कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेस राज्यपालांची भेट

    22-Sep-2022
Total Views |
 
 
 

Karve 
 
राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांनी महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेला भेट दिली. भारतरत्न महर्षी धाेंडाे केशव कर्वे यांच्या समाधी स्थळाला त्यांनी अभिवादन केले आणि महर्षी कर्वे स्मारकालाही भेट दिली.राज्यपालांनी संस्थेच्या परिसराची पाहणी करताना प्रथम संस्थेचे वास्तुरचना महाविद्यालय, कमवा व शिका याेजनेंतर्गत चालवली जात असलेली संपदा बेकरी आणि संस्थेची प्रथम वास्तू असलेली कर्वे यांची झाेपडी या ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली. तसेच, कर्वे शिक्षण संस्था परिसराची पाहणी करून समाधान व्यक्त केले. या वेळी संस्थेच्या अध्यक्षा स्मिता घैसास, उपाध्यक्ष सागर ढाेले पाटील, कार्याध्यक्ष रवींद्र देव, उपकार्याध्यक्षा विद्या कुलकर्णी, आजन्म सेवक मंडळाच्या अध्यक्षा डाॅ. माधुरी खांबेटे उपस्थित हाेते.