चीनची चंद्र-सूर्य इमारत

    23-Sep-2022
Total Views |
 
 

Sun 
 
भारतीय संस्कृतीत सूर्य-चंद्र देव मानले जातात.नेपाळच्यासूर्य-चंद्र आहेत. चीनने गेल्या वर्षी कृत्रिम सूर्य व चंद्र तयार करण्याचा प्रयाेग केला; पण हा प्रयाेग फसला. त्यामुळे चीनने गिलीन या शहरात सूर्य आणि चंद्र पॅगाेडा टाइप दाेन बहुमजली इमारती बांधल्या असून, दुधाची तहान ताकावर भागविली आहे.यापैकी सूर्य इमारतीमध्ये लाल दिव्यांच्या लाल प्रकाशाचा झगमगाट आहे. चंद्र ही इमारत सूर्य इमारतीपेक्षा कमी उंच आहे व चांदण्या रात्री जसा चंद्राचा प्रकाश पडताे, त्याची अनुभूती व्हावी यासाठी चंद्र इमारतीत पांढरा प्रकाश देणाऱ्या ट्यूबलाइट्स लावल्या आहे. या दाेन्ही इमारतींचा तळभाग जमिनीत खाेलवर एकमेकांना जाेडलेला आहे. या चंद्र, सूर्य इमारती पाहण्यासाठी दरराेज माेठी गर्दी हाेत आहे.