संध्यानंद.काॅम
भारताच्या प्राचीन संस्कृतीत मंदिरे किंवा देवळांना महत्त्वाचे स्थान आहे. आपण फक्त परमेश्वराच्या दर्शनासाठीच देवळात जात नाही, तर मन:शांतीसाठीसुद्धा जाताे. मंदिर ही पवित्र जागा असल्यामुळे तेथे येणारे भाविक सकारात्मक विचारांचे असतात. मंदिरातील सकारात्मक भावनांमुळे आपल्याला मानसिक शांतता लाभून आपले विचारही चांगले आणि आशादायी हाेतात.मंदिरांतील प्रत्येक कार्यामागे शास्त्रीय दृष्टिकाेन आहे.मानवाला पाच ज्ञानेंद्रिये असून, मंदिरात घंटा वाजविणे, कापूर लावणे, फुले अर्पण करणे, टिळा अथवा गंध लावणे आणि प्रदक्षिणा घालणे या कृतींमुळे आपली ही ज्ञानेंद्रिये जागृत हाेतात आणि ती जागृत झाल्यावर मंदिरात निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा मानवी शरीर ग्रहण करायला लागते.आपण मंदिरात अनवाणी पावलांनी का जाताे?
मंदिरांतील जागांमध्ये मॅग्नेटिक आणि इले्निट्रक फिल्ड्सचे उच्च शुद्ध तरंग असतात. मंदिरातील जमीन- फरसबंदी म्हणजे सकारात्मक ऊर्जा शाेषणारी कंड्नटर असते.या फरसबंदीवरून अनवाणी पावलांनी चालण्यामुळे ही ऊर्जा आपल्या शरीरात जाण्यास मदत हाेते. आपला गर्व आणि अभिमान मागे ठेवून मंदिरात येण्याचेसुद्धा हे प्रतीक असते.आपण कापूर का लावताे? देवापुढे कापूर लावण्यामागे दुहेरी उद्देश आहे. आरती करताना एखाद्या ताटात कापूर लावला जाताे. ताे जळत असताना दृष्टिंद्रिय जागृत हाेते. कापूर लावलेले ताट आपल्यापुढे आल्यावर आपण त्यावरून हात फिरवून डाेके अथवा डाेळ्यांना लावताे. त्यातून आपले स्पर्शेंद्रिय जागृत हाेते.आपण देवळात घंटा का वाजविताे?
मंदिरात घंटा वाजविल्यामुळे मधुर ध्वनितरंग निर्माण हाेऊन आपल्याला शांतता लाभते. मंदिरातील घंटानादामुळे ऐकण्याचे ज्ञानेंद्रिय जागृत हाेत असल्याचे त्यामागे शास्त्र आहे. तुम्ही घंटा वाजविताच तिच्या ध्वनीचा तीव्र आवाज प्रतिध्वनीच्या रूपाने किमान सात सेकंद राहताे. त्याचा शरीरातील सप्तचक्रांना स्पर्श हाेताे. घंटेचा ध्वनी हाेताच तुमच्या मेंदूतील सर्व विचार थांबतात.आपण मंदिरात फुले का वाहताे? काेणत्याही मंदिरात जाताना फुले आवश्यक असतात.त्यांचे माेहक रंग आणि सुंदर सुगंधामुळे आपला वाईट मूड बदलताे. फुलांच्या काेमल स्पर्शामुळे आपल्यात मृदूभाव जागृत हाेताे. आपल्या मनाला प्रसन्नता लाभते. आपल्या हृदयातही शांतता निर्माण हाेते. आपण तीर्थ का घेताे? देवदर्शन झाल्यावर हाताच्या ओंजळीत तीर्थ घेऊन ते प्राशन केले जाते. काही औषधी वनस्पती, फुले आणि शुद्ध पाण्यापासून तीर्थ तयार केले जाते. देवाच्या मूर्तीसमाेर असलेल्या तांब्याच्या भांड्यात ते ठेवतात.
चवीचे ज्ञानेंद्रिय त्यामुळे जागृत हाेते. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिणे आराेग्यासाठी फायद्याचे असते. तांब्याच्या भांड्यात आठ तासांपेक्षा जास्त काळ ठेवलेल्या पाण्यामुळे वात, पित्त आणि कफ या त्रिदाेषांचे संतुलन साधले जाते. पाण्यात उतरलेल्या धातूच्या अधिभारामुळे सकारात्मक संवेदना जागृत हाेऊन आराेग्यालासुद्धा फायदा हाेताे.आपण प्रदक्षिणा का घालताे? प्रार्थना झाल्यावर देवाच्या मूर्तीला घड्याळाच्या काट्यांप्रमाणे प्रदक्षिणा घातली जाते. ‘उजवीकडे’ असा ‘प्रदक्षिणा’ या शब्दाचा अर्थ आहे. ती घालत असताना आपले शरीर देवाची मूर्ती आणि मंदिर परिसरातील चांगले तरंग शाेषून घेत असते. शांत मन आणि चांगले आराेग्य असा लाभ प्रदक्षिणेमुळे मिळताे.