थकव्याला आजूबाजूसफिरकू देऊ नका

    28-Sep-2022
Total Views |
 
 

Health 
 
सकाळी झाेपून उठल्यानंतर तुम्हाला थकवा जाणवताे का? काम करण्यात तुमचं मन लागत नाही का? तर मग तुम्ही थकव्याने ग्रस्त आहात...थकव्याला दूर ठेवण्यासाठी खालील उपाय आजमावून बघा...आवश्यक झाेप घ्या. एक गाेष्ट लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे कमी झाेप चिडचिडी बनवते, त्याप्रमाणेच जास्त झाेप शरीरात आळस निर्माण करते.पाण्यामध्ये थाेडासा साेडियम बायकार्बाेनेट मिसळून आंघाेळ करण्याने रक्तसंचार वाढताे आणि शरीरास आराम मिळताे. असं करण्याने आपण स्वतःला ताजतवानं ठेवू शकता.जर तुम्हाला शाॅवरखाली अंघाेळ करायला आवडत असेल, तर शाॅवरखाली उभे राहून थंड पाण्याने मनसाेक्त अंघाेळ करा.आहारावरच शरीराची शक्ती अवलंबून असते, जीवनसत्त्व ब, मॅग्नेशियम, पाेटॅशियम आणि लाेहयुक्त आहारामुळे शरीरात ताकद निर्माण हाेते. जर तुमच्या आहारात कडधान्यं, फळं आणि भाज्या भरपूर असतील, तर शरीरातील उत्साह टिकून राहताे.
 
चाॅकलेट, मांस, अल्काेहाेल, तसंच कॅिफनयुक्त पदार्थांचं सेवन कमी करा.व्यायामामुळे रक्तामध्ये एन्ड्रािफनसचे प्रमाण वाढते, जे मन प्रुल्लित हाेण्यासाठी आवश्यक असते. माेकळ्या जागेत नियमित व्यायाम करण्याची सवय स्वतःला लावा.ताजी हवा आणि माेकळं वातावरण थकवा दूर पळविताे.लक्षात ठेवा, शरीराला मालीश करण्यानेही थकवा दूर हाेताे.थकवा दूर पळविण्यासाठी तणावमुक्त राहणे आवश्यक आहे.तणाव शरीराची शक्ती कमी करून थकवा निर्माण करताे.म्हणून तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी श्वासावर लक्ष केंद्रित करा. दरराेज काही मिनिटं याचा सराव करा.रंगही माणसाच्या मनावर खाेलवर परिणाम करतात. तज्ज्ञ असा दावा करतात की, नारंगी, लाल, पिवळा आणि गडद हिरवा रंग मनात उत्साह निर्माण करतात. ज्यामुळे शरीरात ताजेपणा निर्माण हाेताे.