साेशल मीडिया अ‍ॅप्समुळे मुलांवर विपरीत परिणाम

    22-Sep-2022
Total Views |
 
 
संध्यानंद.काॅम
 

Media 
 
प्रसिद्धीचा झगमगाट आणि त्यातून येणाऱ्या पैशांचे आकर्षण सगळ्यांना असते. सध्याच्या काळात नव्या तंत्रज्ञानामुळे तसे करणे साेपे झाले आहे. काही कला सादर करून ती साेशल मीडियावर टाकली की झाले. रील आणि वास्तव जीवनात अंतर असायला हवे याचा विसर पडायला लागला आहे. प्रसिद्धीची इच्छा असली, तरी पूर्वी लाेकांना एवढे पर्याय उपलब्ध नव्हते. पण, आता एक स्मार्टफाेन तुमची ही इच्छा पूर्ण करताे.एक काळ हाेता...आपल्याकडे काेणी पाहुणे आले, तर आपले आई ‘बेटा, काका-काकूंना एखादी कविता म्हणून दाखव,’ असे सांगायची आणि आपण लाजत लाजत बाहेर येऊन एखादी पाठ केलेली कविता म्हणून दाखवायचाे. मग पाहुणे टाळ्या वाजवून आपले काैतुक करावयाचे आणि आईला आपला अभिमान वाटायचा. कविता म्हणून दाखवल्याचे बक्षीस म्हणून खास पाहुण्यांसाठी आणलेली मिठाईसुद्धा दिली जायची.
 
पण, आता अशी वेळ आली आहे...आपल्या चार वर्षांच्या मुलीला नटवून तिची आई राेज एखाद्या नव्या ‘ट्रेंड’वर तिचा व्हिडीओ बनविते. या मुलीकडून तिची आई राेज नवीन काही करून घेते. त्यात ही चिमुरडी कधी सासू असते, तर कधी शेजारीण. सुरुवातीला असे प्रयाेग आपल्यापुरते किंवा निकटवर्तीयांच्या ग्रुपपुरते हाेते.मग, काेणीतरी या मुलीची कला अमूक एका साेशल मीडिया अ‍ॅपवर टाकण्याचा सल्ला दिला.तसे केल्यावर या छाेट्या मुलीचे लाखाे प्रशंसक निर्माण झाले. ‘साे ्नयुट,’ ‘माझी मुलगी अशीच असती तर...’, ‘तुम्ही किती भाग्यवान आहात...’ यासारख्या काॅमेंट्स पडायला लागल्या.असे बदलत गेले जीवन...आता तर राेज व्हिडीओ तयार व्हायला लागले आहेत. आज कशाचा व्हिडीओ तयार करावा, गाणे काेणते निवडावे, काेणता ड्रेस घालावा, व्हिडीओ काेठे तयार करावा आदी प्रश्न ताण वाढवायला लागले.
 
मग त्यासाठी नवा फाेन घेतला गेला, घराची सफाई करून नवा रंग दिला गेला. कधी घरात, कधी बाहेर, तर कधी बागेत व्हिडीओ तयार व्हायला लागले. त्यात कुटुंबातील इतर सदस्यही सहभागी झाले. छाेट्या मुलीला बाहेर खेळायला जायचे असले, तरी तिला अजून ‘स्क्रिप्ट’ पाठ करावयाचे आहे. तिला केक खावासा वाटत हाेता; पण लठ्ठ हाेशील असे सांगून ताे तिला दिला गेला नाही. छाेटीने चिडचीड केली म्हणून तिला रट्टाही खावा लागला. तिला फेस पॅक लावला जाताे.मेकअप करण्यासाठी खूप वेळ लागताे. शाळेत काय, ती नंतरही जाऊ शकते. अजून लहानच तर आहे... एखाद्या दिवशी व्हिडीओला कमी लाइ्नस आले, तर आईला जेवण जात नाही आणि ‘तुला शिकविल्याप्रमाणे तू काही करत नाहीस,’ अशा शब्दांत ती मुलीला रागावते. मग त्या छाेटीची स्थिती केविलवाणी हाेते. आपण रडलाे तर आणखी ऐकून घ्यावे लागेल याची भीती तिला वाटते. पण, ज्या दिवशी व्हिडीओला जास्त लाइ्नस येतात, त्या दिवशी मैत्रिणींना बाेलावून पार्टी दिली जाते. रील हीट झाल्याची ती असते. मग खाता खाता प्रश्नांची सरबत्ती सुरू हाेते.
 
