विषाणू ओळखून अलर्ट करणारा मास्क विकसित

22 Sep 2022 14:20:39

Mask
काेराेनाचा संसर्ग राेखण्यात सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्याचं निदान लवकर हाेणे आवश्यक आहे. यासाठी आता संशाेधकांनी एक असा फेस मास्क तयार केला आहे जाे हवेतील थेंब (ज्यांना एराेसाेल असं म्हटलं जातं), त्यात असणाμरे श्वसन विषाणू ओळखू शकताे.
यात इन्फ्लूएन्झा किंवा काेराेना विषाणू ओळखता येतात. तसंच हवेत संबंधित विषाणू आढळल्यास मास्क वापरणाऱ्याला याबाबत माेबाइलवर 10 मिनिटांत अलर्टही करते. काेराेना आणि इन्फ्लूएन्झाला कारणीभूत श्वसनातील विषाणू हे संसर्ग झालेल्या व्य्नती बाेलताना, खाेकल्यास किंवा शिंकल्यास त्यांच्या नाकाद्वारे किंवा ताेंडाद्वारे लहान थेंब हवेत मिसळतात. हे विषाणू एराेसाेलमध्ये बराच काळ टिकून राहतात. फेसमास्क घातल्यानं विषाणूचा प्रसार आणि संसर्गाचा धाेका कमी हाेत असल्याचं याआधीच्या संशाेधनातून समाेर आलं आहे.हवेत असणारे विषाणू ओळखू शकेल आणि त्याबाबत मास्क वापरणाऱ्याला कल्पना देऊ शकेल, असा मास्क आम्हाला तयार करायचा हाेता, असं संशाेधन करणारे यिन फँग म्हणतात.
 
शांघाय टाेंगची युनिव्हर्सिटीत ते लेखक आणि साहित्य शास्त्रज्ञ म्हणून काम करतात. लिफ्ट, बंद खाेल्या अशा ठिकाणी संसर्गाचा धाेका जास्त असताे. हवा खेळती नसलेल्या ठिकाणी मास्क चांगलं काम करताे. तसंच भविष्यात श्वसनाशी संबंधित नवीन प्रकारचा संसर्ग दिसला, तर फ्नत त्या विषाणूसाठी सेन्सरच्या डिझाइनमध्येही बदल करता येऊ शकताे, असंही संशाेधकांनी सांगितले.
मास्कच्या डिझाइनमध्ये मल्टीचॅनल सेन्सर बदलले तसंच फँग यांनी बंद असणाऱ्या कंटेनरमध्ये एअराेसेलची फवारणी करत मास्कची चाचणी घेतली. खाेकल्यामुळे तयार हाेणाऱ्या एराेसाेलमधून 0.3 मायक्राेलिटरपेक्षा जास्त विषाणूंची प्रथिने वाहून नेतात.
यातले विषाणू एम्प्टॅमरला डिटेक्ट झाल्यानंतर आयन गेटेड ट्राझिस्टर सिग्नल देतील आणि मास्क घालणाऱ्यांना त्यांच्या फाेनवर अलर्ट मिळेल. मास्क अवघ्या काही मिनिटांत हवेतील विषाणू केवळ आयन गेटेड ट्रान्झिस्टरमुळे ओळखू शकेल.
Powered By Sangraha 9.0