संध्यानंद.काॅम
चार भिंतींच्या आतील आपले उबदार घरटं आणि त्यातील सदस्य म्हणजे कुटुंब, हे आपल्या जगण्याचे भ्नकम आधार असतात. काेणत्याही कसाेटीच्या क्षणी सतत सावलीसारख्या मागे उभे राहणाऱ्या कुटुंबामुळे आयुष्य सुकर हाेते. मात्र, सध्याफ्लॅटसंस्कृतीबराेबर विभ्नत कुटुंबांची संख्या वाढतेय. वाढत्या स्पर्धेत यशस्वी हाेण्यासाठी करावी लागणारी धावपळ, एकमेकांशी कमी झालेला संवाद, माझे निर्णय मीच घेणार म्हणून असलेला हेका... अशा एक ना अनेक कारणांमुळे कुटुंब तुटत चालली आहेत. घरात समजावून सांगणारे माेठे लाेक नसल्यामुळे जगण्याचा आधार हरवत चालला आहे. अशा परिस्थितीत कुटुंबाचे वैय्नितक जीवनातील महत्त्व समजावून घेणे आवश्यक ठरते.आपले वडील आपल्याकरिता सर्वाेत्तम सल्लागार असतात. आईच्या मायेची सावली आकाशाएवढी असते.
सुखदु:ख सांगण्याकरिता, ऐकण्याकरिता भाऊ हा एकमेव भागीदार असताे. आपले कायम शुभ चिंतणारी बहीणच असते आणि जन्मभराची मैत्रीण ्नत बायकाेच असू शकते. कुटुंबाबाहेर जीवन असू शकत नाही. तेथे जे प्रेम, विश्वास असताे ताे ्नत तेथेच असताे.कुटुंब ही आपल्याला मिळालेली एक अतिशय माेलाची देणगी असते. ज्यांना कुटुंब नसते किंवा अनाथ म्हणून जगावे लागते, त्यांना कुटुंबाचे महत्त्व चांगले समजते.त्याउलट आपल्याला सुदैवाने सहजपणे कुटुंबातील सगळ्या सदस्यांचे प्रेम, माया लाभत असल्याने आपल्याला कुटुंबातील सदस्यांचे महत्त्व नीटसे समजत नाही. जेव्हा तुम्ही कुटुंबात राहात असता, तेव्हा तुमच्या मनात एकप्रकारची सुरक्षिततेची भावना असते. आपण अडचणी एकमेकांसाेबत शेअर करू शकताे आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी एकमेकांची मदत करू शकताे. अशा या कुटुंबाचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे.
जीवनमूल्ये शिकण्याची पहिली पायरी: कुटुंब हे असे ठिकाण असते, जिथे बालकाला सगळ्यात पहिल्यांदा संस्कार आणि मूल्यांची ओळख हाेऊ लागते.कुटुंबातील ज्येष्ठांचा आदर, सगळ्यांशी मिळूनमिसळून राहण्याची तयारी, चांगले वर्तन म्हणजे काय, या बाबींची ओळख मुलांना कुटुंबसंस्थेतच हाेते. कुटुंबातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनातून आणि वागण्यातून नीतिमूल्यांचे धडे मिळतात.
त्यातून त्यांचे चारित्र्य घडते. कुटुंबातच आपल्या विचारांची पायाभरणी हाेते.
प्रेम आणि माया मिळते: अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या शारीरिक गरजा आहेत. यापलीकडे जाऊन त्याला आपलेपणा, आपुलकी, प्रेम, माया या गाेष्टींची गरज असते. भावनिक गरजांसाठी आपुलकीची माणसे आजूबाजूला असावी लागतात. त्यातून तुमचे मानसिक आराेग्य चांगले राहते. नात्यांचे बंध घट्ट हाेतात. आपली काळजी घेणारे कुणीतरी आहे, ही भावना मानसिक बळ देणारी असते.
निर्णय घ्यायला मदत हाेते: कुटुंबात किंवा घराबाहेर विविध निर्णय घेताना काैटुंबिक मूल्ये अतिशय उपयाेगी पडतात. महत्त्वाच्या आणि आव्हानात्मक विषयावर काय आणि कसा निर्णय घ्यावा, हे अनेकदा समजत नाही. कुटुंबात मार्गदर्शन करणाऱ्या ज्येष्ठ व्य्नती असतात. गुंतागुंतीच्या विषयात कुठे माघार घ्यावी, कुठे ठाम राहावे, कुठे आग्रही असावे, याचे मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळते. परिणामी कुटुंबाचे पाठबळ, मार्गदर्शन आणि काैटुंबिक मूल्ये यांच्या बळावर तुम्ही आयुष्यात याेग्य निर्णय घेऊ शकता.
कुठल्याही परिस्थितीत कुटुंबाचे पाठबळ लाभते: कुटुंबात राहण्याचा हा सगळ्यात माेठा फायदा असताे.तुम्हाला अनेक मित्र, नातेवाईक, ऑफिसमधील सहकारी असतील. ते तुमच्या आनंदाच्या, प्रगतीच्या काळात तुमच्याबराेबर असतात; पण आईवडील, बहीण-भाऊ अडचणीच्या काळातही आणि अपयश आले तरीदेखील तुमच्याबराेबर राहतात.