केंद्र सरकारच्या याेजनांची गतीने अंमलबजावणी करा

    27-Sep-2022
Total Views |
 
 
 

policy 
 
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे निर्देश : पुणे विभागातील याेजनांचा आढावा घेतला केंद्रपुरस्कृत याेजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पाेहाेचवण्यासाठी याेजनांच्या अंमलबजावणीला वेग देणे गरजेचे असून, त्यासाठी सर्व यंत्रणा गतिमान करा, असे निर्देश केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले.सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्याची केंद्रपुरस्कृत याेजनांची आढावा बैठक विधानभवनात झाली. त्या वेळी त्या बाेलत हाेत्या. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राम शिंदे, माधुरी मिसाळ, राहुल कुल, भीमराव तापकीर, महेश लांडगे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, विभागीय आयुक्त साैरभ राव आदी या वेळी उपस्थित हाेते.पुणे विभागात राबवण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत याेजनांविषयी विभागीय आयुक्त राव यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. पुण्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी अमृत सराेवर याेजना, प्रधानमंत्री आवास याेजना (पीएमएवाय), मुळा मुठा नदी सुधार, संपूर्ण कचरा प्रक्रिया, पीएमपीएमएल कडून विद्युत व सीएनजी बसद्वारे प्रदूषणास आळा आदीबाबत सादरीकरण केले.
 
जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प, रिंग राेड आदींसाठीचे भूसंपादन, याेजनांच्या लाभासाठी आधार लिंकिंग, पीएम-किसान याेजना आदींबाबत सादरीकरण केले.पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंह यांनी स्मार्ट सिटी, पीएमएवाय आदीविषयक सादरीकरण केले. महामेट्राेचे व्यवस्थापकीयसंचालक ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्राे प्रकल्पाचे, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त राहुल महिवाल यांनी मेट्राे, तसेच रिंगराेडबाबत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी हर घर जल, पीएमएवाय- ग्रामीण, प्रधानमंत्री ग्रामसडक याेजना, स्वच्छ भारत मिशन, मनरेगा, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आदींबाबत सादरीकरण केले.या वेळी रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे विमानतळ यांच्या प्रकल्पांचाही आढावा घेण्यात आला. पर्यटन, महापारेषण, महावितरण, टपाल विभाग, बीएसएनएल, कृषी, काैशल्य विकास आदी विभागामार्फत अंमलबजावणी हाेणाऱ्या याेजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.