सिडनी ऑपेरा हाउस

    25-Jan-2023
Total Views |
 
 

Opera 
 
सिडनी ऑपेरा हाउस हे ऑस्ट्रेलिया देशाच्या सिडनी शहरामधील एक बंदिस्त नाट्यगृह आहे. याेर्न उट्झन या डॅनिश स्थापत्यकाराने कल्पिलेले व बांधलेले हे नाट्यगृह इ.स. 1973 साली खुले करण्यात आले. सिडनी ऑपेरा हाउसमध्ये नृत्य, नाटके, ऑपेरा, संगीत असे अनेक प्रकारचे कार्यक्रम हाेतात सिडनी हे ऑस्ट्रेलिया देशामधील सगळ्यात माेठे शहर व आर्थिक राजधानी आहेतसेच हे शहर न्यू साउथ वेल्स या राज्याची राजधानी देखील आहे. ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात टास्मान समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या सिडनीची लाेकसंख्या 46 लाखांहून अधिक आहे. सिडनी या शहराची स्थापना जानेवारी 26, इ.स. 1788 राेजी आर्थर फिलिपने केली. सुरुवातीला हे शहर म्हणजे ब्रिटिश कैद्यांची वस्ती हाेते. आजच्या घडीला ऑपेरा हाउस व सिडनी हार्बर ब्रिज ही जगप्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळे असणारे सिडनी हे एक आघाडीचे जागतिक शहर आहे. येथील सिडनी क्रिकेट मैदान प्रसिद्ध आहे. सिडनी 26 व्या ऑलिंपिक स्पर्धांचे यजमान शहर हाेते.
 
स्टेडियम ऑस्ट्रेलिया व सिडनी क्रिकेट मैदान ही सिडनीमधील प्रमुख स्टेडियम आहेत. न्यू साउथ वेल्स ब्ल्यूज हा शेफील्ड शील्डमध्ये खेळणारा संघ तर सिडनी सिक्सर्स व सिडनी थंडर हे बिग बॅश लीगमध्ये खेळणारे क्रिकेट संघ सिडनीमध्ये स्थित आहेत. ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल रग्बी लीगमधील 16 पैकी 9 संघ सिडनीमध्येच आहेत.सिडनी ऑपेरा हाउस हे ऑस्ट्रेलिया देशाच्या सिडनी शहरामधील एक बंदिस्त नाट्यगृह आहे. याेर्न उट्झन या डॅनिश स्थापत्यकाराने कल्पिलेले व बांधलेले हे नाट्यगृह इ.स.1973 साली खुले करण्यात आले. सिडनी ऑपेरा हाउसमध्ये नृत्य, नाटके, ऑपेरा, संगीत असे अनेक प्रकारचे कार्यक्रम हाेतात. वर्षामध्ये सरासरी 1,500 कार्यक्रम भरवणारे हे ऑपेरा हाउस जगातील सर्वांत वर्दळीच्या नाट्यगृहांपैकी एक आहे. पाेर्ट जॅक्सन या प्रशांत महासागरावरील नैसर्गिक बंदराजवळ स्थित असलेले ऑपेरा हाउस हे सिडनीमधील सर्वांत माेठे पर्यटक आकर्षण आहे.