वरळी-शिवडी उन्नत मार्ग बाधितांना न्याय देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

    26-Sep-2022
Total Views |

CM
विकासकामे करताना स्थानिकांना भकास करून चालणार नाही. त्यामुळे वरळी-शिवडी उन्नत मार्ग प्रकल्प बाधितांच्या सर्वअडचणी समजून घेऊन, त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यावर उपाययाेजना केल्या जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले. वरळी-शिवडी उन्नत मार्ग प्रकल्पात बाधित हाेणाऱ्या प्रभादेवी परिसरातील कामगारनगर 1 व 2 आणि गणेशनगर या भागाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. पाहणीनंतर उपस्थित नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, कालिदास काेळंबकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवासन यांच्यासह मुंबई महापालिकेचे अधिकारी, तसेच प्रकल्प अभियंता, अधिकारी आदी उपस्थित हाेते.