थिक असतात, काही नाेकरीमधील असतात, तर काही काैटुंबिक जीवनाच्या असतात. परंतु, हे प्रश्न आपण मिटवू शकताे. परंतु, कुटुंबातील आई, वडील, भाऊ, बहिणी, मुले-मुली, काका, मामा, मावशी इ. नातेवाईक, मित्रमैत्रिणी, सहकारी, सार्वजनिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील सहकारी व आपण अधिकारावर असताना आपल्या हाताखालील सेवक वर्ग व वरिष्ठ यांच्याबराेबर असलेले नातेसंबंध हे ार महत्त्वाचे असतात. हे नातेसंबंध जर बिघडले तर खूप मानसिक त्रास हाेताे. आपण लाेकांबराेबर अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने वागूनसुद्धा इतर लाेक आपल्याबराेबर असे का वागतात याचा खूप मानसिक त्रास हाेताे. मात्र, कर्क राशीच्या व्यक्तींना हे वर्ष अनेक दृष्टीने चांगले आहे.
 
आराेग्याची साथ लाभणार आहे. तुमचे नातेवाइकांबराेबर चांगले संबंध राहणार आहेत. नातेवाइकांचा सल्ला लाभदायक ठरेल. घरातील कामगार वर्ग, सेवक वर्ग, व्यवसाय व नाेकरीतील सेवक वर्ग यांचे तुम्हाला या वर्षी अगदी मनापासूनचे सहकार्य लाभणार आहे. कर्क राशीच्या व्यक्तींची या वर्षी ही तक्रार राहणार नाही. मुलामुलींची प्रगती, त्यांचे शाळा, काॅलेजमधील यश, नाेकरी, व्यवसायातील कामगिरी ही चांगली असणार आहे. विवाहेच्छू मुले-मुली घरात असतील, तर त्यांचा विवाह पार पडणार आहे. घरामध्ये मंगलकार्य हाेईल. मित्रांचे सहकार्य लाभणार आहे. मुलांचे आपल्या आई-वडिलांबराेबर चांगले संबंध राहतील.
काही थाेड्या प्रमाणात संततिसाैख्यात व वैवाहिक साैख्यात कमतरता राहण्याची शक्यता आहे. तुमचे नवे हितसंबंध प्रस्थापित हाेतील. नवे सहकारी लाभतील.
 
तुमचे अनुभवविश्व व्यापक हाेणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. अडचणीच्या काळात नातेवाइकांची मदत लाभेल. एका बाजूला तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी, प्रसिद्धी, दुसऱ्या बाजूला नाेकरीत बढती, राजकारणात प्रतिष्ठा या सर्व गाेष्टींमुळे हे वर्ष आपणाला खूपच नातेसंबंधाचे चांगले जाईल. शनीची थाेडी प्रतिकूलता आहे; परंतु संपूर्ण वर्षभर गुरू अनुकूल असल्यामुळे जमा-खर्चाची ताेंडमिळवणी चांगली हाेणार आहे. आध्यात्मिक प्रगती हाेणार आहे. मानसिक प्रगल्भता वाढेल.नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. एक नवा उत्साह, नवी उमेद, आशावादी दृष्टिकाेन, सकारात्मक विचार व ग्रहांची साथ, यामुळे या वर्षी कर्क राशीच्या व्यक्ती एका वेगळ्या व आगळ्या सुखासमाधानाच्या साम्राज्यात राहतील.
 
 
 प्रतिष्ठा, मानसन्मान
 
सार्वजनिक जीवनात यश, अधिकारपद, राजकीय जीवनात प्रतिष्ठा, मानमान्यता या दृष्टीने कर्क राशीच्या व्यक्तींना हे वर्ष अपेक्षित यश मिळण्याच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल आहे. विशेषत: दि. 22/04/2023 पासून येणारा प्रत्येक दिवस आपणालाअधिकारपदाकडे, यशाकडे घेऊन जाईल. ज्या संधीची वाट आपण पाहात आहात ती संधी या वर्षी मिळणार आहे. सामाजिक, राजकीय व सार्वजनिक, बँकिंग, सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक सर्व क्षेत्रांमध्ये आपली वाटचाल प्रगतीच्या दृष्टीने हाेणार आहे. या वर्षी आपल्याकडे लाेक आदराने पाहतील. धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रात आपल्या हातून काही चांगल्या गाेष्टी घडतील. काही व्यक्तींच्या हातून मंदिरे बांधली जातील. आध्यात्मिक क्षेत्रात काहींची मानसिक उन्नती हाेईल. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढणार आहे. इतरांना आपले विचार व मते पटवून देण्यात यशस्वी व्हाल. नेतृत्वाची संधी आपणाला लाभणार आहे.
 
खालील कालखंड प्रतिष्ठा, मानसन्मान यादृष्टीने अनुकूल आहेत.
 
दि. 15/03/2023 ते दि. 15/05/2023
दि. 01/07/2023 ते दि. 16/09/2023
दि. 18/10/2023 ते दि. 15/11/2023
 
खालील कालखंडात सार्वजनिक जीवनात अत्यंत कटाक्षाने सावधपणे व जागरूकपणे राहावे.
 
दि. 16/11/2023 ते दि. 26/12/2023
 
खालील कालखंड कर्क राशीच्या व्यक्तींना दैनंदिन कामे यशस्वी हाेण्यासाठी, अडलेली कामे मार्गी लागतील, उत्साह, उमेद वाढेल. गाठीभेटी व परिचय हाेतील. खालील कालखंड भाग्यकारक आहेत.
 
दि. 26/01/2023 ते दि. 31/01/2023
दि. 22/02/2023 ते दि. 28/02/2023
दि. 21/03/2023 ते दि. 27/03/2023
दि. 18/04/2023 ते दि. 23/04/2023
दि. 15/05/2023 ते दि. 21/05/2023
दि. 11/06/2023 ते दि. 17/06/2023
दि. 09/07/2023 ते दि. 14/07/2023
दि. 05/08/2023 ते दि. 11/08/2023
दि. 01/09/2023 ते दि. 07/09/2023
दि. 29/09/2023 ते दि. 04/10/2023
दि. 26/10/2023 ते दि. 31/10/2023
दि. 22/11/2023 ते दि. 28/11/2023
दि. 20/12/2023 ते दि. 25/12/2023