पुरेशी झाेप घेणाऱ्यांना हृदयविकाराचा धाेका कमी असताे

    22-Sep-2022
Total Views |
 
 

sleep 
 
एका सर्व्हेच्या निष्कर्षानुसार दर 10 पैकी 9 जण रात्री पुरेशी झाेप घेऊ शकत नाहीत. त्यामुळे या लाेकांच्या आराेग्याच्या समस्या वाढत आहेत.ज्या लाेकांची पुरेशी झाेप हाेत नाही अशा लाेकांना हृदयविकार आणि स्ट्राेकचा धाेका जास्त असताे. पुरेशी झाेप झाली तर 10 पैकी 7 लाेकांचा हृदयविकारापासून बचाव हाेऊ शकताे.पॅरिस येथील फ्रेंच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड मेडिकल रिसर्चचे प्राेफेसर अबु बकर नाम्बिया म्हणाले की, आजकाल कमी वयात हार्ट अटॅक येणे सामान्य झाले आहे. याचे महत्त्वाचे कारण खाण्या-पिण्याच्या बाबतीत हलगर्जीपणा, अनियमित दिनचर्या, व्यस्त जीवनशैली, आर्थिक विवंचना, टेंशन हीसुद्धा कमी झाेपेची कारणे आहेत. त्यामुळे कमी वयातच हृदय दुबळे हाेऊ लागले आहे. आता तर लाेक रात्री उशिरापर्यंत माेबाइल पाहतात.त्यामुळे कित्येक तास झाेप कमी झाली आहे. यामुळेच हे आजार वाढत आहेत.
 
डाॅ. अबु बकर पुढे म्हणाले की, आज धावपळीचे जीवन व्यस्त जीवनशैली यामुळे झाेपेचे प्रमाण खूपच कमी हाेऊ लागले आहे. झाेपेचा हृदयविकाराशी संबंध आहे. बेसलाइन स्लिप स्काेअर आणि स्लिप स्काेअरमध्ये काळानुसार बदल आणि हृदयविकाराचा संबंध तपासण्यात आला.दाेन वर्षांनी तपासणी: या अध्ययनामध्ये पॅरिस प्राॅस्पे्निटव्ह स्टडी-3 (पीपीपी-3) मध्ये 7 हजार 200 लाेकांचा समावेश करण्यात आला हाेता. त्यात पुरुषांची संख्या 62% व वय सरासरी 59.7 वर्षे हाेते. 10 वर्षांच्या काळात दर दाेन वर्षांनी काेराेनरी हृदयविकार आणि स्ट्राेकची श्नयता तपासण्यात आली. अध्ययनातील लाेकांचे वय, लिंग, मद्यपान, धूम्रपान, व्यवसाय, बाॅडी मास, इंडे्नस, शारीरिक हालचाली, काेलेस्ट्राॅलची पातळी, मधुमेह व हृदयविकाराचा झटका, स्ट्राेक किंवा अचानक हृदयविकाराने मृत्यू व मृत्यूचा काैटुंबिक इतिहासाचा तपासणीत समावेश करून संबंधित घटनांचे विश्लेषण करण्यात आले असता हा धाेका 22% कमी झाल्याचेही आढळून आले.डाॅ. अबु बकर म्हणाले की, पुरेशी झाेप झाल्यास हृदयविकारांपासून सुटका हाेऊ शकते. जर लाेकांनी पुरेशी झाेप घेतली, तर हृदयविकार आणि स्ट्राेक 72% कमी हाेऊ शकताे.