बिगबेनमधील घंटेचे वजन 14 टन

    28-Jan-2023
Total Views |
 
 
 

Bigben 
लंडनच्या संसद भवनात 55 मीटर उंचीवर असलेले बिगबेन घंटाघर म्हणजे एक नवलाई आहे. तसे याचे नाव सेंट स्टीफन टाॅवर आहे पण हे वेस्टमिन्स्टर घंटाघर नावानेही ओळखले जाते.याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे ते विशालकाय घड्याळात वाजणारी माेठी घंटा. जिचे वजन 14 टन आहे. याचा लंबक दर सेकंदानंतर खटखट करताे. ताे 4 मीटर लांब आहे. याचा गाेलक 203 कि.ग्रॅ.वजनाचा आहे. यातील 4.3 मीटर लांब व 101 कि.ग्रॅ. वजनाचा काटा तांब्याचा असून ताे एका वर्षांत 60 किलाेमीटर प्रवास करताे. तासकाटा गनमेटलचा आहे. ताे 2.7 कि.मी. लांब व 304 कि.ग्रॅ. वजनाचा आहे. घड्याळात असलेले आकडे 0.6 मी.उंच आहेत. मिनिटाच्या खुणा 3 चाै. मीटर क्षेत्रफळाच्या आहेत.या घड्याळापर्यंत पाेहाेचण्यासाठी 292 पायऱ्या चढाव्या लागतात. याची निर्मिती 1850 मध्ये केली गेली.