बारावीच्या आणखी 15 हजार विद्यार्थ्यांना राेजगार संधी उपलब्ध करणार

    24-Sep-2022
Total Views |
 

education 
 
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे प्रतिपादन : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ साेशल सायन्सेससाेबत करार राज्यातील बारावीच्या 15 हजार विद्यार्थ्यांना राेजगार व शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ साेशल सायन्सेससाेबत सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. यापूर्वी एचसीएल कंपनीसाेबत करार झालेल्या ‘मिलाप’ या कार्यक्रमांतर्गत 25 हजार विद्यार्थ्यांना राेजगार उपलब्ध हाेणार असल्याने या दाेन करारांद्वारे 40 हजार विद्यार्थ्यांना शिक्षणाबराेबरच राेजगाराची संधी उपलब्ध हाेणार असल्याचे त्यांनी सांगितले.केसरकर यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील दालनात झालेल्या या करार हस्तांतर कार्यक्रमास शालेय शिक्षण सचिव रणजितसिंह देओल, समग्र शिक्षा राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, सहसचिव इम्तियाज काझी, टाटा इन्स्टिट्यूटच्या वतीने स्कूल ऑफ व्हाेकेशनल एज्युकेशनच्या प्रमुख प्राचार्य मधुश्री शेखर, तानिया शाॅ, विनिता काैशल आदी उपस्थित हाेते. राष्ट्रीय शैक्षणिक धाेरणातील उद्दिष्टांनुसार 2025 पर्यंत 50 टक्के शाळांपर्यंत व्यावसायिक शिक्षण पाेहाेचवण्याचे उद्दिष्ट आहे. या अंतर्गत हा करार करण्यात आला आहे.
 
विद्यार्थ्यांमध्ये काैशल्य विकास घडवून आणण्याचे केंद्राचे धाेरण आहे. विद्यार्थ्यांमध्ये काेणतेही काम करताना उत्कृष्टता यावी, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. या दृष्टीने त्यांना दर्जेदार काैशल्य प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ साेशल सायन्सेसद्वारे पदविका व पदवी प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून देण्यातयेणार आहे. कमवा व शिका या तत्त्वावर कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थी बारावीनंतर प्रवेश घेऊ शकणार आहेत. यासाठी राज्यात एकाच वेळी विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यात येणार असल्याचेही केसरकर यांनी सांगितले.राज्याच्या समग्र शिक्षा कार्यालयाने यापूर्वी सुरू केलेल्या मिलाप या कार्यक्रमाद्वारे माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना करिअरच्या नवीन संधी उपलब्ध करुन देण्यासाठी एचसीएल कंपनीसाेबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. यात आतापर्यंत 34 हजार विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली आहे. याद्वारे 25 हजार तरुणांना राेजगार उपलब्ध हाेईल, असेही केसरकर यांनी सांगितले.