मेष

    04-Jan-2023
Total Views |
 
 
1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023
 
 
नाेकरी व व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील
 

Horoscope 
 
 
मेष ही राशी चक्रातील पहिली रास आहे. ‘मेंढा’ हे या राशीचे प्रतीक आहे.मेंढ्याप्रमाणे लढाऊपणाने व निकराने काेणत्याही प्रसंगात टक्कर देण्याचा आपला स्वभाव आहे. आपल्या राशीवर ‘मंगळ’ या ग्रहाचे स्वामित्व आहे. त्यामुळे आपण शूर, करारी व बाणेदार आहात. स्वाभिमानी आहात. त्यामुळे काेणाच्याही हाताखाली चाकरी करणे, नाेकरी करणे, गुलामगिरी करणे आपल्याला मानवत नाही. आपली रास ही अग्नितत्त्वाची आहे. रजाेगुणांनी परिपूर्ण भरलेली आहे. ही पुरुष रास आहे.अल्पप्रसव व चर रास आहे.मूर्तिमंत चैतन्य, उसळणारे तारुण्य, ओसंडून जाणारा उत्साह ही आपली वैशिष्ट्ये आहेत. आपले खरे कर्तृत्व हे युद्धभूमीवर, रणांगणावर व अटीतटीच्या प्रसंगात दिसून येते.आपण आपल्या तंत्रानेच चालत असता. दुसऱ्याचे ऐकणे हे आपल्या स्वभावात नसते. आपल्याच मस्तीत व धुंदीत बेगुमानपणे व उन्मत्तपणे अक्राळविक्राळ लाटांनी ेसाळत व दुथडी भरून पूर आलेल्या व वेगाने वाहणाऱ्या नदीसारखा आपला स्वभाव आहे. समुद्राला भरती आल्यानंतर जशा लाटा उसळत असतात, तसा आपला स्वभाव सळसळता असा आहे.
 
संकटाला न घाबरणारी व साक्षात मृत्यूच्या जबड्यात प्रवेश करण्याला न घाबरणारी आपली रास आहे.टणक पाेलादाप्रमाणे आपले व्यक्तिमत्त्व असते. आपला पराभव करणे हे साेपे नसते. आपले ध्येय, आपले इप्सित, आपले मनाेरथ, आपली स्वप्ने आपण सहजपणे गाठू शकता. नेतृत्व व पुढारपण यासाठी लागणारे सर्व गुण आपणाकडे असतात. अनेक याेजनांचे आपण जनक असता. अनेक बाबतीत आपण अग्रेसर असता. मिरवणुकीत आपण अग्रभागी असता. कुटुंबातील व्यक्तींनी, ऑिफसमधील सहकाऱ्यांनी व आपल्या परिवारातील सर्वांनी आपल्याच तंत्राने, आपल्याच मनाने वागावे असे मनाेमन आपणाला वाटत असते. सारांश, विजयासाठी, यशासाठी, साफल्यासाठी लागणारे अनेक गुण आपणात असतात. म्हणून जीवनाच्या संग्रामात, जीवनाच्या लढाईत व या जीवनाच्या रंगभूमीवर आपण सहजपणे विजय संपादन करू शकता.
 
 आराेग्य
 
सामान्यत: दि. 22/04/2023 पासून आपले आराेग्य चांगले राहणार आहे.दि. 22/04/2023 पासून आपल्या शारीरिक तक्रारी कमी हाेतील. या वर्षी जबाबदारी वाढणार आहे. काैटुंबिक जीवनात, नाेकरी, व्यवसायात व सार्वजनिक कार्यात सर्वत्र जबाबदारी वाढेल. त्यामुळे कामाचा ताण वाढणार आहे. दगदग वाढणार आहे. दि. 01/01/2023 पासून ते दि. 13/03/2023 पर्यंतचा कालखंड हा मेष राशीच्या व्यक्तींना अत्यंत चांगला आहे. या कालखंडात आराेग्य चांगले राहणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुम्हीसकारात्मक दृष्टीने विचार कराल. तुमचे निर्णय व अंदाज बराेबर येतील. तुमची पावले याेग्य दिशेने पडणार आहेत. उत्साह, उमेद वाढेल. हा कालखंड अनेक दृष्टीने चांगला जाणार आहे.
शासकीय कामात यश मिळेल.
 
