पाेर्टेबल साेलर फॅनने सुसज्ज हेल्मेट तयार

    30-Sep-2022
Total Views |
 
 
 


Fan
77 वर्षीय लल्लूराम यांनी केलेला जुगाड उत्तर प्रदेशमधील 77 वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीने केलेल्या जुगाडाने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. उष्णतेपासून दिलासा मिळावा म्हणून या माणसाने पाेर्टेबल फॅनने सुसज्ज असे हेल्मेट तयार केले आहे.उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील रहिवासी असलेले 77 वर्षीय लल्लूराम यांनी कडक उन्हापासून दिलासा मिळावा म्हणूनपाेर्टेबल फॅन जाेडलेले हेल्मेट घातले आहे. हा पंखा साैर ऊर्जेवर चालताे. तुम्ही जाल तेथे तुम्हाला हा पंखा हेल्मेटसाेबत नेता येताे. साेशल मीडियावर याबाबत माेठ्या प्रमाणात लल्लूराम यांचे प्लॅस्टिकचे हेल्मेट आणि त्याला जाेडलेले साेलर पॅनल व्हायरल झाले आहे.उष्णतेवर मात करण्यासाठी अशी विचित्र कल्पना कशी सुचली, असे लल्लूराम यांना विचारले असता, त्यांनी सांगितले, ‘मी राेजच्या प्रमाणे घराेघरी जाऊन फुलं विकत हाेताे; मात्र वाढत्या तापमानामुळे मी आजारी पडलाे. यामुळे माल विकण्यासाठी मी बाहेर जाऊ शकत नव्हताे आणि यामुळे माझ्या कुटुंबाचे जगणे कठीण झाले हाेते.
 
कुटुंबाचे उत्पन्न फारच कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम कुटुंबावर झाला हाेता.जेव्हा मी बरा झालाे तेव्हा मला पाेर्टेबल फॅनची गरज जाणवली, मग साैर ऊर्जेवर चालणारा पंखा डाेक्यावर घालण्याची कल्पना मला सुचली.’ सूर्याची किरणे किती तीव्र आहेत यावर पंख्याची तीव्रता अवलंबून असते. पाेर्टेबल फॅनमुळे उष्णतेपासून दिलासा मिळताे, असे देखील लल्लुराम यांनी स्पष्ट केले. त्यांनी अनेक लाेकांकडून वस्तू उधार घेऊन हा पाेर्टेबल पंखा बनवला आहे. माझ्या आजारपणानंतर जेमतेम पैसे माझ्याकडे उरले हाेते आणि असा पंखा बनवण्यासाठी वापरलेली उत्पादने विकत घेणे मला परवडत नव्हते, मात्र, या फॅनची किंमत परवडेल अशीच असेल, असेही त्यांनी सांगितले.