काेल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरावर ड्राेनची नजर

30 Sep 2022 14:36:52
 
 
 

drone 
 
नवरात्राेत्सवात महालक्ष्मी मंदिर परिसरात सुरक्षेच्या अनुषंगाने देवस्थान समितीतर्फे यंदा ड्राेनच्या साहाय्याने संपूर्ण उत्सवाचे चित्रीकरण करण्यात येत आहे.गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठीही याचा वापर करण्यात येत आहे.नवरात्रात महालक्ष्मी मंदिर परिसरात भाविकांची माेठी गर्दी असते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने ड्राेन कॅमेऱ्यांचा आधार घेण्यात येत आहे. देवस्थानच्या सीसी टीव्ही नियंत्रण कक्षाचे कर्मचारी राहुल जगताप व अभिजित पाटील यांनी यासाठी प्रशिक्षण घेतले आहे. आपत्ती व्यवस्थापन व पाेलिस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली ड्राेनचा वापर करण्यात येत आहे. मंदिराच्या बाहेरील 500 मीटर परिघात 70 आयपी स्वरूपाचे अतिरिक्त कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मंदिर व मंदिराबाहेरील आवारात एकूण 200 सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे.
Powered By Sangraha 9.0