खालील कालखंड आराेग्याच्या दृष्टीने चांगले ठरतील.
दि. 01/01/2023 ते दि. 11/02/2023
दि. 13/03/2023 ते दि. 18/08/2023
 
खालील कालखंडात आपण प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे.
दि. 19/08/2023 ते दि. 28/09/2023
दि. 16/11/2023 ते दि. 27/12/2023
 
 व्यवसाय, उद्याेग, आर्थिक स्थिती
 
व्यवसायाच्या दृष्टीने हे संपूर्ण वर्ष चांगले आहे. व्यवसायाची उलाढाल मनासारखी वाढेल. मात्र, आर्थिक लाभाचे प्रमाण किंवा व्यवसायाला वेग हा दि.22/04/2023 नंतर येणार आहे. महत्त्वाचे निर्णय दि. 22/04/2023 नंतर घ्यावेत. दि. 22/04/2023 नंतर व्यवसायात नवीन संपर्क निर्माण हाेतील.व्यवसायाला नवीन दिशा सापडेल. तुमचा जनसंपर्क वाढेल व नवीन बाजारपेठ किंवा ग्राहक संख्या वाढविण्यात यशस्वी व्हाल. दि. 22/04/2023 नंतर उत्साह वाढेल, उमेद वाढेल. आशावादी व सकारात्मक दृष्टीने विचार कराल. आर्थिक लाभाच्या दृष्टीने प्राॅपर्टी, वाहने, जागा, जमिनी, बिल्डर्स, डेव्हलपर्स व काॅन्ट्रॅक्टर्स यांना संपूर्ण वर्ष चांगले आहे.
 
या वर्षी कापड, साडी सेंटर, ज्वेलर्स, केटरिंग, हाॅटेल, रेस्टाॅरंट, ूड प्राॅडक्टस्, ाेटाेग्राी, अभिनय, कला, संगीत, नाट्य, पेंटस् या सर्व क्षेत्रातील व्यक्तींना ार माेठे सुयश लाभणार आहे.विशेषत: दि.22/04/2023 पर्यंतचा कालखंड हा अधिक चांगला जाणार आहे. या वर्षी दि. 17/01/2023 पासून शनी कुंभ राशीत लाभस्थानी राहणार आहे. त्याचा ायदा मेष राशीच्या व्यक्तींना मिळणार आहे. हा शनी व्यवसायाची उलाढाल वाढवेल. व्यवसायात प्रगती करून देईल. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील.जुने येणे, उधारी वसूल हाेईल. बाजारपेठेचा व शेअर्सचा अभ्यास करून धाडस करायला हरकत नाही.
 
खालील कालखंड व्यवसाय व आर्थिक लाभाच्या दृष्टीने चांगले आहेत.
दि. 01/01/2023 ते दि. 15/02/2023
दि. 06/04/2023 ते दि. 02/05/2023
दि. 01/06/2023 ते दि. 01/11/2023
 
खालील कालखंडात धाडस करताना चाैेर विचार करावयास हवा. नुकसानीची शक्यता अधिक आहे. त्याच्यामुळे व्यवसायात किंवा शेअर्समध्ये धाडस करताना, आर्थिक व्यवहार करताना अत्यंत जागरूकतेने करावयास हवे.दि. 17/11/2023 ते दि. 27/12/2023 वरील कालखंडात अत्यंत विचारपूर्वक निर्णय घ्यावयास हवेत. व्यापारात, व्यवसायात काेणताही धाेका पत्करण्याचे टाळावे.
 
