जगातील सर्वांत माेठी 35 फूट लांबीची एसयूव्ही : वजन 24 टन

31 Jan 2023 23:51:08
 
 

SUV 
अब्जाधीश शेख हमद बिन हमदान अल नाह्यान ऊर्फ रेनबाे शेख हा कारचा शाैकिन मानला जाताे. त्याच्या संग्रहामध्ये एकापेक्षा एक अद्वितीय कार, ट्रक आणि एसयूव्हीचा समावेश आहे. यापैकी एक कार आहे 10 चाकी धाबीयान. मॅड मॅ्नस स्टाइलची ही अवाढव्य एसयूव्ही कार, दाेन वेगवेगळ्या एसयूव्ही आणि एका मिलिटरी ट्रकचे पार्टस लावून तयार करण्यात आली आहे. ही कार 35 फूट लांब असून, वजन 24 टन आहे. या कारला 15.2 लिटर कॅटरपिलर सी-15 इंजिन आहे. पण शेखने या कारची किंमत किती आहे, हे जाहीर केलेले नाही.
Powered By Sangraha 9.0