शहरी भागात स्मार्ट मीटर बसवावेत : उपमुख्यमंत्री

    30-Sep-2022
Total Views |
 
 
 

Meter 
साैर ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूकदारांशी प्राधान्याने चर्चा करण्याची अधिकाऱ्यांना सूचना महावितरणने आवश्यकतेनुसार सुरुवातीला शहरी भागातील ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवावेत आणि या कामात यशस्वी झाल्यानंतरच ग्रामीण भागातही स्मार्ट मीटर बसवण्यात यावेत. स्मार्ट मीटर चांगल्या कंपनीचे आणि उच्च दर्जाचे असावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाशगड येथे झालेल्या बैठकीत दिल्या.राज्याचे प्रधान सचिव (ऊर्जा) आणि महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आणि महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे अनुक्रमे महापारेषण, महावितरण व महानिर्मितीची माहिती दिली. या बैठकीस महावितरण, महापारेषण, महानिर्मिती आणि महाऊर्जा या कंपन्यांचे संचालक व म.रा.वि.मं. सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक उपस्थित हाेते. उपमुख्यमंत्र्यांनी या चारही वीज कंपन्यांच्या कामाचा आढावा घेतला.
 
महावितरणने इतर कंपन्यांची थकीत देणी देण्यासाठी केंद्राला पत्र पाठवून त्याचा पाठपुरावा करावा. याशिवाय फाेटाे मीटर रीडिंगचे फाेटाे थेट सर्व्हर प्रणालीत येण्यासाठी प्रयत्न करावेत. साैर ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक असलेल्या गुंतवणूकदारांसाेबत प्राधान्याने चर्चा कराव्यात. केंद्राने सरकारने देशभरातील वीज वितरण कंपन्यांच्या जाहीर केलेल्या क्रमवारीत आपण कमी पडलाे आहाेत. या क्रमावारीत सुधारणेसाठी प्रयत्न करण्याची सूचना उपमुक्यमंत्र्यांनी केली.सर्व विभागातील प्रलंबित साैर प्रकल्पांना गती देणे, काेळसा पुरवठा दर्जेदार हाेईल, यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे आणि कालपरत्वे जुन्या बंद केलेल्या वीज संचांच्या जागेचा विधायक उपयाेग करून त्यायाेगे मालमत्ता चलनीकरणाच्या प्रक्रियेतून महानिर्मितीला वाढीव उत्पन्नाचा स्राेत शाेधण्यासाठी प्रयत्न करण्यावर त्यांनी या वेळी विशेष भर दिला.