आराेग्य विभागाच्या प्रधान सचिवांकडून उस्मानाबादेत स्त्री रुग्णालयाची पाहणी

    31-Jan-2023
Total Views |
 
 

Health 
राज्य सरकारच्या सार्वजनिक आराेग्य व कुटुंब कल्याण विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयास भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली.यावेळी जिल्हा प्रजनन व बालसंगाेपन अधिकारी डाॅ. शशिकांत मिटकरी, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. राजाभाऊ गलांडे, स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डाॅ.स्मिता सराेदे-गवळी, डाॅ. सुधीर साेनटक्के आदी उपस्थित हाेते.खंदारे यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करून अडचणी जाणून घेतल्या.
 
जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचार वप्रसूतीसाठी येणाऱ्या महिला रुग्णांची संख्या लक्षात घेऊन आंतररुग्ण विभाग अद्ययावत करण्याबाबत खंदारे यांनी सूचना केल्या. तसेच, आवश्यक त्या बाबींसाठी प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना सूचित केले. डाॅ. गवळी यांनी सुमन, जननी सुरक्षा याेजना, जननी शिशु सुरक्षा याेजनांच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली.रुग्णालयातील अद्ययावत शस्त्रक्रिया विभाग, आयसीयू व एनआयसीयू या विभागांत माता व बालकांना उपचार देण्यात आले. स्त्री रुग्णालयाला राष्ट्रीय लक्ष्य या अभियानात प्रमाणित असल्याने खंदारे यांनी समाधान व्यक्त केले.