 नाेकरी
 
नाेकरीतील मेष राशीच्या व्यक्तींना हे वर्ष समाधानकारक आहे. पगारवाढीची शक्यता आहे. मात्र, ार माेठे यश मिळण्याची या वर्षी अपेक्षा नकाे. हे वर्ष तसे आपणाला सर्वसामान्य आहे. नाेकरीमध्ये ार माेठे यश जरी मिळाले नाही, तरीही दि. 01/05/2023 पासून आपणाला बऱ्यापैकी स्वास्थ्य लाभेल. पुढच्या वर्षी आपणाला जी संधी मिळणार आहे त्याचा पाया या वर्षामध्ये भरला जाणार आहे.या वर्षातील तुमचा अनुभव, तुमचे काम, तुमचे कर्तृत्व, तुमची निष्ठा या सर्वांचे चीज पुढच्या वर्षी हाेणार आहे. वरिष्ठांबराेबर तुमचा सुसंवाद चांगला राहील. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. दि. 22/04/2023 पासूनचा कालखंड हा अधिक चांगला जाणार आहे. या कालखंडात तुमची प्रगती हाेईल. दि. 16/08/2023 ते दि. 16/09/2023 हा कालखंड वरिष्ठांची कृपा मिळण्याच्या संदर्भात अधिक चांगला जाईल. दि. 22/04/2023 नंतर तुम्ही नाेकरीच्या संदर्भातील घेतलेले निर्णय, तुमचे अंदाज, तुमचे धाेरण व तुमचे विचार या सर्व गाेष्टी याेग्य ठरणार आहेत. यामुळे तुम्ही केलेले नियाेजन हे अत्यंत याेग्य व उचित ठरणार आहे.
 
खालील कालखंड नाेकरीतील व्यक्तींना चांगले आहेत.
 
दि. 01/01/2023 ते दि. 13/03/2023
दि. 14/04/2023 ते दि. 15/07/2023
दि. 10/10/2023 ते दि. 16/11/2023
 
खालील कालखंड नाेकरीतील व्यक्तींना संमिश्र स्वरूपाचे जातील.
दि. 17/08/2023 ते दि. 16/09/2023
 
खालील कालखंडात आपण काेणत्याही प्रलाेभनाला बळी पडता कामा नये.खालील कालखंडात जागरूकतेने व सावधपणाने राहावे.
दि. 16/11/2023 ते दि. 27/12/2023
 
 प्राॅपर्टी
 
प्राॅपर्टीसाठी हे वर्ष चांगले आहे. गुंतवणुकीलाही चांगले आहे. बाराव्या स्थानातील गुरूची प्राॅपर्टीच्या स्थानावर दृष्टी आहे व हा गुरू दि. 22/04/2023 ला प्रथमस्थानात येत आहे. याही गुरूची दृष्टी भाग्यस्थानावर राहणार आहे.त्यामुळे या वर्षी आपणाला प्राॅपर्टी घ्यायची असेल, तर घेऊ शकता. गेल्या अडीच वर्षांच्या कालखंडात अनेकांचे प्राॅपर्टीचे व्यवहार रखडले असण्याची शक्यता आहे.
मात्र, आता या वर्षी प्राॅपर्टीचे व्यवहार मार्गी लागणार आहेत. तुमच्या प्राॅपर्टीच्या कामामध्ये या वर्षी ार अडचणी येणार नाहीत.
 
खालील कालखंड आपणाला प्राॅपर्टीच्या दृष्टीने चांगले जातील.
दि. 01/01/2023 ते दि. 22/01/2023
दि. 12/03/2023 ते दि. 05/04/2023
दि. 01/06/2023 ते दि. 02/11/2023
 
 संततिसाैख्य
 
मुलामुलींचे साैख्य, त्यांची शाळा, काॅलेजमधील प्रगती, प्रवेश व परीक्षेचा निकाल, त्यांची नाेकरी, व्यवसायातील प्रगती या दृष्टीने दि. 22/04/2023 पासूनचा कालखंड अत्यंत अनुकूल व सुयशाचा आहे. दि. 22/04/2023 नंतरच्या कालखंडात आपल्या मुलामुलींची शैक्षणिक क्षेत्रात, नाेकरी, व्यवसायात अत्यंत मन प्रसन्न करणारी प्रगती हाेणार आहे. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. तुमच्या मुलामुलींना अपेक्षित चांगली संधी लाभणार आहे. मुलामुलींचे निर्णय चांगले ठरतील.
 
