जिराफ : जगातील सर्वांत उंच आणि निरुपद्रवी प्राणी

08 Sep 2022 14:46:36
 
 
 

Giraffe 
जिराफ हा जगातील सर्वांत उंच, श्नितशाली आणि शांतताप्रिय असलेला चतुष्पाद प्राणी आहे.जिराफ हा शाकाहारी प्राणी आहे.त्याची उंची सरासरी 18 फूट, तर वजन जवळजवळ बाराशे किलाे असतं. काटेरी बाभळीची पाने हे जिराफाचे आवडते खाद्य. आपल्या लांबच लांब जिभेचा वापर करून जिराफ ही पाने ओढून घेताे.स्वसंरक्षणासाठी जिराफ नेहमी कळपाने राहतात, तसेच एकत्र प्रवास करतात.बछड्यांचे संगाेपन आणि संरक्षण हे कळपातल्या माद्या करतात. यासाठी हे बछडे थाेडे माेठे झाले की, त्यांना एका विशिष्ट जागी ठेवण्यात येते. हे जणू त्यांचे पाळणाघर असते, कळपातील माद्या त्याकडे आळीपाळीने लक्ष ठेवतात.
 
जिराफ उभा राहूनच झाेप घेताे. पाणी पिताना किंवा जमिनीवरील भक्ष्य खाताना मान जमिनीपर्यंत पाेचावी म्हणून जिराफांना पुढचे पाय गुडघ्यात वाकवावे लागतात.सर्वसाधारण रंग पिवळसर, त्यावर काळसर तांबूस रंगाचे, विविध आकारांचे माेठे ठिपके असतात. जिराफाची जीभ सुमारे 21 सें. मी. लांब व रंगाने काळीनिळी असून, ती ताेंडाच्या बाहेर काढता येते.कान आणि दृष्टी तीक्ष्ण असते. डाेळे माेठे व तपकिरी असतात व कान मात्र लांब असतात. जिराफ कण्हल्यासारखा बारीक आवाज काढताे.जिराफाचे वास्तव्य हे आफ्रिकेतील सहाराच्या दक्षिण भागातील खुल्या वनक्षेत्रात आहे. जिराफ हा भित्रा, गरीब व शांत निरुपद्रवी प्राणी आहे.
Powered By Sangraha 9.0