सकाळचा नाश्ता कसा असावा?

27 Sep 2022 12:50:47
 
 

health 
 
नाश्त्यामध्ये तूप आणि लाेणी यांचा सढळ वापर हाेणं आराेग्यासाठी घातक असतं. पुरी, बटर लावलेले पराठे, मैद्याची राेटी आणि ब्रेड राेलसारखे तळलेले पदार्थ नियमितपणे खाल्ल्यामुळे शरीरात चरबी जमा हाेते. तेलकट, चरबीयुक्त व गाेड पदार्थांमुळे पचनयंत्रणा बिघडते. त्यामुळे सर्दीपासून कॅन्सरपर्यंत आजार हाेण्याची शक्यता वाढते. आहारात आराेग्यदायक पदार्थांचा वापर करणं ही निराेगी जीवनशैलीची गरज आहे.सकाळच्या नाश्त्यामध्ये काय खायचं या प्रश्नाचं उत्तर म्हणजे अशा पदार्थांचा वापर करा ज्यामध्ये ायबर, प्राेटिन आणि कार्बाेहायडे्रट अधिक प्रमाणात असतील; तसंच मिठाचं प्रमाणदेखील कमी असेल.
 
आपला आहार सतत बदलत राहा. एकच पदार्थ दरराेज खाऊ नका. नाश्त्यामध्ये विविधता ठेवा आणि थाेड्या थाेड्या प्रमाणात पदार्थ खा. सकाळच्या आराेग्यदायक नाश्त्यामध्ये रवा, पाेहे, फळांचं सॅलड, पाेळी, मल्ट्रीग्रेन डाेसा, उपमा, सांबर, डाळ, साेया, माेडाची धान्ये, भाज्यांचे सॅण्डविच, मका, फॅट नसलेलं दूध व दही, लस्सी, काॅटेज चीज, ताज्या फळांचा रस, ब्राउन राइस, केळ, टरबूज किंवा सफरचंदसारख्या फळांचा समावेश करा. साखरेचे अधिक प्रमाण असलेले पदार्थ उदाहरणार्थ पेस्ट्री, डबाबंद फळं खाऊ नका. भरपूर तूप वा तेलयुक्त पराठे आणि ऑमलेट खाऊ नका. याशिवाय अधिक लाेणी वा तूप, मैद्याचा राेटी, भात, ्रेंच टाेस्ट, चरबीयुक्त मटन, मलईयुक्त दही आणि अन्य पदार्थ खाऊ नका.
 
Powered By Sangraha 9.0