काेलंबाेमध्ये कर्जातून साकारलेला लाेटस टाॅवर

28 Sep 2022 15:01:13

tower
 
अतिशय वाईट आर्थिक स्थितीचा सामना करीत असलेल्या श्रीलंकेत ‘लाेटस टाॅवर’ चर्चेचा विषय बनला आहे. याचे कारण असे की, श्रीलंका सरकारने चीनकडून कर्ज घेऊन हे टाॅवर बांधले आहे. येत्या दाेन दिवसात या लाेटस टाॅवरचे उद्घाटन हाेणार आहे.चीनची न्नकल करून 2012 मध्ये या लाेटस टाॅवरचे बांधकाम सुरू झाले. 11.3 काेटी डाॅलर खर्च करून हे लाेटस टाॅवर बांधण्यात आले आहे. या टाॅवरची उंची 350 मीटर आहे.आर्थिक स्थिती अतिशय खराब असूनही हे टाॅवर बांधल्याबद्दल श्रीलंका सरकारवर चाैफेर टीका हाेत आहे. श्रीलंकेच्या तत्कालीन राजपक्षे सरकारला बीजिंगमधील 405 मीटर उंच सेंट्रल रेडिओ अँड टी.व्ही. टाॅवरची न्नकल करायची हाेती. पण, ती यशस्वी झाली नाही. पण, राजपक्षे सरकार याबाबतीत अपयशी ठरले आहे.
Powered By Sangraha 9.0