पायमाेजे घालण्याचा अन् काढण्याचा विक्रम

    30-Sep-2022
Total Views |
 
 

Record 
 
कॅनडाच्या अल्बेर्टा प्रांतातील केल्गरी शहराची रहिवासी 14 वर्षांच्या कॅराेलिना क्रुस नावाच्या मुलीने 30 सेकंदांत 22 वेळा पायमाेजे पायात घालण्याचा व काढण्याचा जागतिक विक्रम केला आहे. कॅराेलिना क्रुसने भारताच्या आरिफ इब्न अब्दुल हालीचा विक्रम माेडला.आरिफने 30 सेकंदांत 19 वेळा पायमाेजे पायात घालून काढण्याचा विक्रम केला हाेता. गिनीज बुकात नाव नाेंदविण्यासाठी आयाेजित केलेल्या स्पर्धेत हा विक्रम केला.जागतिक विक्रम करण्याच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड ही संस्था अर्ज माेफत देते. अर्जदाराने जागतिक विक्रमासाठी पुरावे दिल्यानंतर स्पर्धकांची निवड हाेते. जागतिक विक्रमाच्या स्पर्धेसाठी दर आठवड्याला हजाराे अर्ज येतात.त्यातून स्पर्धक निवडण्यात येतात.त्यानंतर स्पर्धा आयाेजित केली जाते.