माऊंट एव्हरेस्ट शिखराचे पूर्वीचे नाव काय हाेते?

    27-Sep-2022
Total Views |
 
 
 

Everest 
जाॅर्ज एव्हरेस्ट हे भारतात, ब्रिटिशांच्या राॅयल आर्टिलरी आर्मीमध्ये कर्नल हाेते. त्यांना भारताचे पहिले सर्व्हेअर जनरल ऑफ इंडिया 1830 ते 1843 या काळात नेमण्यात आले. त्यांनी कन्याकुमारीपासून नेपाळपर्यंत भारताच्या भूभागाच्या ट्रायगाेमिनल सर्व्हेचे महत्त्वाचे काम पूर्ण केले.त्यामुळे जमिनीची माेजमापे घेऊन त्यांना सर्व्हे नं. देण्यात आले.माऊंट एव्हरेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शिखराचे खरे नाव चाेमाेलुंग्मा हे हाेते. 1865 मध्ये त्या शिखराला जाॅर्ज एव्हरेस्ट या सर्व्हेअरचे नाव इंग्लंडच्या राॅयल जिओग्रािफकल साेसायटीकडून देण्यात आले. भूमापनातील त्यांच्या या शास्त्रीय पद्धतीमुळे माऊंट एव्हरेस्टची निश्चित उंची माेजली जाऊ शकली आणि तेच जगातले सर्वाेच्च(8848 मीटर) शिखर आहे हे समजले. माऊंट एव्हरेस्टची उंची पुढे अनेक जणांनी माेजून निश्चित केली.तसेच जाॅर्ज एव्हरेस्ट यांच्या या पद्धतीमुळे डाेंगर, सपाट प्रदेश तसेच गावांची, डाेंगरांची समुद्रसपाटीसूनची उंची निश्चित करण्यात आली.