मुंबई सागरी किनारा मार्गाचे 62 टक्के काम पूर्ण

    22-Sep-2022
Total Views |

Mumbai
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी; मुंबईकरांना वाहतूककाेंडीतून दिलासा मिळणार मुंबई सागरी किनारी मार्ग प्रकल्पाचे सुमारे 62 टक्के काम पूर्ण झाले असून, पुढील वर्षाअखेरीस हा प्रकल्प पूर्ण हाेईल. त्यामुळे मुंबईकरांना वाहतूककाेंडीतून माेठा दिलासा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे व्यक्त केला.सागरी किनारा मार्गाच्या प्रगतिपथावर असलेल्या कामाची पाहणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. प्रियदर्शिनी उद्यान (नेपियन सी) येथील कार्यालयात मुंबई महापालिकेचे आयुक्त डाॅ. इक्बालसिंह चहल व अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले.मुंबईकरांसाठी स्वप्नवत असलेला हा प्रकल्प वेळेत पूर्ण कधन त्यांचा प्रवास अधिक गतिमान करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
 
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रियदर्शिनी पार्क येथील भूमिगत बाेगदा, हाजी अली आणि वरळीतील आंतरमार्गिका बदलासह (इंटरचेंज) संपूर्ण प्रकल्प रस्त्याची पाहणी केली. या वेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, आमदार प्रकाश सुर्वे, अतिरिक्त आयुक्त (शहर) आशिष शर्मा, उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) अजय राठाेर, प्रमुख अभियंता (सागरी किनारा मार्ग प्रकल्प) (प्रभारी) मांतय्या स्वामी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित हाेते.मुंबई पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. एकूण 10.58 कि.मी.च्या या प्रकल्पाचे बांधकाम प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या (सी लिंक) दक्षिण टाेकापर्यंत करण्यात येत आहे. या प्रकल्पात 4+4 मार्गिका असणारे भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते आणि बाेगद्यांचा समावेश आहे. एकूण तीन पॅकेजमध्ये हा संपूर्ण प्रकल्प विभागलेला आहे.