पतीच्या केसगळतीमुळे त्रस्त आहात का?

    30-Sep-2022
Total Views |
 
 
 

hairs 
केस तज्ज्ञांच्या मते, वयाच्या तिशीनंतर केसगळतीचा धाेका महिलांना जेवढा असताे, त्यापेक्षा अनेक पटींनी पुरुषांना असताे. काही पुरुषांना तर या आधीच या समस्येला सामाेरे जावे लागते. साठीपर्यंत काही पुरुषांना पूर्ण टक्कल पडते. तसं बघायला गेलं, तर पुरुषही फॅशनच्या बाबतीत मागे नाहीत, पण काही पुरुष असेही असतात, जे आपल्या केसांकडे लक्ष देत नाहीत. जर पुरुषांना केसांशी संबंधित काही समस्या असतील, तर केस तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.
 
 अँटिडँड्रफ शॅम्पूचा जास्त वापर करण्याने केसांची नैसर्गिक आर्द्रता कमी हाेते, म्हणून सजग राहा.
 केसांना शॅम्पू लावताना जिथपर्यंत केस आहेत, तिथपर्यंत शॅम्पू लावा. शॅम्पू करताना केसांना हळूहळू मसाज करा. यामुळे
रक्तपुरवठा उत्तम हाेण्यास मदत हाेते.
 खराब केसांवर जेल किंवा काेणताही हेअर स्प्रे लावणं टाळा. हे केसांच्या आराेग्यासाठी उत्तम नाही.
 सतत डाेक्यावर टाेपी घालण्याने घाम, किटाणू केसांच्या मुळाशी जमा हाेतात.
ज्यामुळे हळूहळू केसांच्या मुळांचं नुकसान हाेतं. केस गळायला लागतात.
 केस ओले असताना विंचरणार असाल, तर केसांना माेठ्या दातांच्या कंगव्याने विंचरा.
तसंच दिवसातून अनेकदा केस विंचरा यामुळे केसांच्या मुळाशी जमलेल्या तेलाचा चिकटपणा दूर हाेताे आणि नवीन केस उगविण्यास मदत हाेते.
 केस तज्ज्ञांच्या मते, पुरुषांमध्ये केस गळण्याचा संबंध तणावाशी आहे. तणावामुळे केसांची मुळं कमजाेर हाेतात, μज्यामुळे केस गळण्यास सुरुवात हाेते. शक्यताे केसांना तणावापासून दूर ठेवा. तसंच जंकूडऐवजी घरचं पाैष्टिक खा. ज्यामध्ये प्रथिनं, जीवनसत्त्व ब 6, झिंक हे पुरेशा प्रमाणात असतील. तसंच, दिवसातून कमीत कमी आठ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. केसांना औषधी तेलांनी मसाज करणे उपयुक्त ठरते.आजमावून बघा...
 केसांना पाेषण देण्याच्या दृष्टिकाेनातून तुम्ही घरीच टाॅनिक तयार करू शकता.
 एक अंडं ेटून ते केसांना आठवड्यातून एकदा लावा. अर्ध्या तासानंतर केस धुऊन टाका.
 मधामध्ये एक केळ मॅश करा. त्यामध्ये सायविरहित दूध आणि थाेडंसं दही मिसळा.
हे मिश्रण केसांना लावा. काही वेळानंतर धुऊन टाका. यामुळे केसांची मुळं मजबूत हाेण्यास मदत हाेते.