गाणे गात गात आपली शेपटी नाचवणारा पक्षी

    28-Sep-2022
Total Views |
 
 
 

Birds 
चिमणीहून थाेडा माेठ्या आकाराचा हा नाचण पक्षी बागा, उद्यान आणि पानझडीच्या जंगलात दिसताे. शहरात सुद्धा घराभाेवती झाडांमध्ये या गडद तपकिरी रंगाच्या पक्ष्याला जागा सापडते.माणसांची सवय झाली की, ताे अगदी निर्धास्तपणे वावरताे.भारतात महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यांत आढळताे. याला अनेक नावाने संबाेधले जाते. नाचण,नर्तक, न्हावी ही प्रचलित नावे त्याला आहेत.हा चिमणीसारखा दिसत असून, याची शेपटी वर उचललेली असते. शेपूट लांब व पिसारलेल्या अवस्थेत असते.डाे्नयावर रांगाेळी काढावी तशा पांढऱ्या रेषा असतात. सतत हालचाल करणारा हा पक्षी. त्याच्या शेपटाची पिसे हवा घेण्याच्या जपानी पंख्यासारखी पसरलेली असतात.
 
गाणे गात गात आपल्या शेपटीची उघडझाप करत असताे. यामुळेच त्याला इंग्रजीमध्ये फॅनटेल म्हणतात.अशा वेळी शेपटीच्या पंखावर छानशी नक्षी पाहायला मिळते. एका जागेवर ता कधीच स्थिर बसत नाही, सतत हालचाल करत इकडून तिकडे उड्या मारत असताे.हा पक्षी अतिशय सुंदर नृत्य करत असताे, त्याचबराेबर त्याचे गाणे चालू असते.काही वेळा चकचक असा आवाजदेखील काढताे. झाडाझुडपात उड्या मारून ताे माश्या, डास, किडे पकडून खात असताे.त्यामुळे त्याला माश्यापकड्या म्हणूनही ओळखतात. या पक्ष्याच्या डाे्नयावर, गळ्यावर, पाेटावर पांढरे पट्टे असतात. शरीर पूर्ण काळे नसून, किंचित तपकिरी आणि राखी रंगाचे असतात. गवत, काड्या, धागे जमवून हा झाडाच्या फांद्यांवर वाटीसारखे घरटे बांधताे.