‘रीलमधून तुला पैसेसुद्धा मिळत असतील ना?’- एका मैत्रिणीचा प्रश्न.‘अगं, माझं टॅलेंट लाेकांपर्यंत पाेहाेचणे हीच माेठी गाेष्ट आहे.’ ‘मुलगी झाेपली का?’ ‘हाे, तिच्या टाइम टेबलकडे लक्ष द्यावे लागते.नाही तर ती परफाॅर्म करू शकत नाही.’ ‘तुला वाईट काॅमेंट्सही येत असतील...’ ‘अगं, जळणाऱ्यांची काही कमी आहे का? येतात शहाणपणा शिकवायला. मुलांना अशाप्रकारे ए्नस्पाेज करू नका, मुलांना वाईट गाेष्टी शिकवू नका, मुलांना त्यांच्या वयानुसार राहू दे, थाेडा पैसा आणि प्रसिद्धीसाठी मुलांचे आयुष्य बिघडवू नका वगैरे. पहिल्यांदा मला फार वाईट वाटायचे, राग यायचा, मन अशांत हाेत असे. पण, आता त्याची सवय झाली आहे. आता तर मी तिकडे लक्षच देत नाही.आमची मुले, आमचे आयुष्य. आम्ही काहीही करू.’ आपण म्हटलेल्या कवितेमुळे आनंदित झालेल्या आईची आता आठवण येते.
 
तिला आपला किती अभिमान वाटायचा! काळ बदलला आहे हेच खरे. साेशल मीडियाचा मुलांवर काय प्रभाव पडताे याचा शाेध घेणे मानसशास्त्रज्ञांनी सुरू केले आहे. पण, 13 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना अनेक साेशल मीडिया अ‍ॅप्स वापरण्याची परवानगी नसल्याचे तुम्हाला माहिती आहे का? या रीलमध्ये असलेल्या मुलांना अन्य अ‍ॅप्सवर येण्याची उत्सुकता वाटत नसेल का? ते त्यांच्या पालकांची साेशल मीडिया अकाउंट्स चालवित नसतील का? बालपणावर वाईट परिणाम : एक अब्जापेक्षा जास्त उपभाेक्ता असलेल्या इन्स्टाग्रामच्या ‘इन्स्टाग्राम किड्स’ से्नशनला जगभरात विराेध झाला आणि ते राेखले गेले. साेशल मीडियामुळे मुलांच्या मानसिक, भावनात्मक आणि शारीरिक विकासावर हाेणारे दुष्परिणाम संशाेधकांनी समाेर आणले आहेत. कमी वयात अशा साइट्सना मुले ए्नस्पाेज झाल्यावर काय हाेते ते पाहा.
 
चिडचीड वाढते, झाेप आणि भुकेवर परिणाम हाेताे.आत्मविश्वास कमी हाेऊन राग वाढताे.नैराश्य आणि चिंतेचे विकार हाेतात.समजून घेण्याची क्षमता घटते.वास्तव जीवनातून मन ऊबते आणि साेशल मीडियावरी जीवनच वास्तव वाटायला लागते.
अशा मुलांचे आई-वडिलांबराेबरचे संबंध बिघडतात. या मुलांना वास्तव जीवनात मित्र मिळत नाहीत, त्यांची संवादक्षमता कमी हाेते आणि ही मुले कायम इतरांबराेबर स्वत:ची तुलना करत राहतात.या मुलांना ‘मूव्हमेंट डिसऑर्डर’ हा विकार हाेण्याची जाेखीम असते. यात मुले मान आणि हातांच्या विचित्र हालचाली करतात.अशी मुले स्वत:बराेबर अथवा काल्पनिक व्यक्तीबराेबर बाेलताना दिसतात. शाळेत जाणे, अभ्यास करणे किंवा खेळणे त्यांना नकाेसे वाटते.मला माेबाइल फाेनबराेबर एकटे राहू द्यावे असे त्यांना वाटते.मुलांचा मानसिक आणि भावनिक विकास टप्प्याटप्प्यांत हाेताे. त्यांना रील अथवा व्हिडीओमध्ये घेतल्यावर ही मुले लहान वयातच प्राैढांप्रमाणे वागायला लागतात.मुलांना अश्लील संवाद म्हणायला लावल्याबद्दल अथवा अशा प्रकारच्या गाण्यांवर नृत्य करायला लावल्याबद्दल पालकांविरुद्ध सायबर पाेलिसांकडे तक्रारी करण्याच्या घटनाही घडल्या आणि त्यावर कारवाईसुद्ध केली गेली.