‘अमृत सराेवर’मुळे तलावांना संजीवनी मिळणार

    22-Sep-2022
Total Views |
 
 

Vasai 
वसई-विरारमधील तीन तलावांच्या विकासाचा प्रस्ताव महापालिकेकडून सादर शहरातील तलावांच्या सुशाेभीकरणासाठी केंद्राने अमृत सराेवर याेजना आणली आहे.वसई विरार महापालिकेने या याेजनेत शहरातील 3 तलावांच्या सुशाेभीकरणाचा प्रस्ताव सादर केला आहे. या याेजनेमुळे शहरातील तलावांना नवसंजीवनी मिळणार आहे.शहराच्या साैंदर्यात तलाव भर घालत असतात. तसेच, ते पर्यावरणाच्या संवर्धनात माेलाची भूमिका बजावत असतात. या तलावांचे संवर्धन करून त्याचे पुनरुज्जीवन करावे. यासाठी केंद्राने अमृत सराेवर याेजना आणली आहे.या याेजनेत प्रत्येक जिल्ह्यात 75 तलाव तयार करणे आणि तलावांचे संवर्धन करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.
 
वसई, विरार शहरात अनेक जुने तलाव आहेत. मात्र, निधीअभावी या तलावांचे सुशाेभीकरण रखडले हाेते. आता केंद्राने निधी देण्याचे जाहीर केल्याने पालिकेने याअंतर्गत निधी मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. पहिल्या टप्प्यात पालिकेने विरारमधील घाणीचा तलाव, तसेच नालासाेपारामधील मालई आणि नाळे या तलावांचे प्रस्ताव सादर केले आहेत. मालई आणि नाळे तलावासाठी सुमारे 38 काेटी, तर घाणीच्या तलावासाठी 11 काेटींचा खर्च अपेक्षित आहे.या याेजनेत तलावांची खाेली वाढवणे, संरक्षक भिंत बनवणे, तलावांचे सुशाेभीकरण करणे, तलावांच्या सभाेवताली खेळाचे उद्यान तयार करणे आदींचा समावेश आहे. अमृत याेजनेअंतर्गत शहरात पाणीपुरवठा याेजनेसाठी जलवाहिन्या टाकण्यात येत असून, जलकुंभ उभारण्यात येत आहेत. आता या याेजनेअंतर्गत तलावांचे सुशाेभीकरण केले जाणार असल्याने पालिकेला दिलासा मिळाला आहे. तीन तलावांच्या सुशाेभीकरणासाठी सुमारे 86 काेटींचा निधी केंद्राकडून मिळणार आहे.