दि. 22/04/2023 नंतर आपल्या मुलामुलींची प्रगती ही अत्यंत साैख्यकारक व आनंद देणारी असणार आहे. संततिसाैख्याच्या दृष्टीने मेष राशीच्या व्यक्तींना दि. 22/04/2023 पासूनचा कालखंड खूपच चांगला जाणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या महाविद्यालयात किंवा आवडीचे क्षेत्र मिळेल. परीक्षेत यश मिळेल.ज्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचे आहे त्यांना संधी मिळेल. मुलामुलींच्या प्रगतीच्या दृष्टीने मेष राशीच्या व्यक्तींना दि. 22/04/2023 नंतरचा कालखंड अत्यंत यशाचा, साैख्याचा असा ठरणार आहे.
 
खालील कालखंड संततिसाैख्याच्या दृष्टीने चांगले आहेत.
 
दि. 01/01/2023 ते दि. 14/03/2023
दि. 22/04/2023 ते दि. 12/05/2023
दि. 06/07/2023 ते दि. 01/11/2023
 
खालील कालखंडात मुलामुलींच्या संदर्भात एखादी समस्या निर्माण हाेण्याची शक्यता आहे. मुलामुलींनी त्यांचे आराेग्य सांभाळायचे आहे. वाहन चालविणे, प्रवास, महत्त्वाचे निर्णय व आपले मित्र व संबंधित सर्व व्यक्ती या सर्व संबंधात जास्तीत जास्त जागरूक राहावयास हवे.
 
दि. 16/11/2023 ते दि. 27/12/2023
 
 वैवाहिक
 
साैख्य वैवाहिक साैख्य, विवाहेच्छू मुलामुलींचे विवाह या दृष्टीने सामान्यत: दि.22/04/2023 नंतरचा कालखंड हा साैख्यदायक आहे. घरामध्ये मंगलकार्य हाेईल. शुभ कार्य, मंगल कार्य यासाठी दि. 22/04/2023 पासूनचा कालखंड चांगला आहे. वैवाहिक साैख्याच्या दृष्टीने व विवाहेच्छूंचे विवाह हाेण्याच्या दृष्टीने दि. 22/04/2023 नंतरचा कालखंड निश्चित चांगला आहे. घरात मंगल कार्य घडेल. रखडलेले विवाह दि. 22/04/2023 नंतर निश्चित हाेतील. गेली अडीच वर्षे विवाहेच्छू मुलामुलींच्या दृष्टीने चांगली नव्हती. शनी प्रतिकूल हाेता. आता दि.17/01/2023 पासून गुरू प्रथमस्थानात येत आहे व शनी दि. 17/01/2023 राेजी अकराव्या स्थानात जाणार आहे. त्यामुळे आता मेष राशीच्या विवाहेच्छू मुलामुलींचे विवाह जुळणार आहेत व हाेणार आहेत.
 
खालील कालखंड वैवाहिक साैख्याच्या दृष्टीने चांगले आहेत.
दि. 01/01/2023 ते दि. 12/02/2023
दि. 12/03/2023 ते दि. 02/05/2023
दि. 01/07/2023 ते दि. 02/10/2023
 
खालील कालखंड वैवाहिक साैख्यासाठी प्रतिकूल आहेत. त्यासाठी संयम, विवेक, एकमेकांचे विचार समजून घेण्याची वैचारिकता या गाेष्टींची आवश्यकता आहे.
 
