स्वतःला जाणण्यासाठी राेज डायरी लिहा

30 Sep 2022 14:44:51
 
 
 

Diary 
अनेक गाेष्टी आपण काेणाजवळ बाेलू शकत नाही. परंतु, त्या मनात असतात, अशा वेळी डायरीत लिहून आपण माेकळे हाेऊ शकताे. कारण या समाजात वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतात, प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असतात, काेणी आपल्याला आवडत नाही म्हणून त्यांच्याशी नाते ताेडता येत नाही, समाजात राहावे लागते, समाजाशी जुळवून घ्यावेच लागते. लाेकव्यवहार फार महत्त्वाचे आहेत.आपण रूढीतून शिकताे आणि याचवेळी आपल्याला मनुष्यस्वभावाचे दर्शन घडते.दाेन तऱ्हेची माणसं असतात. काही मंडळी आपलं अंग काढून घेतात. थाेडेच लाेक मिसळतात आणि त्यांची कामे हाेऊन जातात.जीवनातील कटू सत्य हे आहे की, सर्व गाेष्टी नीट जाणून घेण्याआधीच आपल्याला चटकन निर्णय घ्यावे लागतात.
 
मग ही वचनबद्धता, जबाबदारी, बांधिलकी बाेचक हाेऊ शकते. नाेकरी असाे, विवाह असाे, मतदान असाे, चुकलं म्हणजे चुकतंच.
कशाचीच न्नकी खात्री नसते. पण, म्हणून काय नुसतं बसायचं? श्नयता आहेत ना मदतीला. मुळात माणसं जाेडण्याची इच्छा पाहिजे. माणसाने नम्र असावं. विनयशील असावं. पण हळुवार हाेऊ नये. साथ घ्यायला स्वत:च्या अंगात बळ नकाे का? एखाद्यालानिवडण्याकरितासुद्धा व्यवहार-निरीक्षणाचा सखाेल अभ्यास केला पाहिजे. म्हणजे नंतर पश्चात्तापाची वेळ येणार नाही.सुखसंवाद करता येणं हा देवघेवीच्या व्यवहाराचा आत्मा आहे.ताे जाणून घेण्यासाठी नियमित डायरी लिहिली पाहिजे.
Powered By Sangraha 9.0