ट्रिलियन डाॅलर अर्थव्यवस्थेत पुण्याची भूमिका महत्त्वाची

    28-Sep-2022
Total Views |
 
 

finance 
 
एमसीसीआयएच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डाॅलर करण्याचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे स्वप्न असून, ते साध्य करायचे असेल तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्थाही ट्रिलिअन डाॅलर व्हावी लागेल. राज्याच्या ट्रिलियन डाॅलर अर्थव्यवस्थेत मराठा चेंबर्स आणि पुण्यातील औद्याेगिक परिसराची माेठी भूमिका राहील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.मराठा चेंबर ऑफ काॅमर्स, इंडस्स्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चरच्या (एमसीसीआयए) वार्षिक सभेत उपमुख्यमंत्री बाेलत हाेते. या वेळी एमसीसीआयएचे माजी अध्यक्ष प्रतापराव पवार, मराठा चेंबर्सचे अध्यक्ष सुधीर मेहता, नियाेजित अध्यक्ष दीपक करंदीकर, एमसीसीआयएचे महासंचालक प्रशांत गिरबाने आदी उपस्थित हाेते.पुण्यातील रिंगराेड पुण्याच्या पुढील 10 वर्षांच्या विकासाला चालना देईल.
 
रिंग राेडसाठी 30 हजार काेटींची गुंतवणूक अपेक्षित असून, हा मार्ग येत्या 10 वर्षात 1 ते 10 लाख काेटींचे मूल्य तयार करणारा ठरेल. हा रिंगराेड पुण्याच्या विकासाचे इंजिन ठरेल. पुण्यात मेट्राेच्या दाेन टप्प्यांचे काम वेगाने पुढे जात आहे. पुण्यासाठी नवे विमानतळ तयार करणे आवश्यक आहे. पुरंदरला नवे विमानतळ उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.तेथे विमानतळासाेबत कार्गाे आणि लाॅजिस्टिक पार्क उभारण्याचाही विचार आहे, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.औद्याेगिक प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना उपमुख्यमंत्र्यांनी उत्तरे दिली. करंदीकर व मेहता यांनीही मनाेगत व्यक्त केले. गिरबाने यांनी एमसीसीआयएच्या कार्याविषयी माहिती दिली.उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘मिशन वायू’ अहवाल आणि मराठा चेंबर्सच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.