रेल्वे प्रवाशाला झाेपेतून उठवून तिकीट तपासणे चुकीच

    29-Sep-2022
Total Views |
 
 
 

TTE 
संपूर्ण देशात रेल्वेचे जाळे पसरलेले आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही अधिक आहे. आपल्याला रेल्वेच्या नियमांबाबत माहिती नसते. पण आपल्याला नियम माहीत असल्यास नक्कीच फायदा हाेईल.अनेकदा ट्रॅव्हल तिकीट परीक्षक (TTE) रात्री प्रवाशांना उठवतात आणि तिकिटाची मागणी करतात. तिकीट तपासणीमुळे डब्यात उपस्थित असलेले अनेक प्रवासी नाराज हाेतात. पण, तुम्हाला माहिती आहे का, की टीटीई चुकीच्या वेळी तिकीट तपासू शकत नाही. कारण असा भारतीय रेल्वेचा नियम आहे. टीटीई रात्री 10 वाजण्यापूर्वीच तिकीट तपासू शकतात. जर टीटीईने तुम्हाला झाेपेत असताना तिकीट मागत असेल, तर तुम्ही त्याच्याविरुद्ध तक्रार करू शकता.TTEरात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत तिकीट तपासू शकत नाहीत.
 
सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेतच तिकिटांची पडताळणी करता येईल. रेल्वे बाेर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, TTE झाेपताना तुमचे तिकीट तपासू शकत नाही. मात्र, रात्री 10 नंतर प्रवास सुरू करणाऱ्या प्रवाशांना हा नियम लागू हाेणार नाही. जर तुम्ही रात्री 10 नंतर ट्रेनमध्ये बसलात तर तुम्हाला तिकीट आणि ओळखपत्र दाखवावे लागेल.झाेपण्याव्यतिरिक्त, लाेकांना मिडल बर्थबाबत काही नियम आहेत. अनेक वेळा ट्रेन सुरू हाेताच प्रवासी बर्थ उघडतात.त्यामुळे लाेअर बर्थ असलेल्या प्रवाशांना खूप त्रास हाेताे. पण रेल्वेच्या नियमांनुसार, मधला बर्थ असलेला प्रवासी रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंतच त्याच्या बर्थवर झाेपू शकताे. सकाळी 6नंतर बर्थ खाली करावा लागेल. जेणेकरून इतर प्रवाशांना खालच्या बर्थवर बसता येईल. काही वेळा खालच्या बर्थवर रात्री उशिरापर्यंत जागा असते आणि मधल्या बर्थ असलेल्या प्रवाशाला अडचण येते. त्यामुळे तुम्ही नियमानुसार 10 वाजता तुमची सीट घेऊ शकता.