मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांचा सीओईपी विद्यापीठाकडून सत्कार

    19-Jan-2023
Total Views |
 
 

COEP 
सीओईपी टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू प्रा. मुकुल सुतावणे यांच्या हस्ते या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी व महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांचा विद्यापीठाच्या सभागृहात नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी अधीक्षक अभियंता प्रकाश राऊत, सतीश राजदीप आदी उपस्थिती हाेते.राजेंद्र पवार यांनी तत्कालीन काॅलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे या शासकीय महाविद्यालयातून 1988 मध्ये विद्युत अभियांत्रिकी पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त केली. त्यानंतर ते महावितरणच्या सेवेत दाखल झाले.
 
पवार यांची नुकतीच मुख्य अभियंतापदी पदाेन्नती झाली. त्यानिमित्त सीओईपी टेक्नाॅलाॅजी विद्यापीठातर्फे पवार यांचा सत्कार करण्यात आला. वीज व सेवा क्षेत्रातील 33 वर्षांच्या अनुभवामुळे पवार यांच्या नेतृत्वात पुणे परिमंडलातील महावितरणच्या विविध सेवा अधिकाधिक ग्राहकाभिमुख हाेतील व ग्राहकांना उत्कृष्ट सेवा मिळेल. सीओईपी विद्यापीठ व महावितरणच्या संयुक्त सहकार्याने वीज क्षेत्रातील विविध आधुनिक अभ्यासक्रमांना चालना दिली जाईल, असे प्रा. सुतावणे यांनी सांगितले.