दि. 10/05/2023 ते दि. 30/06/2023
दि. 03/10/2023 ते दि. 27/12/2023
 
वरील कालखंड जरी त्रासदायक असले, तरीही गुरूची अनुकूलता असल्यामुळे वैवाहिक जीवनातील मतभेद टाेकाचे असणार नाहीत.
 
 प्रवास
 
प्रवास, तीर्थयात्रा, सहली, परदेश प्रवासया दृष्टीने दि. 22/04/2023 नंतरचा कालखंड चांगला आहे. विशेषत: विद्यार्थ्यांना या वर्षी उच्च शिक्षणासाठी परदेशाला जाण्याची निश्चित संधी मिळेल. तसेच उद्याेजक, व्यापारी व सहलीसाठी जाणारे पर्यटक यांना दि. 22/04/2023 नंतरचा कालखंड हा अत्यंत चांगला आहे. अनेकांना या वर्षी तीर्थयात्रेची संधी मिळणार आहे. दि. 22/04/2023 पासून काही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी लाभेल. या वर्षी गुरू बाराव्या व पहिल्या स्थानात असणार आहे. हा गुरू आध्यात्मिक प्रगतीसाठी चांगला आहे. त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींना संपूर्ण वर्ष तीर्थयात्रेच्या दृष्टीने चांगले आहे. अनपेक्षितरीत्या आपणाला तीर्थयात्रेची संधी मिळेल.
 
खालील कालखंड हे प्रवासाच्या दृष्टीने विशेष साैख्यप्रद राहणार आहेत.
दि. 12/03/2023 ते दि. 09/05/2023
दि. 01/07/2023 ते दि. 18/08/2023
द. 04/10/2023 ते दि. 15/11/2023
 
खालील कालखंडात प्रवासामध्ये व वाहने चालवताना खूपच काळजी व दक्षता घ्यावयास हवी. या गाेष्टीची मेष राशीच्या व्यक्तींनी अत्यंत गांभीर्याने दखल घ्यावयास हवी.
दि. 16/11/2023 ते दि. 27/12/2023
 
 सुसंधी, प्रसिद्धी, लेखन, साहित्य
 
सुसंधी, प्रसिद्धी, साहित्य व लेखन या क्षेत्रात, तसेच बाैद्धिक क्षेत्रात, शास्त्रीय संशाेधनासाठी दि. 22/04/2023 नंतरचा कालखंड हा अत्यंत चांगला जाणार आहे. तुमच्या आशाआकांक्षा सफल हाेतील. तुमची स्वप्ने व मनाेरथे सिद्धीला जातील. ज्या संधीची आपण वाट पाहत हाेता, ती संधी या कालखंडात लाभणार आहे. तुमचा जनसंपर्क वाढेल. तुम्हाला याेग्य मार्ग दिसेल, याेग्य दिशा सापडेल.काय करायचे आहे, काेठे जायचे आहे, काेणाला भेटायचे आहे हे सर्व जुळून येणार आहे. तुमचे अनुभवाचे क्षितिज व्यापक हाेणार आहे. दि. 22/04/2023 पासून गुरू पहिल्या स्थानात राहणार आहे व शनी दि. 17/01/2023 पासून लाभ स्थानात राहणार आहे. या दाेन ग्रहांची स्थिती मेष राशीच्या व्यक्तींना पाेषक राहणार आहे. शैक्षणिक व बाैद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल.
 
