राज्यातील 1064 उमेदवारांची अधिसंख्य पदांवर नियुक्ती

29 Sep 2022 14:26:17
 
 
 
CM
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप राज्य शासनाच्या विविध निवड प्राधिकरणांनी निवड आणि शिफारस केलेल्या मराठा समाजासह अन्य प्रवर्गातील सुमारे 1064 उमेदवारांना अधिसंख्य पदांवरील नियुक्तीचे पत्र देण्यात येणार आहे. त्यातील 78 उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विभागांतील नियुक्तीपत्रे देण्यात आली.महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, राेहयाे मंत्री संदिपान भुमरे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आदी या वेळी उपस्थित हाेते.
 
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र अधिसंख्य पदांची निर्मिती व निवड केलेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत कायदा संमत करण्यात आला. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात 8 सप्टेंबरला राजपत्र प्रसिद्ध केले आणि 21 सप्टेंबरला शासन निर्णय जाहीर करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे.अधिसंख्य पदांवर नियुक्ती देण्यात येणाऱ्या उमेदवारांची संख्या 1064 आहे. त्यात सामान्य प्रशासन विभाग, महसूल व वन विभाग, कृषी, पदुम, वित्त, ग्रामविकास, नगरविकास, उद्याेग, उर्जा व कामगार विभाग, महाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळ, आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकाम विभाग, गृह, राज्य उत्पादन शुल्क, शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्ये विभाग अशा विविध विभागांत विविध संवर्गात त्यांना नियुक्ती देण्यात येणार आहे. त्यातील सर्वाधिक 743 उमेदवार ऊर्जा विभागातील आहेत. महानिर्मिती, महावितरणमधील 743 पैकी सुमारे 60 टक्के उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
Powered By Sangraha 9.0