चमकदार दातांसाठी पाच उपाय

    29-Sep-2022
Total Views |
 

Health 
1. खाल्ल्यानंतर गुळण्या करा : ताेंडाच्या स्वच्छतेसाठी खाल्ल्यानंतर गुळण्या करणे खूप गरजेचे असते.यामुळे दातांत अन्नाचे कण वा फळांचे तंतू अडकून राहणार नाहीत.
2. चहा/काॅफी कमी घ्या : ऑफिसात कामाचा मूड राखण्यासाठी आपण नेहमी चहा/काॅफी पिताे. पण त्यांचे जास्त सेवन आपल्या दातांच्या चमकेचे नुकसान करते. यासाठी चहा कमी घ्या.
3. च्युइंगगम चावा : दातांच्या आराेग्यासाठी च्युइंगगम चावावे.यात असलेले जायलीटाेल नावाचे अल्काेहाेल ताेंडात लाळेचा स्राव वाढवताे. त्यामुळेही ताेंडाची स्वच्छता हाेते.
4. पाणी आहे चमत्कारी : ताेंडाच्या स्वच्छतेसाठी पाणी चमत्कारिक भूमिका बजावते. जसा आपण ताेंडाच्या स्वच्छतेसाठी माऊथवाॅशचा वापर करताे त्याचप्रमाणे पाण्याने ताेंडाची स्वच्छता करून पाहावी.पाणी ताेंडात भरून खूप वेगाने फिरवून गुळण्या करून ताेंडातील बॅ्नटेरिया बाहेर काढू शकता. या प्रक्रियेत विशेष रूपात लक्षात घेण्याची गाेष्ट म्हणजे ताेंडात पाणी जरा जास्त वेळ अत्यंत वेगाने फिरवत राहावे.
5. ठेवा मिनी डेंट किट : एक छाेटा टूथब्रश व माउथफ्रेशनर ऑफिसातही नेण्याची सवय लावून घ्या. ऑफिसात लंचनंतर ब्रश करण्यासाठी आपल्याला फ्नत पाच मिनिटे जास्त वेळ काढावा लागेल. पण यामुळे आपल्या दातांची चमक टिकून राहील आणि ताेंडही स्वच्छ राहील. यामुळे आपले मन नेहमी प्रसन्न राहील.