वृत्तपत्र, कायदा, विमा, अकाैंटन्सी, लेखन, प्रकाशन, शिक्षण, प्रसारमाध्यमे या क्षेत्रातील व्यक्तींना या वर्षी अपूर्व संधी मिळेल. विशेषत: दि. 22/04/2023 पासून तुमच्या आशाआकांक्षा सफल हाेतील. ज्या संधीची आपण वाट पाहत हाेता, ती संधी आता निश्चितपणे मिळणार आहे. कला, संगीत, नाट्य, लेखन, प्रकाशन या क्षेत्रात तुम्ही अपूर्व कामगिरी करू शकाल. नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. अनेक चांगल्या माेठ्या व जाणत्या व ज्ञानी व्यक्तींच्या संपर्कात याल. थाेरामाेठ्यांचे मार्गदर्शन लाभेल. वर्षाच्या शेवटी आपण या वर्षी ार माेठी कामगिरी पार पाडली असा आनंद आपणाला लाभणार आहे. तुमच्या क्षेत्रात तुम्ही या वर्षी नावलाैकिक, सुयश, प्रसिद्धी मिळवू शकाल.
 
खालील कालखंड सुसंधी, प्रसिद्धी, लेखन या दृष्टीने चांगले आहेत.
 
दि. 01/01/2023 ते दि. 15/03/2023
दि. 01/04/2023 ते दि. 06/06/2023
दि. 25/06/2023 ते दि. 06/07/2023
दि. 25/07/2023 ते दि. 31/09/2023
दि. 19/10/2023 ते दि. 05/11/2023
 
कला, संगीत, नाट्य, अभिनय, मनाेरंजन या क्षेत्रातील व्यक्तींना खालील कालखंड सुखावह ठरतील व प्रगतिकारक ठरतील. कलेच्या क्षेत्रात तुमचे नाव उजळून येईल. यशश्री तुम्हाला माळ घालणार आहे. संगीत व नाट्याच्या क्षेत्रात तुम्ही अभिनव असे कार्य करू शकाल. तुम्हाला अभूतपूर्व प्रसिद्धी लाभेल.
 
खालील कालखंड या दृष्टीने अनुकूल आहेत.दि. 05/01/2023 ते दि. 14/02/2023 दि. 06/04/2023 ते दि. 02/05/2023 दि. 07/07/2023 ते दि. 06/08/2023 दि. 01/10/2023 ते दि. 01/11/2023
 
 नातेसंबंध व आवक-जावक यांचा ताळमेळ
 
आपल्या जीवनात व्यवसायाचे प्रश्न असतात, नाेकरीचे प्रश्न असतात, काैटुंबिक प्रश्न असतात. परंतु, हे प्रश्न आपण साेडवू शकताे. परंतु कुटुंबातील आई, वडील, भाऊ, बहीण, मित्र, सहकारी, आपले कर्मचारी, आपण नाेकरीत असलाे, तर आपले वरिष्ठ व हाताखालील सेवक, व्यवसायातील भागीदार व जीवनात आपल्या निकट असलेले काही जवळचे मित्रमैत्रिणी यांचे संबंध कसे राहणार, नातेवाइकांचे संबंध कसे राहणार हाही प्रश्न असताे. या वर्षी महत्त्वाचा ग्रह गुरू हा बाराव्या स्थानात दि. 21/04/2023 पर्यंत आहे. त्यामुळे ज्यांची नवीन मैत्री झालेली आहे त्यांचे ारसे सहकार्य असणार नाही. जीवनात ज्या काही चांगल्या गाेष्टी घडतील त्या दि. 21/04/2023 नंतर घडणार आहेत.
 
मेष राशीच्या व्यक्तींना काैटुंबिक जीवनात संततिसाैख्याच्या दृष्टीने व वैवाहिक साैख्याच्या दृष्टीने दि. 21/04/2023 नंतरचा कालखंड चांगला आहे. तुमचे व्यक्तिमत्त्व, तुमचे निर्णय, तुमच्यातील आत्मविश्वास, जिद्द, निर्धार, धाडस यामुळे अनेकलाेकांच्यावर, जवळच्या सहकाऱ्यांच्यावर आपला प्रभाव पडणार आहे.आपण इतरांना मार्गदर्शन करू शकता. बाैद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल.आपली पावले याेग्य दिशेने पडतील आणि आपले संबंध सर्वांबराेबर जिव्हाळ्याचे व प्रेमाचे राहणार आहेत व या वर्षी दि. 21/04/2023 नंतरच्या कालखंडात आपली आवक-जावक, आपला ताळेबंद हे सर्व व्यवस्थित राहणार आहे. त्यामुळे दि. 21/04/2023 नंतरच्या कालखंडात आपले सर्वांबराेबर चांगले साैहार्दाचे संबंध राहणार आहेत.
 
