हुशारी नव्हे, तर शहाणपण महत्त्वाचे

    29-Sep-2022
Total Views |
 

Honest 
शहाणपणाच्या गाेष्टी काेणी काेणाला सांगण्यापेक्षा त्या आपल्याच आपल्याला समजून घ्याव्या लागतात. शेवटी जीवन जगतांना मदत करत असेल तर ते हे शहाणपणच.शहाणपणाची गंमत अशी असते की त्याचे विविध पैलू आणि त्याचे महत्त्व आपल्याला असून देखील नेमक्या प्रसंगी आपल्याला ते शहाणपण आठवत नाही किंवा त्याचा वापर देखील करता येत नाही, अशावेळी एवढं कळत असून देखील काय उपयाेग? असे आपले आपल्यालाच वाटून जाते.मुळात शहाणपणा येताे ते आपल्या जीवन अनुभवातून. आपण आपल्या जीवनात घडणाऱ्या प्रसंगांकडे, घटनांकडे कसे पाहताेत्यातून काय बाेध घेताे यातून आपले शहाणपण आकार घेत असते.
आपल्याला जे काही समजले ते नुसते स्वत:जवळ ठेवून चालत नाही तर त्याचा व्यवहारात उपयाेग करावा लागताे.आपण इथे जाे विचार करत आहाेत ताे जीवनाला आनंदी आणि सुखकारक करणाऱ्या शहाणपणाबद्दल.
 
अनेकदा शहाणी वाटणारी माणसे अगदी वेड्यासारखी वागतात, असे त्यांचे का हाेत असेल किंवा आपले देखील असे का हाेते हे आपल्याला देखील अनेकदा काेडेच वाटते. या काेड्याचे एक उत्तर म्हणजे शहाणपणानं वागण्यासाठी लागणारी जीवनश्नती कमी पडते. ही जीवनश्नती मूल्यांच्या सरावातूनच निर्माण हाेत असते.आराेग्यपूर्ण, अर्थपूर्ण व आनंदपूर्ण जगण्याची इच्छा प्रत्येकाची असते त्यासाठी शहाणपणा ऊर्जा पुरवताे याबद्दल मात्र काेणाच्याही मनात शंका नसावी. इतकेच काय जेव्हा आपण वेळप्रसंगी शहाणपणानं वागताे तेंव्हा आपल्याला स्वत: बद्दल खूप छान वाटते. काेणत्याही लाैकिक यशापेक्षा हे छान वाटणे जास्त समाधान देणारे असते.कराेनाकाळात सगळ्यांनीच या शहाणपणाची आवश्यकता किती आहे याचा अनुभव घेतला आहे. एकमेकांना सांभाळून घेणे, एकमेकांची काळजी घेणे, एकमेकांचे मानसिक आराेग्य जपणे या गाेष्टी किती शहाणपणाच्या आहेत याची आवश्यकता सगळ्यांच्या लक्षात आली आह