डाेळे टवटवीत दिसण्यासाठी उपाय

    28-Sep-2022
Total Views |
 
 

eyes 
 
खरेतर आपले डाेळे हे नुसते बघण्यासाठी नसतात, तर आपल्या भावना इतरांपर्यंत पाेचवण्याचे कामही हे डाेळेच करत असतात.
या डाेळ्यांचे साैंदर्य जपावे यासाठी डाेळ्यांची पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे, तरच डाेळे आराेग्यदायी दिसू शकतील.डाेळे स्वच्छ व सतेज दिसण्यासाठी कापसावर गुलाबपाणी घेऊन ते धुवावेत.डाेळ्यांखाली काळी वर्तुळे असल्यास दुधात बदाम उगाळून ते मिश्रण किंवा काकडीच्या साली डाेळ्यांखाली लावाव्यात.डाेळ्यांना थंडावा मिळण्यासाठी काकडीचे काप, गार दुधाच्या पट्ट्या डाेळ्यांवर ठेवाव्यात.संगणकाच्या सततच्या वापरामुळे डाेळ्यांवर ताण येताे. ताे ताण दूर करण्यासाठी लिंबूरस व बदामतेल एकत्र करून डाेळ्यांना हलका मसाज करावा.डाेळ्यांचे आराेग्य सुधारण्यासाठी सकाळी अनवाणी पायांनी हिरवळीवर चालावे.