 प्रतिष्ठा, मानसन्मान
 
प्रतिष्ठा, मानसन्मान, अधिकार, कीर्ती, सुयश या दृष्टीने हे वर्ष सर्वसामान्य आहे. हे वर्ष प्रत्यक्ष अधिकारापेक्षा काैटुंबिक साैख्य, नवीन संधी, प्रवास, तीर्थयात्रा, आध्यात्मिक प्रगती या दृष्टीने चांगले आहे. या वर्षी आपण जे काम कराल, जे कर्तृत्व दाखवून द्याल, ज्या निष्ठेने कार्य कराल त्याचे फळ पुढच्या वर्षी मिळणार आहे. कारण आपण या वर्षी खूप काही अभिनव पद्धतीने कार्य करू शकाल.तेव्हा तुमचे कर्तृत्व, अनुभव व विद्वत्ता याचे चीज पुढच्या वर्षी लाभणार आहे.या वर्षी प्रत्यक्ष अधिकारापेक्षा तुमच्या कार्याची प्रशंसा केली जाईल. प्रतिष्ठा, मानसन्मान या दृष्टीने या वर्षीचा कालखंड हा सामान्य स्वरूपाचा आहे.
 
परंतु, दि.01/01/2023 ते दि. 13/03/2023 पर्यंतचा कालखंड हा माेठ्या लाेकांचे सहकार्य व साह्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. शासकीय कामात यश मिळेल.काही थाेरामाेठ्यांचे आशीर्वाद आपणाला मिळतील. प्रत्यक्ष अधिकारापेक्षा, एखादे पद मिळण्यापेक्षा पुढच्या वर्षी जी संधी आपणाला लाभणार आहे, त्याची पूर्व तयारी म्हणून हे वर्ष आपण समजायला हरकत नाही. सार्वजनिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपण जे काम करत आहात, त्याचे फळ आपणाला पुढच्या वर्षी लाभणार आहे. या वर्षी तुमची पावले याेग्य दिशेने पडणार आहेत. तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत व या सर्वांचे चीज पुढील वर्षी हाेईल.
 
 
तरीही खालील कालखंड प्रतिष्ठा, मानसन्मान यादृष्टीने अनुकूल आहेत.
 
दि. 15/01/2023 ते दि. 12/02/2023
दि. 14/04/2023 ते दि. 14/05/2023
दि. 01/07/2023 ते दि. 17/09/2023
 
मेष राशीच्या व्यक्तींना प्रत्येक महिन्याचे दिलेले खालील कालखंड सामान्यत: सुयश, प्रवास, उत्साह, उमेद, कामे मार्गी लागणे या दृष्टीने अनुकूल ठरणार आहेत.
 
दि. 20/01/2023 ते दि. 25/01/2023
दि. 16/02/2023 ते दि. 21/02/2023
दि. 15/03/2023 ते दि. 20/03/2023
दि. 11/04/2023 ते दि. 17/04/2023
दि. 09/05/2023 ते दि. 14/05/2023
दि. 05/06/2023 ते दि. 10/06/2023
दि. 02/07/2023 ते दि. 08/07/2023
दि. 30/07/2023 ते दि. 31/07/2023
दि. 01/08/2023 ते दि. 04/08/2023
दि. 26/08/2023 ते दि. 31/08/2023
दि. 23/09/2023 ते दि. 28/09/2023
दि. 20/10/2023 ते दि. 25/10/2023
दि. 16/11/2023 ते दि. 21/11/2023
दि. 13/12/2023 ते दि. 19/12/2023