पाेषणतत्त्व संवर्धित तांदूळ राज्यात वितरित करणार

    30-Sep-2022
Total Views |
 
 

Rice 
 
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय : तेरा जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात वितरण हाेणार ेषणतत्त्व संवर्धित तांदूळ) सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत दाेन टप्प्यांत वितरित करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.केंद्राच्या अन्न व सार्वजनिक विभागाच्या पत्रान्वये तीन टप्प्यांत ही याेजना राबवण्यास मंजुरी दिली आहे.त्यातील पहिला टप्पा मार्चपर्यंत राज्याच्या महिला व बालविकास आणि शालेय शिक्षण विभागामार्फत राबवण्यात आला आहे. आता ही याेजना मार्च 2023 पर्यंत नंदुरबार, वाशिम, गडचिराेली, उस्मानाबाद या चार आकांक्षित जिल्ह्यांत, तसेच बुलडाणा, परभणी, नाशिक, नंदुरबार, जालना, ठाणे, यवतमाळ, वाशिम, नांदेड, अकाेला, औरंगाबाद, उस्मानाबाद आणि हिंगाेली या 13 जिल्ह्यांत हा फाेर्टिफाईड तांदूळ वितरित करण्यात येईल.
राज्यातील चारही आकांक्षित आणि अतिरिक्त भार जिल्ह्यांसह उर्वरित सर्व जिल्ह्यांत हा तांदूळ वितरित करण्यात येईल. तथापि, सध्याच्या खरीप हंगामात खरेदी हाेणाऱ्या धानाच्या भरडाईनंतर प्राप्त हाेणाऱ्या तांदळाची फाेर्टिफिकेशन प्रक्रिया सुरु झाल्यास मार्च 2023 पूर्वीच वितरण पूर्ण करण्यात येईल.
 
या संपूर्ण कालावधीत भरडाई सुरु असताना सर्वसाधारण तांदळात एफआरके मिसळून हा फाेर्टिफाईड तांदूळ तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावरून नाेंदणीकृत मिलर्सची निवड करण्यात येईल. या एफआरके पुरवठादारांची राज्यस्तरावर खुल्या स्पर्धात्मक निविदेद्वारे निवड कमीत कमी दर प्राप्त तीन वर्षांसाठी करण्यात येईल. फाेर्टिफिकेशन, तसेच वितरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात येईल.यासाठी येणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील 68 काेटी 93 लाख रुपये खर्चास, तसेच तिसऱ्या टप्प्यातील 221 काेटींच्या खर्चासही मान्यता देण्यात आली.सर्वसाधारण कच्च्या तांदळाच्या फाेर्टिफिकेशनसाठी एफआरके खरेदीसाठी प्रतिक्विंटल 73 रुपये आणि इतर अनुषंगिक खर्चाची 100 टक्के प्रतिपूर्ती केंद्राकडून हाेणार आहे. मात्र, हा खर्च प्रथम राज्य शासनास करावा लागणार आहे.